सोशल

रानमसला नाभिक समाजाच्या दुकाना मधील फर्निचर सामानाची मोडतोड ग्राउंड रिपोर्ट सत्यशोधक शंकराव लिंगे

रानमसला तालुका माजलगाव जिल्हा बीड या गावातील एकाच रात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास भ्याड नामर्दाने चार नाभिक समाजाची दुकान फोडून कुलूप तोडून दरवाजे तोडून कुराडीने कोयत्याने दुकानातील सर्व फर्निचर तोडफोड करून नाभिक समाजाचे हत्यार मशीन वाटी वस्तारा याची सर्व नाशदूस करून 60 ते 70 हजार रुपये नुकसान मोकार लोकांनी केले आहे आठ दिवसा त्यांचा व्यवसाय बंद होता हातावर पोट असणारा खेडेगावातील नाभिक समाज गावात चारच घर चारच दुकान त्या दुकानांमध्ये अनेक लोक येतात आपले दाढी कटिंग करून जातात त्याचबरोबर अनेक राजकीय पुढारी पण त्या ठिकाणी येतात गप्पा मारून निघून जातात काही दिवसापूर्वी नाभिक समाजाचे झगडे माजलगाव तालुक्याचे अध्यक्ष यांनी बीजेपी चे उमेदवार पंकजाताई मुंडे यांना

नाभिक समाजाचा लिखित पत्राने पाठिंबा दिलेला होता त्याचा राग मनात धरून या नाभिक समाजाची खोड मोडण्यासाठी त्यांच्या दुकानातील सामान फर्निचर याची मोडतोड केलेली आहे कोणतेही सामान चोरीला गेलेले नाही परंतु सर्व सामान फर्निचर आरसे वगैरे तोडलेले दिसतात कुऱ्हाडीचे कच दिसतात कुलूप तोडतानाही त्याच्यावर कुऱ्हाडीचे कच दिसतात हे भ्याड कृत्य जाणून-बुजून प्रकार आहे त्यामुळे या भागातील सर्व ओबीसी बारा बलुतेदार समाज भयभीत झालेला आहे कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास हे दुकानदार तसे तयार नाहीत खाजगी मध्ये सांगतात कॅमेऱ्यासमोर काही बोलायला तयार होत नाहीत

एवढा दबाव या प्रस्थापित समाजाचा या ठिकाणी आहे या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ महिन्यापासून जे अन्यायाचे सत्र मराठ्यांना बेकायदेशीर ओबीसीतूनच आरक्षण मागणी करणाऱ्या झुंडशाही गुंडशाही रानटी लोकांनी चालू केले आहे ते अद्याप थांबलेले नाही यासाठी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे त्यांच्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर नाभिक समाजाचे सोलापूरचे प्रमुख माननीय सुभाष जी राऊत यांनी पीडित दुकानदाराची भेट घेऊन विचारपूस केली वस्तूस्थिती पाहून त्यांना बोलतो केलं आणि त्यांना धीर देण्याच काम या ठिकाणी

ओबीसी संघटनेच्या माध्यमातून झाल यावेळी बोलताना पीडित कटिंग सलून दुकानदार
निलेश खटले प्रदीप खटके गजानन खटले अशोक खटले यांनी घाबरत घाबरत आपल्या व्यथा सांगितल्या आम्हाला भेटण्यासाठी बरेच पक्षाचे पुढारी नेते आले होते मदत करण्याचे आश्वासन दिले आणि निघून गेले परंतु कोणीही अशी ठोस मदत केली नाही गावातीलच काही लोकांनी वर्गणी करून 20 हजार रुपयाची मदत केलेली आहे बाकी आम्ही -पन्नास हजार रुपये घालून परत ते हत्यार आरसे छोटास तात्पुरता स्टूल टेबल फर्निचर वगैरे नवीन विकत आणून धंदा आता आठ दिवसानंतर चालू केलेला आहे अशा रीतीने महाराष्ट्रामध्ये बारा बलुतेदारावर ओबीसींना टार्गेट करून हल्ले होत आहेत याचा आढावा सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी अन्याय झालेले त्या त्या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे

सर्व 12 बलुददार ओबीसी एकच मागणी करत आहेत आम्हाला आमच्या व्यवसायाला संरक्षण द्या ॲट्रॉसिटी कायदा लागू करा गावातील शहरातील जे पण शॉपिंग सेंटर होतील बांधकाम होतील त्या मध्ये काही दुकाने आमच्यासाठी सवलतीच्या दरात शासनाने आरक्षित करून द्यावीत कारण आम्ही प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या प्रस्थापितांच्या जागेवर उघड्यावर कुठेही व्यावसाय करतो त्या ठिकाणी गावातल्या राजकीय लोकांच्या अधिपत्याखाली मजबुरीने गुलामगिरीत त्यांच्या मर्जीतच राहावे लागते स्वतंत्र विचार केला असता आमचे नुकसान होते आमच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो दुकान बंद करण्याची धमकी दिली जाते आम्हाला बोलता येत नाही कोणावर नाव घेता येत नाही कारण आमची गावामध्ये संख्या फार कमी असते
🏴🏴🏴🏴🏴⚫⚫⚫✔✔✔✔
ओबीसी वर अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्याच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टामध्ये शंकरराव लिंगे यांनी तीन याचिका दाखल आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तारापूर नाला पंढरपूर येथे अपंग अनाथ मुलास दिलेली भर चौकात ती फाशी बेकायदेशीर मागणी करत असलेले सगे सोयरे कुणबी मराठा मराठा कुणबी एकच आहेत अशी मागत असलेली सर्टिफिकेट निजामाच्या खोट्या नोंदी मराठा मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागासवर्गीय ठरत नाहीत असा हायकोर्टाचा निकाल आहे तरीसुद्धा गुंडशाही झुंडशाही दबावतंत्राला बळी पडून मतावर डोळा ठेवून सरकार बेकायदेशीर जीआर काढून यांना जे आरक्षण देत आहेत त्याविरुद्ध न्यायालयीन लढाई रस्त्यावरची लढाई शासन स्तरावरील लढाई सध्या चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने छगनरावजी भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते विजयजी वडट्टीवार गोपीचंद पडळकर महादेव जानकर साहेब प्राध्यापक श्रावण देवरे सर प्रकाशजी शेंडगे ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे लक्ष्मणजी गायकवाड प्राध्यापक टीपी मुंडे इत्यादी सर्व पक्षातील मान्यवर नेते लढाई लढत आहेत सर्व सकल समाज ओबीसी नेते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे आपण घाबरण्याचे काहीही कारण नाही सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र लढा दिला पाहिजे एकीचं बळ दाखवून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी वर अन्याय करणाऱ्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे त्याशिवाय अन्याय थांबणार नाहीत असे ठामपणे सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी पिढीताना सांगितले
🏴🏴🏴🏴⚫⚫⚫⚫✔✔✔✔
हायकोर्टातील याचिका सत्यशोधक शंकरराव लिंगे ऍडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते एडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील एडवोकेट मंगेश ससाने लढत आहेत

🔴 **शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴* 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button