सोलापूर

मंडलनामा क्रमशा 56 ■ मिरज येथील निवडणूक प्रचार सभेत अभिवादन करताना चित्रपट अभिनेते दिलीपकुमार.

मंडलनामा
क्रमशा 56

■ मिरज येथील निवडणूक प्रचार सभेत अभिवादन करताना चित्रपट अभिनेते दिलीपकुमार.

कार्यकत्यांनी जीव तोडून प्रचार केला. मिरज विधानसभा मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते प्रचार करण्यासाठी घरून निघताना भाकर बांधून घेत. चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांनी भिवंडी, मिरज, परभणी व नागपाडा येथे जाहीर सभा घेतल्या. त्यांच्या मिरज मतदारसंघात दोन सभा झाल्या. कार्यकत्यांनी जीव तोडून काम केल्यामुळे मिरज व भिवंडी या दोन जागांवर संघटनेचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या चिन्हावर कोकणातील ३९ जागांपैकी फक्त भिवंडीची जागा निवडून आली. समाजवाद्यांकडील दोन जागा काँग्रेसने आमच्यामुळे खेचून घेतल्या. परभणीच्या उमेदवाराने पहिल्या टप्प्यात ‘मुसलमानाला कोण मत देणार’, अशी कच खाल्ली होती. संघटनेच्या कार्यकत्यांनी केलेला प्रचार व दिलीपकुमार यांच्या सभेमुळे लियाकत अन्सारी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ते सुमारे दीड हजार मतांनी पराभूत झाले. बडनेरा येथे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचा उमेदवार असल्यामुळे ओबीसी मतांमध्ये विभागणी झाली. तरीही आमचे उमेदवार बाबू राठोड हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांचाही निसटता पराभव झाला. या निवडणुकीत फक्त ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनमुळे मते मिळाली नव्हती. संघटनेचा हिंदू ओबीसी व दलित संघटनांसोबत संपर्क असल्याने त्यांची मते मिळाली. त्यांचाही या विजयात मोठा वाटा राहिला.

■ प्रचार सभेला जाताना चित्रपट अभिनेते दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी व संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा नसीम महात.

काँग्रेसच्या तिकीटावर संघटनेचे दोन उमेदवार निवडून आल्यामुळे आमच्या अपेक्षा वाढल्या. त्यांच्याकडून संघटनेला मदत होईल, मुस्लिम ओबीसींचे प्रश्न सोडवले जातील, अशी आशा होती. पण ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे त्यांना पक्षाचे ऐकावे लागत असे. संघटनेचे काम केल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते अडवत होते. आम्ही म्हणू तसेच हे दोन आमदार विधिमंडळात काम करू शकत नव्हते. त्यांना काँग्रेस पक्षाचा आदेश पाळणे भाग होते. परिणामी, या दोन आमदारांकडून कार्यकर्त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यांची अनेक ठिकाणी मदतही झाली. हे दोन आमदार संघटनेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर प्रभाव पडायचा. आंदोलनांमध्ये आमदार सामील होत तेव्हा शासकीय अधिकारी, पोलिस दबकून वागायचे. काँग्रेस नेत्यांसोबत भांडण करून हाफीज धत्तुरे यांना मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष करायला लावले. पण ते एवढे सज्जन की, महामंडळाच्या अध्यक्षाने कसे काम करायचे, हेच कळाले नाही. मी नाराज होऊन राजीनामा मागितल्यानंतर धत्तुरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे राजीनामा लिहून माझ्याकडे दिला होता. भिवंडीचे आमदार अब्दुल रशीद ताहेर मोमीन नंतर समाजवादी पक्षात सामील झाले. आमदार निवडून आणूनही चळवळीला फार उपयोग नसतो हे लक्षात आल्यानंतर त्या निवडणुकीनंतर संघटनेने राजकीय प्रयोग केला नाही.
56

■शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button