सोशल

सत्ता मागून मिळत नाही ती हिसकावून घ्यावी लागते प्रा. हाके यांचे प्रतिपादन भूम येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त सभा

1) सत्ता मागून मिळत नाही ती हिसकावून घ्यावी लागते
प्रा. हाके यांचे प्रतिपादन भूम येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त सभा

भूम: सत्ता ही कधी मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते. सत्ता उपभोगणारे तेच आणि आरक्षण मागणारे ही तेच आहेत. ओ बी सी चे आरक्षण १९९४ रोजी मिळाले आणि हे म्हणतात ७० वर्षांपासून आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यामुळे ओ बी सीसह एस सी व एस टी समाजबांधवांनी एकत्रित येऊन आपल्या एकीची ताकद दाखवली पाहिले असे प्रतिपादन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. ते भूम येथे सोमवारी (दि.२६) नगर पालिकेसमोरील प्रांगणात ओ बी सी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा. हाके यांनी सत्ताधारी व विरोधकांवर टीका केली. आजपर्यंत आपल्या मतांचा उपयोग यांनी सत्ता उपभोगण्यासाठी केला आहे. येथून पुढे आपण आपलाच उमेदवार निवडून दिला पाहिजे.

आरक्षण वाचवायचे असेल तर मतदानाच्या माध्यमातून एकजूट दाखविणे गरजेचे आहे. आपले लोक विविध पक्षात असतात. त्यांना महत्त्व नसणारी पदे दिली जातात. आर्थिक फायद्याची पदे म्हटले की, पाटील, देशमुख पुढे येतात असा आरोप केला. राज्यात जे मराठा आमदार, खासदार आहेत. त्यांना आपण मतदान केले आहे. मात्र ते आपल्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत. ते त्यांची खुर्ची वाचविण्यासाठी जरांगे पाटील यांच्या भेटी घेत आहेत.

मग आपण त्यांच्या पाठीशी का जायचे असा सवाल त्यांनी बहुजनांना विचारला. मराठा समाज हा वतनदारी राखण्यासाठी निजामाकडे गेला होता. त्यामुळे कुणबी नोंदी सापडत आहेत. आरक्षण हे जन्माने जे मागास आहेत त्यांना दिले जाते. मराठा समाज कोठेच मागासपण सिद्ध करू शकलेला नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गजानन सोलंकर, कृष्णा सानप, सतीश बांगर, श्रीराम चौरे, वंचितचे प्रविण रणबागुल, नाना मदने, उमेश मोराळे, रामभाऊ इटकर, भैय्या जानकर, राजाभाऊ देवकते, शहाजी सोलंकर, दादासाहेब मुंढे, उमाकांत सानप, विकास पाटील, पंडित मरकड, श्रीमंत शेळके, राहुल देवकते यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button