सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 46

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 46
कुसळकर महादेव विठ्ठल
(जन्म-१५ ऑक्टोबर १९६८)
महादेव विठ्ठल कुसळकर हे मौजे केनवड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९६८ सालचा आहे. ते ग्रंथपालपदावर कार्यरत असून इ.स. १९९७ पासून सत्त्यशोधक समाज चळवळीत सक्रिय आहेत. या सुमारास केनवड येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. दरम्यान, २००६मध्ये वाशिम जिल्ह्यातील जवळपास ६५ गावांत भेट देऊन दुर्लक्षित वडार समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच पुढे राष्ट्रीय स्तरावर वडार समाजाचे संघटन स्थापन केले. तसेच विदर्भातील शेतकऱ्यांनी निराशेपाटी आत्महत्यासत्र बंद करावे म्हणून सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सरकारदरबारी प्रयत्न केले,
२००८मध्ये विदर्भस्तरीय वडार समाजाचा एक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात प्रामुख्याने सत्यशोधकी मताचा खल करण्यात आला. प्रस्तुत मेळावा सफल करण्यासाठी कुसळकरांनी परिश्रम घेतले.
कुळकर्णी सोनू रामचंद्र
सत्यशोधक शाहीर, जाती बहिष्कृती सत्यशोधक, मराठी मुलखातील शाहीर- वादक सोनू रामचंद्र कुळकर्णी यांचा जन्म १८७९-१८८०च्या सुमाराचा असून, ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे मेडद गावचे सत्यशोधक होत. पंढरपूर येथील बडवे घराणे, हे सोनू कुळकर्णी यांचे मूळ घराणे असावे.
सोनू कुळकर्णी हे ऐन तारुण्यात गावातील (मेडद) सत्यशोधक हरिभाऊ तोरणे यांच्या संपर्कात आले, हरिभाऊ तोरणे हे सत्यशोधक असल्याने पुरोगामी वृत्तीचे होते. हरिभाऊ तोरणे यांच्या सहवासात आल्यावर सोनोपंत कुळकर्णी यांच्या अंतःकरणातील वर्णं अहंकार गळून पडला. पुढे ते इ. स. १९११च्या
सत्यशोधकांचे अंतरंग /७४
सुमारास सत्यशोधक चळवळीत सक्रिय झाले. ते जतीने ब्राह्मण असल्याने आरंभी अनेक सत्यशोधकांनी त्यांच्या सत्यशोधकी आचार-विचारांवर शंका उपस्थित केल्या. मात्र आपल्या सत्यशोधकी आचरणाने त्यांनी काही दिवसांतच या शंकांना मूठमाती दिली. १९२० साली हरिभाऊ तोरणे यांनी ‘बहिष्कृत विद्यार्थी वसतिगृह’ पंढरपूर येथे सुरू केले. या शैक्षणिक संस्थेला कुळकर्णी यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. पुढे १८ फेब्रुवारी १९२१ रोजी पंढरपूर येथील चोखामेव्या धर्मशाळेत ‘बहिष्कृर्ताची’
जाहीर सभा संपन्न झाली, या सभेचे अध्यक्षस्थान कुळकर्णी यांनी भूषविले. या प्रकरणी स्वजातीने त्यांना बहिष्कृत केले. तरी ते डगमगले नाहीत, एकीकडे स्वजातीने त्यांना जाती बहिष्कृत केले, तर दुसरीकडे बहुजनांनी त्यांच्या जलशातील कलावंतांना फितवून त्यांचा जलसा मोडला। अशाही विपरीत परिस्थितीत जलशाची पुनर्बाधणी करून त्यांनी महाराष्ट्रभर फिरती केली. पुढे १९२२ साली माळशिरस तालुक्यात त्यांच्या जलशावर तहसीलदारांनी बंदी
घातली ! अशाही प्रतिकूल परिस्थितीत कुळकर्णी अचल राहिले. या संदर्भाने दि. ३१ मे १९२२ रोजी त्यांच्या जलसा खेळाच्या संदभनि ‘दीनमित्र’ पत्रात एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तात त्यांनी म्हटले आहे की, समाजात सध्या परिस्थितीचा विपरीतपणा आहे. (बहुजन समाज निरक्षर आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा गुलाम आहे.) या विपरीतपणाशी टक्कर देण्यासाठी आणि समाजाचे कल्याण करण्याहेतू जलसा चळवळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. थोडक्यात, ब्राह्मणी गुलामगिरीचे ओझे झटकण्यासाठी आणि मानवमुक्तीच्या हेतूसाठी सत्यशोधक जलसा चळवळ असल्याचे म्हटले आहे.
कुकाणा, कडलस, बावी, बारामती, वाई (ब्राह्मणेतर पक्षाचे अधिवेशन ७ मार्च १९२६) येथे त्यांच्या जलशाचा खेळ झाला. वाई येथील ब्राह्मणेतर परिषदेत त्यांचे व्याख्यान झाले. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना एक पदक देऊन गौरविले होते. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील आणि आनंदस्वामी यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. अधूनमधून मुकुंदराव पाटील आणि आनंदस्वामी यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारही असे. त्यांच्या जलशासाठी आनंदस्वामी अधूनमधून आर्थिक मदत करत असत.
दीनमित्र पत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात त्यांचा उल्लेख ‘सोनू कुळकणी असाच आहे. मात्र मराठी मुलुखातील सत्यशोधक त्यांना ‘सोनोपंत कुळकणी अशीच तोंडभरून हाक मारत असत, आयुष्यभर हाल -अपेष्टांत जीवन कंठणाऱ्या या बिनीच्या सत्यशोधकाचे निधन वयाच्या ७२/७३व्या वर्षी १९५१/५२ साली झाले असावे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




