सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः49

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः49

संग्रहालयाच्या वतीने प्रसिद्ध केले. गुरुवर्य केळुसकर बांनी ‘इस्त्रायल’ आणि ‘जगद्‌द्युत्त’ या पत्रांचे संपादनही केले. तसेच गुरुवर्य केळुसकरांनी ‘इंदुप्रकाश’, ‘सुबोध पत्रिका’, ‘दीनबंधु’, ‘सुबोध प्रकाश’, ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ आदी पत्रांमधून प्रसंगी तत्कालीन विचारधारेला धक्का देणारे लेखनही केले, गुरुवर्य केळुसकर फडे वक्तेही होते. रघुनाथ महाराजांच्या समाधीजवळ त्यांची महात्मा फुले यांच्याशी भेटही इझाली होती. पहिल्या मुंबई-मराठी साहित्य संमेलनाचे (६ ऑक्टोबर १९३४) त्यांनी अध्यक्षपदही भूषविले. मुंबईत स्थापन झालेल्या ‘मराठा ऐक्येच्छू सभे’चे ते क्रियाशील सभासद होते. ‘मराठा प्रॉव्हिडंट फंड’, ‘मराठा रिलीफ कमिटी’, ‘विद्या प्रसारक मंडळ’ आणि अन्य समितीचे ते सदस्य होते.

गुरुवर्य केळुसकर सत्यशोधक चळवळीतही सक्रिय होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी ते नियमित व्याख्याने देत. मुंबईत महात्मा फुले यांची व्याख्याने असल्यास ते आवर्जून उपस्थित राहत. ‘दीनबंधु ‘कार नारायणराव लोखंडे यांच्यासमवेत ते मुंबई सत्यशोधक शाखेच्या कार्यातही सहभागी होत असत.

सत्यशोधक समाजाचे तिसरे अधिवेशन २३ मार्च १९१३ रोजी ठाणेकर सत्यशोधक डॉ. संतूजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या अधिवेशनाला गुरुवर्य केळुसकर आवर्जुन उपस्थित होते. या अधिवेशनातील सहाव्या ठरावाचे ते सूचक होते. या अधिवेशनाच्या दस्तऐवजात त्यांच्या संदर्भाने ‘राजमान्य केळुसकर’ असा गौरवास्पद उल्लेख आढळून येतो. दिनांक २५ व २६ एप्रिल १९१४ रोजी पार पडलेल्या सासवड येथील सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला

केळुसकर उपस्थित होते. उतारवयात गुरुवर्य केळुसकरांची प्रकृती क्षीण होत गेली. ९ ऑक्टोबर १९३४ रोजी पक्षाघाताचा झटका आला. त्यातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत. पक्षाघाताच्या आजारातच त्यांचे रविवार दिनांक १४ ऑक्टोबर १९३४ रोजी दादर, मुंबई मुक्कामी निधन झाले. आप्तांचे दादा, परिचितांचे मास्तर आणि दलित-बहुजन समाजाचे गुरुवर्य जाताना मात्र थोरांच्या थोर चरित्रांचे ३५-४०

ग्रंथ मागे ठेवून गेले. संदर्भ – १. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे चरित्र संपादक- धनंजय कीर, २. सत्यशोधक समाज परिषद अ.भा. व कार्यवृत्तांत- संपादक प्राचार्य गजमल माळी

कोठारी
वा. रा.
(१३ सप्टेंबर १८१२-१० बिब्रुवारी १९७४)

अकोला येथील अ. भा. आठव्या सत्यशोधक समाज अधिवेशनाचे अध्यक्ष, जागरूक आणि ‘प्रभात’कार, बहुआयामी सत्यशोधक आणि आयुष्याच्या सायंकाळी थोडेसे सनातनी विचारांकडे झुकलेले वालचंद कोठारी यांचा जन्म १३ सप्टेंबर १८९२ रोजी मौजे बावी, तालुका माढे, जि. सोलापूर येथे झाला. मामा शिवलाल मलुकचंद गांधी यांच्याकडे शिक्षणासाठी १८९९ साली म्हणजे वयाच्या पाचच्या वर्षी पंढरपूरला त्यांची रवानगी करण्यात आली. पंढरपूरच्या व्ही. जे. हायस्कूलमधून ते १९०८ साली मॅट्रिक झाले.

१९०९-१० साली मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात ते दाखल झाले. १९१२ मध्ये पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयातून बी. ए. (प्रथम श्रेणी) झाले. याच महाविद्यालयात त्यांना फेलोशिपही मिळाली. १९१३ साली मुंबई येथे त्यांनी ‘सुरस ग्रंथमाले’ची स्थापना केली. लोकमान्य टिळकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘गीतारहस्य’ या विख्यात

जाडजूड ग्रंथावर टीका करणारे त्यांचे चार लेख ‘केसरी’ पत्रातून प्रसिद्ध झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर १९१५ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानंतर लोकमान्य टिळकांनी कोठारींना भेटीसाठी बोलावून घेतले. या भेटीत आरंभी या लेखांवर साधकबाधक चर्चा झाली. पुढे वादविवादही झाला, लोकमान्यांनी कोठारीच्या लेखांना केसरीतून उत्तर दिले. कोठारींनीही प्रत्युत्तर दिले, मात्र केसरीने ते छापले नाही. तेव्हा प्रस्तुत लेखनप्रपंच कोठारींनी ग्रंथरूपाने १९१५ सालच्या अखेरीस प्रसिद्ध केला. ‘गीतारहस्यावर टीकात्मक निबंध’ शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथाला वामन गोविंद काळे यांची प्रस्तावना लाभली आहे.

याच वर्षी त्यांची ‘इंदिरा’ ही सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली. पुढे १९५८ साली गीतारहस्यावरील ‘गीतारहस्यसार’ हा १९१५ सालच्या ग्रंथावरील पुनर्मूल्यांकनपर कोठारीचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. मात्र या पुनर्मूल्यांकनपर ग्रंथात त्यांच्या १९१५ सालच्या विचारात तफावत असून १९१५ साली टिळकांसमवेत वादविवाद करणारे कोठारी ४५ वर्षानंतर या ग्रंथात टिळकांचे विचार उचलून

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button