सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 76

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
76

करून राजाने त्याला तात्काळ हद्दपार करावे, विस्रब्ध ब्राह्मण: शुद्राद् द्रव्योपादानमाचरेत् ।
नाहि तस्यस्ति किंचित्स्वं भर्तृहार्यतधनो हिसः ।
ब्राह्मणाने शुद्राकडून खुशाल द्रव्य / पैसे हिरावून घ्यावेत. शुद्राचे मालकीचे, स्वतःचे असे काहीच नसते. त्याचे सर्व द्रव्य/पैसे मालकांनी हिरावून घेण्यास योग्य असते. म्हणजेच मनुस्मृती संहितेचा शुद्रास धनसंचय करण्यास विरोध होता.

यावरून आपल्या लक्षात येते की, अनेक वर्षांपासून जाती आधारित शोषण, दमन आणि भेदभावी व्यवहार शुद्रातिशुद्र आणि स्त्रीयांसोबत खुशालपणे करण्यास परवानाच होता, असे करणा-यास बक्षिसी मिळत असे व आजही मिळते आहे. वर्तमानात आपल्या आजूबाजूला विशेषतः राजकारणात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र अपराधीस शिक्षेची तरतुद नव्हती. अशी मनुस्मृतीसारख्या अनेक धर्मग्रंथांनी आवर्जून सांगितले आहे. आपण इतिहासात डोकावले तर संपूर्ण देश परकीय सत्तांच्या गुलामीत राहिला आहे. याची उच्चजातींनी काळजी न वाहता निम्नजातीच्या शोषण अन्याय अत्याचारातच धन्यता मानली आहे. आजही जातीयतेचे विष भारतीय समाजातील चालीरीती, रूढी-परंपरा आणि व्यवहारात अस्तित्वात असल्याचे पदोपदी आढळते.

मनुस्मृतीच्या भयावह अंधार युगाच्या दंड संहितेला आधुनिक भारतात महात्मा जोतीराव फुले यांनी हादरा दिला. भारतात पहिल्यांदा महात्मा जोतीराव फुले यांनी आरक्षण धोरणाची पायाभरणी केली. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या माध्यमातून आरक्षण विषयक संकल्पना ब्रिटिश सरकार समोर मांडली. शूद्रातीशूद्रांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, म्हणून विशेष बक्षीसांची व शिक्षण सवलती सोबत सरकारी नोकऱ्यांतही जातीच्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली होती. ते गुलामगिरी ग्रंथात म्हणतात – ‘अनुभव स्वतां लक्षून ।। सांगतों खरें निक्षून ।। सर्व जाती निवडून ।। घ्यावा ब्या प्रमाण ।। द्यावी कामे नेमून ।। होईल सुख साधन ।। चाल ।। घालितों पदरी चुकीस ।। नेमितां एका जातीस ।। प्रवेश नाहीं शुद्रास ।। चाल ।। एका जातीचे सर्व मिळून नाडीती ।। बाकीचे तोंडाकडे पहाती ।। जोतीराव बोधी करू नये । एक जात भरती ।। भरिती होळकरी पोतीं ।।”

छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य-दलितांना शिक्षण तर खुले केले, वसतिगृहे काढलीत, शिष्यवृत्ती सुरू केली. तसेच बहुजनांसाठी २६ जुलै १९०२ साली आपल्या कोल्हापूर संस्थानात सन्मानाच्या जागी नोकऱ्यात ५० टक्के प्रतिनिधित्व दिले. पुढे १९२० मध्ये त्यांनी राखीव जागाचे प्रमाण वाढवले. शाहू महाराजांनी नगरपरिषद निवडणूकीत प्रत्येक जातीतून लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघाची निर्मिती केली. निवडून आलेल्या ४७ उमेदवारांमधून दत्तोबा पोवार या चांभार जातीच्या उमेदवारास नगराध्यक्ष केले. ख-याअर्थाने त्यांनी सामाजिक न्यायाची प्रस्थापनाच केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म. फुले राजर्षी शाहु महाराज यांच्या विचाराला गतिमान केले. त्यांनी अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत राखीव जागा आणि राजकीय हक्काशिवाय खरी समता अस्तित्वात येणार नाही या भूमिकेतून राजकीय आरक्षणाची घठनात्मक तरतूद केली. पण या जातीं व्यतिरिक्त असंख्य अशा जाती आहेत. ज्या आपल्या हक्क – अधिकारांपासून कोसो दूर होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या जातींना (SEBC) मागास जाती संबोधुन त्यांच्या उत्थापनासाठी निश्चित असा कार्यक्रम राबवावा, म्हणून भारतीय राज्यघटनेत ३४० व्या कलमाची तरतूद केली होती. त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाठपुरावा करुनही या मागासांसाठी सरकार आयोग नेमत नाही, त्यांच्या उत्थापनासाठीचा कार्यक्रम राबवत नाही. शेवटी नाराजी व्यक्त करुन त्यांनी ओबीसीसाठी आपल्या केंद्रीय कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याची फारशी चर्चा झाली नाही. कारण स्पष्ट आहे. ओबीसी मोठी जनशक्ती असल्याने त्यामधून ओबीसी जागृत होतील आणि आपला वाट्याची मागणी करतील. परिणामी, प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी १९५३ साली ‘काका कालेलकर’ यांच्या अध्यक्षतेखाली भारतभरातील जातींचे मागासलेपण शोधण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नेमला. या आयोगाने भारतभर सर्व्हेक्षण करुन एक महत्वपूर्ण अहवाल सरकारला सादर केला. परंतु, जातीवादी काकासाहेब कालेलकर यांनी खास टिप्पणी करुन त्यात ओबीसींच्या आरक्षणाला विरोध दर्शविला आहे. त्याप्रमाणे सरकारने कालेलकरांचे ऐकून ओबीसींचा घात केला. नंतरत्त्या सरकारांनी हीच परंपरा पुढे कायम ठेवली. सन १९७७ साली काँग्रेसतर मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले.

सरकारमध्ये निवडून आलेल्या ओबीसी खासदारांचा प्रभाव असल्याने जनता दलाच्या जाहीरनाम्यानुसार ओबीसींना आरक्षण मिळेल असे वाटले, पण झाले उफराटेच. ओबीसींसोबत पुन्हा डावपेच आखला गेला. काकासाहेब कालेलकर आयोग बासनात गुंडाळून पुन्हा १९७९ साली बिदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button