सोशल

सुरत- चेन्नई महामार्ग बाधितांची रविवारी भूमिपुत्र परिषद

न्यूज
04-07-2024

सुरत- चेन्नई महामार्ग बाधितांची रविवारी भूमिपुत्र परिषद

पत्रकारांसह संघर्ष समित्या व शेतकऱ्यांचा होणार सन्मान

 

 

सोलापूर, ता. ४ : वृंदावन फाउंडेशन व सुरत चेन्नई संघर्ष समिती व प्रबोधन युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकरी बंधू भगिनीची भूमिपुत्र परिषद रविवार ता. ७ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार आहे.

कृषी संबंधित परिघातील योगदान व प्रबोधन कार्य असलेले राज्यभरातील भूमिपुत्र बंधू- भगिनी या परिषदेच्या निमित्ताने एकवटणार आहेत. या परिषदेत पर्यावरण व कृषी

प्रबोधन, सुरत – चेन्नई महामार्ग भूसंपादन प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया याबाबत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सन्मान होणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत बांधवांच्या कार्यातील त्यांची संघर्षगाथा, त्यासंबंधीत संवाद त्यांच्या कार्याला गती यावी यासाठी पाठीवर मारलेली थाप प्रेरणा त्यांच्या कार्यातून इतर शेतकरी बंधू-भगिनीनी प्रेरणा घ्यावी, असा चतुरस्र मध्यवर्ती आशय असलेली भूमिपुत्र

परिषद ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून परिषदेचे अध्यक्ष म्हणून भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणिस डॉ. रघुनाथराव कचिक हे उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार प्रणिती शिंदे या उपस्थित राहणार आहेत यावेळी सुरत चेन्नई संघर्ष समितीचे वकील भुसंपादन, कृषी कायदे अभ्यासक अॅड. अनिरुध्द जाधव, सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक- संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या विश्वस्त श्रीमती राऊत ए डी, भूसंपादनाचे गाढे अभ्यासक राजेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेस राज्यातील नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर , बीड, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर, लातूर, सांगली आदी जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी बांधवानी आपल्या न्याय मागण्यासह सदरील भूमिपुत्र परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन भूमिपुत्र परिषदेचे संयोजक महारुद्र जाधव व सचिन पाटील, निमंत्रक कृष्णा इंगळे यांनी केले आहे.
सुरत चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या तीन पत्रकारांना भूमिपुत्र गौरव पुरस्कार देण्यात येत आहे
पत्रकार

१) अरविंद मोटे, सकाळ सोलापूर

२) मुजावर, पुज्नागरी चॅनल
३) उपेन्द्र कटके, दिव्य मराठी, धाराशिव
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button