सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 35

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
35

 

ओबीसी जातसमूहांत एक सुप्त स्वरूपाचा असंतोष आणि भीती निर्माण झालेली दिसून येते, विविध ओबीसी जातसंघटना आणि ओबीसी नेतृत्वांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या शासनाच्या निर्णयास विरोध केला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजानेही ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. शिवाय मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाक्युद्धाने दोन्ही समाजात तेढ निर्माण होत आहे. मराठा समाज ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत असल्याने ओबीसी आणि मराठा यांच्यातील (विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुणांतील) सहसंबंध ताणले जात आहेत. कारण यातून शिक्षण व नोकऱ्यांत वाटेकरी निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. ओबीसी कार्यकत्यांना वाटते की, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले की नंतर ते राजकीय आरक्षणही घेतील आणि स्थानिक राजकारणात ओबीसींना जी थोडीबहुत सत्तापदे मिळत आहेत, तीही कमी होतील. या भीतीतूनच परस्पर संबंधात संशय निर्माण झाला आहे. शेवटी ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलेच तर, मराठा आणि ओबीसी संघटनांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही तणाव निर्माण होऊ शकतो. परंतु दोन्ही समूहांतील तणावाचे स्वरूप हे स्थानिक पातळीवरील लोकांच्या जागरूकतेचे प्रमाण आणि आर्थिक स्थिती यांवर ठरेल.

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी पुढे आल्यानंतर राज्यात मराठा व ओबीसी यांच्यातील परस्परसंबंध हे निश्चितपणे ताणले गेले आहेत. राज्यात्त मराठा आणि ओबीसी या दोन समूहांमधील राजकारणात स्पर्धात्मकता असली तरी ती परस्परांविरोधात शत्रुभावी पद्धतीने व्यक्त झाली नव्हती. मात्र मराठा मोर्चानंतर निघालेले ओबीसी मोर्चे हे या दोन्ही समूहांमधील संवादी राजकारणाचा अवकाश कमी करणारे ठरले. ओबीसींच्या हक्कांवर आक्रमण झालेच तर ओबीसी व मराठा समाजातील दैनंदिन व्यवहार, विविध सेवाकरीता त्यांच्यातील परस्पर अवलंबित्व यावरही त्याचा प्रभाव पडणार असल्याने धुरीणत्वांनी आणि मागणीकर्त्यांनी विचार केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे यातून मराठा विरुद्ध ओबीसी असे ध्रुवीकरणाचे राजकारण पुढे येत आहे. दोन समाजातील संघर्ष हा प्रस्थापितांना हवाच आहे. दोन समाजाला आपापसात लढवून काही घटकांना सत्ता हितसंबंध साध्य करायचे असतात.

ईडब्ल्यूएस अंतर्गत कोटा हा एक मार्ग

कुणबीकरण, न्यायालयीन लढा, स्थगिती, पुन्हा आंदोलन आणि पुन्हा

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

७४

समिती या सततच्या चक्रात न अडकता ताबडतोबीने पेच सोडविण्याचा मार्ग म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षणात मराठा समाजाला कोटा राखून ठेवणे होय, कोणतेही आंदोलन किंवा मागणी न करता खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत दहा टक्के आरक्षण देण्यात आले. २०११ मध्ये केंद्राने १०३ वी घटनादुरुस्ती करून हा कायदा लागू केला आहे. ओबीसींना राज्यात १९ टक्के आरक्षण आहे. दोन्ही समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता सद्य १९ टक्क्यांमध्ये मराठ्यांना किती वाटा मिळणार आहे आणि ओबीसींना किती वाटा मिळणार आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएस या वर्गवारीतील १० टक्के आरक्षणापैकी ८ ते ९टक्के आरक्षण पूर्णतः मराठा समाजाला राखीव ठेवून काहीअंशी मार्ग निघू शकतो. ईडब्ल्यूएसचे निकष, अटी काटेकोरपणे पाळल्या तर गरीब मराठ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.. कुणबी प्रमाणपत्र किंवा १६ टक्के आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल पण आताची कोंडी फोडण्याचा मार्ग म्हणून धोरणकर्ते व मराठा समाजाने याचा गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे.

कल्याणकारी चौकटीचा विस्तार

५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण अवैध ठरवले. आरक्षण धोरणामागील सामाजिक आशय आणि ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत असल्याने राज्याचा निर्णय घटनात्मकरीत्या अवैध ठरवले, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण मुद्दा असा मांडला आहे की, मागास वर्गाच्या प्रगतीसाठी सरकारी नोकऱ्यात आणि सरकारी शिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेत आरक्षण देणे हेच एकमेव साधन किंवा पद्धती नाही. त्यांच्या सुधारणांसाठी राज्याने इतर उपायही योजले पाहिजेत. न्यायालयच आता मागणीकर्त्यांना इतर मार्गाचा विचार करण्यासाठीदेखील सुचवत आहे. उदा. मागास घटकांच्या सदस्यांना विनाशुल्क शैक्षणिक सुविधा पुरवणे, शैक्षणिक शुल्कात सवलत देणे, मागास घटकांच्च्या उमेदवारांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. अर्थव्यवस्थेच्या खासगीकरण, उदारीकरण या टप्प्यांत सर्व समाजघटकांना सरकारी सेवांत समाविष्टः करण्याच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याने इतर क्षेत्रांतील रोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकासाची संधी उपलब्ध कराव्यात. हा घटनात्मक पेच सोडवायचा असेल तर राज्यसंस्थेला बदलत्या भौतिक हितसंबंधांतून, नव्या अर्थव्यवस्थेतून

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button