सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग सहावा

*सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग सहावा*
शोधकांना परिचय प्राप्त करून घेण्याचा मार्ग सुकर होतो. हायशोधक नामावलीच उपलब्ध होत असल्याने इत्थंभूत परिचय हाती लागत नाही. पुढे पं. सी. सोनी इ.स. १९३८ मध्ये महात्मा फुले यांचे अल्पचरित्र प्रसिद्ध केले. या १९२७ सालच्या प्रभातील ‘सत्यशोधक समाजाची स्थापना’ है प्रकरण प्रसिद्ध तर केले, मात्र नेमकी १२४ सत्यशोधकांची नामावली गाळली! कांच्या परिचयाच्या सोतासंदर्भात असे का व्हावे? हेच समजत
दरम्यान, १९१७ नंतर जवळपास ६० सत्यशोधक नियतकालिके निघाली. मात्र, तीन-चार नियतकालिकांचा अपवाद वगळता शेष पत्रांच्या संचिका आज दुर्मिळ झाल्या आहेत. त्यामुळे सत्यशोधकांचे अंतरंग चित्रित करण्याचे काम आणखीच अवघड झाले आहे.
पुढे १९३३ साली सत्यशोधक समाजाचा हीरक महोत्सव येत असल्याने कोल्हापूर सत्यशोधक शाखेने ‘सत्यशोधक-हीरक महोत्सव ग्रंथ’ माधवराव खंडेराव बागल यांच्या संपादनाखाली १९३३ साली प्रसिद्ध झाला. याच सुमारास विदर्भ सत्यशोधक महोत्सव ग्रंथही संपादक – सत्यशोधक बाबूराव तात्याजी भोसले यांनी नागपूरहून प्रसिद्ध केला. या दोन्ही महत्त्वपूर्ण सत्यशोधकी ग्रंथावरून सत्यशोधक चळवळीचे बरेचसे धागेदोरे हाती लागतात. मात्र सत्यशोधकांचा संगतवार परिचय येथेही काहीअंशी हाती लागत नाही. या दोन्ही ग्रंथांमुळे सत्यशोधक अभ्यासकाच्या अंतरंगाची पाऊलवाट तयार होते, एवढे मात्र खरे.
१९८८ सालानंतर संपन्न होणाऱ्या (विसावे ते सत्तावीसावे अधिवेशन) जवळपास संपूर्ण अधिवेशनाच्या स्मरणिका उपलब्ध असल्याने सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने थोडाबहुत माहितीचा स्त्रोत हाती लागतो. या स्मरणिकांमधून सत्यशोधक चळवळीवरील लेख, काही सत्यशोधकांवर लेख, त्यांचे कार्य, त्यांचे ग्रंथ आदींचा काहीसा परिचय होत राहतो. पुढे मान्यवर सत्यशोधकांवर स्वतंत्रपणे ग्रंथ प्रसिद्ध झाले. एम. फिल., पीएच. डी.साठीही सत्यशोधक चळवळीवर लेखन होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.
अशा अनुकूल वातावरणात
करानेपारखून आणि अनेकांचे सहकार्य घेऊन हा सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या चरित्राचा वाङ्मयीन प्रकल्प उभा केला आहे. खरेतर परिस्थितीसापेक्ष, सत्यशोधकांचे सामाजिक कार्य खरोखरच क्रांतिकारक आहे. स्वपरिवार, भावकी, समाज, गाव यांच्याशी प्रसंगी समझोता, प्रसंगी सामना करत तो सत्यशोधकी चळवळ खळखळत ठेवत राहिला, दलित-बहुजनाला ज्ञानी, विज्ञानवादी करण्यासाठी त्याने सत्यशोधकी ग्रंथसंपदाही निर्माण केली. सत्यशोधकांचे शेकडो, हजारो ग्रंथ प्रसिद्ध झाले. कुणाची भीडमुर्वत न ठेवता या वाड्मयातून सत्यशोधकी तत्त्वज्ञान प्रसिद्ध झाले; मात्र सत्यशोधक लेखकाने स्वतःचा बायोडाटा या ग्रंथांतून प्रसिद्ध मात्र केला नाही. त्यामुळे साहजिकच सत्यशोधक लेखकांचा परिचय बांधण्याचा वाङ्मयीन प्रकल्प कठीण बनला. तसेच सत्यशोधकांनी (एखाद दुसरा अपवाद वगळता) आत्मपरिचय हा वाङ्मयीन प्रकार हाताळला नाही. एखाद्या-दुसऱ्या सत्यशोधकाने आठवणींच्या अंगाने (पां. चि. पाटील थोरात, वा. रा. कोठारी) आठवणी शब्दबद्ध केल्या. या आठवणींचा परीघ पूर्वाश्रमीचे संपूर्ण जीवन असल्याने सत्यशोधक कार्यावर फारसा प्रकाश प्रस्तुत लेखकांनी टाकला नाही, त्यामुळे या आठवणीवजा ग्रंथातून, सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने जुजबी माहिती हाती लागते, हेही नसे थोडके.
सत्यशोधक चळवळीचा मुळाबरहुकूम इतिहास सिद्ध व्हावा म्हणून मुंबई येथे भरलेल्या १९४० सालच्या १५ व्या सत्यशोधकी अधिवेशनात सत्यशोधक चळवळ इतिहास लेखनाचा ठराव पारीत करण्यात आला. ग्रंथलेखनासाठी मुकुंदराव पाटील, ना. भास्करराव जाधव, पंढरीनाथ सीताराम पाटील, लक्ष्मणराव देवराव ठोसर आदींची ग्रंथलेखन समिती गठित करण्यात आली होती; मात्र हा सत्यशोधकी वाङ्मयीन प्रकल्प मार्गी लागला नाही. यापूर्वी हडपसर येथील सत्यशोधक सी. र. तारकुंडे यांनी ‘ब्राह्मणेतर व मराठे ह्यांच्या चळवळीचा पूर्वेतिहास आणि मराठ्यांची पूर्वपीठिका’ हा सत्यशोधक चळवळीवरील ग्रंथ इ. स. १९२२ साली प्रकाशित केला होता. स्मरणाच्या अंगाने शब्दबद्ध केलेल्या या प्रस्तुत ग्रंथात सत्यशोधक चळवळीचा इत्थंभूत इतिहास सामावला गेला नाही. तद्नंतर अनेक सत्यशोधकांनी प्रस्तुत विषय ऐरणीवर घेऊन सत्यशोधकी नियतकालिकांमधून लेखन केले; मात्र कालौघात हे लेखन दुर्मिळ झाले.
दुसरीकडे सत्यशोधक नियतकालिकांनी समकालीन सनातनी प्रवृत्तीचा आपल्यापरीने पूर्ण बंदोबस्त केला;
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
*संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८* ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴*




