सोशल

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाणे,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 49

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाणे,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 49

जास्त उत्पादन करू लागला, असे आपल्याला दा.ध. कोसंबी व प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील सांगतात. (जात्यंतक भांडवलदारी लोकशाही व तीची समाजवादी पूर्ती, शपा, पा-२६) सामाजिक-धार्मिक दास्यातून मुक्ती मिळविण्यासाठी बुद्धाचे क्रांतिकारक तत्वज्ञान कामी आले व दसपटीने जास्त उत्पादन करण्यासाठी क्रांतिकारक पद्धतीने विकसित झालेली उत्पादन साधने कामी आलीत. हे जास्तीचे उत्पादन देशो-देशीच्या बाजारपेठेत विकले जाऊ लागले. त्यामुळे तत्कालीन अर्थव्यवस्था भरभराटीला आलेली होती.

वर्णव्यवस्थेच्या विघटनातून नवी पूरा व श्रेणीची व्यवस्था आली. सर्व उत्पादक व्यावसायिक ‘श्रेणी’ नावाच्त्या समाजघटकात संघटित झालेत. श्रेणीतील उत्पादक व्यवसायिकांनी तयार केलेला पक्का माल बाजारपेठांध्ये नेऊन विकणारे व्यापारी ‘पूग’ म्हणून संघटित झालेत. पूग व श्रेणी यांनी सहाव्या शतकापर्यंत जातीव्यवस्थेची निर्मिती रोखून धरली होती, असे आपल्याला कॉ. शरद पाटील सांगतात. उत्पादकांच्या श्रेणींचे प्रमुख नंतर ‘श्रेष्ठी’ म्हणुन सन्मानित झालेत.

इसवी सन १ मध्ये ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र श्रृंग याने आपल्या बृहद्रथ नावाच्या बौद्ध राज्याचा भर कवायतीत खून करून सत्ता प्राप्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राज्यक्रांतीला ब्राह्मणी प्रतिक्रांती म्हणतात. शशांक सारख्या अनेक ब्राह्मण राज्यांनी बौद्ध भिक्खूंची सरेआम कत्तल केली. त्यातून बौद्ध भिक्खु पराभूत मानसिकतेत गेलेत व ब्राह्मणांचे मनोबल उंचावले. शशांक व पुष्यमित्र श्रृंगापासून प्रेरणा घेउन अनेक राज्यातील ब्राह्मण अधिकाऱ्यांनी व दरबाऱ्यांनी डोके वर काढायला सुरूवात केली. त्यांनी राज्याची धोरणे बदलायला सुरूवात केली. स्वतंत्र असलेल्या शेतकऱ्यांना भूदास बनवून त्यांच्या जमीनीचे केंद्रीकरण केले. ब्राह्मण व क्षत्रिय वर्णातून आनुवंशिक सामंत निर्माण निर्माण करण्यात आलेत. पूग व श्रेणीची अर्थव्यवस्था नष्ट करायला सुरूवात केली. पूग, श्रेणी व बौध्द धम्म यांचा संबंध अविभाज्य होता. कारण या पूग व श्रेणींमुळेच व्यापारी मार्गावर मोठी विहारे, बौद्ध विद्यापीठे, बौद्ध लेण्या वगैरे निर्माण होत होते. भिक्खूसंघांचे मुख्य आधारस्तंभ पूग व श्रेणीच होते. यांच्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे ब्राह्मणी वर्णव्यवस्था खिळखिळी होऊन मृतप्राय

झालेली होती. सर्वप्रथम या व्यवसायिकांवर समूद्रबंदी लावली गेली. समुद्रबंदीमुळे पूग व श्रेणींचा उत्पादन केलेला माल देश-विदेशाच्या बाजारपेठेत जाणे बंद झाले. गावबंदीमुळे गावातच माल विकावा लागत होता, बौद्ध मज्झमनिकाय मधल्या ‘घटिकार- सुत्ता’त वर्णन केलला कुंभारश्रेष्ठी किंवा रोमीला थापर यांनी आपल्या ‘लीनिएज

