सोशल

मंडलनामा क्रमशः20.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मंडलनामा क्रमशः20.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

https://youtu.be/imFF75cN4Us

व्ही. पी. सिंह सरकार डिसेंबर १९९० मध्ये कोसळल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांनी सरकार स्थापन केले. काँग्रेसने या सरकारचा पाठिंबा अल्पावधीत काढून घेतला. त्यामुळे १९९१ मध्ये लोकसभा निवडणूक झाली. निवडणूक प्रचार सुरू असताना श्रीपेरम्बदूर येथे ‘लिट्टे’च्या दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बचा वापर करून काँग्रेस नेते राजीव गांधी यांची हत्या केली. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण एकदम बदलले. या तिरंगी निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले नाही, मात्र तो सर्वात मोठा पक्ष ठरला. काही लहान पक्षांचा पाठिंबा घेऊन काँग्रेसचे पी. व्ही. नरसिंह राव यांनी सरकार स्थापन केले.

पी. व्ही. नरसिंह राव सरकारला मंडल आयोगाचा मुद्दा बाजूला टाकता आला नाही. सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना नरसिंह राव सरकारने २५ सप्टेंबर १९९१ रोजी मंडल आयोगासंदर्भात नवीन निर्णय घेतला. ओबीसींना २७ टक्के व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दहा टक्के आरक्षण लागू केले. या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मंडल आयोगासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. संसद व रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात पोहोचली. अखेर १६ नोव्हेंबर १९९२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत व्ही. पी. सिंह सरकारने ओबीसींना दिलेले २७ टक्के आरक्षण योग्य ठरवले व आर्थिक निकषावरील दहा टक्के आरक्षण फेटाळले.

मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. या आदेशानुसार केंद्रातील पी. व्ही. नरसिंह राव सरकारने १० सप्टेंबर १९९३ रोजी मंडल आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील जीआर काढला. तो १३ सप्टेंबर १९९३ रोजी शासकीय गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्याला शासन जीआर काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रत्येक राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. मंडल आयोगाची अंमलबजावणी होईपर्यंत देशभरातील सर्व प्रमुख आंदोलनात माझा सहभाग राहिला.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button