टु स्टेट’ या ग्रंथात वर्णन केलेल्या बौद्धकालीन कुंभारश्रेष्ठीचे उदाहरण घेऊ या! जो बौद‌कालीन कुंभारश्रेष्ठी ५०० कुंभशालांचा मालक होता व आपल्याच मालकीच्या ५०० नावांमधून आपली मडकी देश-विदेशात विकण्यासाठी पाठवित होता. तो आता जातीव्यवस्थेत समुद्रबंदी व गावबंदीमुळे केवळ गावाला पुरतील तेवढेच मडके तयार करू लागला. म्हणजे १०० मडकी तयार करून ते सहा महिन्यापर्यंत आपल्याच गावात विकून कसातरी गुजराण करू लागला. त्यानंतर भांडवली उत्पादन करण्यासाठी लागणारे रोख भांडवल निकालात

काढण्यात आले. त्यासाठी रोकडबंदी लादली गेली. उत्पादक व्यवसायिकाने तयार केलेला माल विकत घेतल्यानंतर त्याला रोख पैसे न देता धान्य रुपात बलुतं किंवा गवाही देण्याचा कायदा लादला गेला. कारण व्यवसायिकांच्या हातात जर रोख पैसा आला तर तो त्याचे भांडवलात रूपांतर करून आपला व्यवसाय वाढवेल व पुन्हा बाजारपेठा काबीज करेल, अशी रास्त भीती ब्राह्मणी शास्त्यांना वाटत होती. म्हणून मनुस्मृती शूद्रादिअतिशूद्रांना धनसंचय करायला सक्त विरोध करते. मेंढकश्रेष्ठीसारखे दसपटीने जास्त धान्य उत्पादन करणारे शेतकरी, लोहारश्रेष्ठी, सुतारश्रेष्ठी यांच्याप्रमाणेच सेवाकर्मी व्यवसाय करणारे नाभिक, धोबी आदि समाजघटक अशाच पद्धतीने कमजोर करण्यात आलेत. त्यानंतर सर्वात जालीम बंदी आली ती आंतरव्यावसायिक विवाहबंदी! प्रत्येक व्यावसायिक समाजघटकाने आपल्याच व्यावसायिक गटात विवाह करण्याचे बंधन लादल्यामुळे आनुवंशिक

व्यवसायिकांची जातीनिर्मितीची प्रक्रिया गतिमान झाली. त्यानंतर धर्माच्या पडद्याआड ब्राह्मणी साहित्याची निर्मिती करण्यात आली. पोथी-पुराणांची निर्मिती करून ब्राह्मणी कुप्रबोधनातून जातीची गुलामी स्वयंचलित करण्यात आली. मनुस्मृतीसारखे ग्रंथ लिहून जातीव्यवस्थेचे शिस्तबद्ध सुसूत्रीकरण करण्यात आले. जातीनिर्मितीत व जातीव्यवस्थेच्या निर्मितीतील सर्वात मोठा घटक व्यवसाय व व्यावसायिक हे होते. त्यांच्यावरच सर्वात प्रथम व सर्वात जास्त बंधने लादून जाती व जातीव्यवस्था निर्माण करण्यात आली. त्याकाळातील हे

सर्व व्यावसायिक आज ओबीसी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे जातीव्यवस्था निर्माण होतांना जो मूलभूत घटक वापरला गेला तोच मूलभुत घटक जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थः हायड्रोजन व ऑक्सिजन विशिष्ट पद्धतीने एकत्र (संघटित) आल्यानंतर पाणी तयार होत असेल तर ते पाणी नष्ट करण्यासाठी पाण्याचे विघटन करावे लागेल. पाण्याचे विघटन करणे म्हणजे पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन यांना विशिष्ट पद्धतीने वेगळे करून

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button