राजकारण

नितीशकुमार आहेत कुठे ?

नितीशकुमार आहेत कुठे ?

गॉसिप

जप आणि त्यांच्या नेतृत्वाखालील आधाहीकडून ४०० भावार जागांचे गगनभेदी दावे केले जात असताना भाजपच्या प्रमुख आधाही नेत्यांपैकी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार कुठे आहेत, असा प्रश्व अनेकांना पडला असेल. हा प्रश्न उचितही आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची बोलणी सोडून नितीशकुमार लंडनला वैद्यकीय उपचारांसाठी गेल्याचे आता उघड झाले आहे. तिथून ते परतले आहेत आणि प्रचारात सह‌भागीही होत आहेत. परंतु आता ते पूर्वीचे आक्रमक, सडेतोड, हजरजबाबी आणि चतुर नितीशकुमार राहिल्याचे दिसत नाही. त्यांना विस्मृतीच्या विकाराने ग्रासल्याचे आता त्यांचे निकटवर्ती सांगू लागले आहेत.

किती दुर्दैवी? नितीशकुमार यांनी कितीही राजकीय कोलांटउड्या मारलेल्या असल्या तरी ते एक लोकप्रिय राजकीय नेते आहेत आणि बिहारसारख्या राज्याच्या राज्य कारभारावर त्यांनी आपली छाप सोडली आहे, हे नाकारून चालणार नाही.

नितीशकुमार यांच्या वागण्या-बोलण्यात त्यांच्या या विकाराची लक्षणे आता स्पष्ट दिसू लागली आहेत. नुकतीच बिहारमध्ये नवादा येथे पंतप्रधानांची प्रचारसभा झाली. नितीशकुमार यांनी पंधरा मिनिटे कसेबसे भाषण केले आणि ते त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्यानंतर शेजारीच बसलेल्या

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची औपचारिक तारीफ केली. त्यावर नितीशकुमार यांनी हात जोडून त्याचा स्वीकार केलाच, पण मोर्दीच्या गुडघ्यापाशी वाकून त्यांना अभिवादनही केले. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे समर्थक आणि विरोधक देखील काहीसे चकित होणे स्वाभाविक होते.

कारण नितीशकुमार हे पायलागू संस्कृतीचे पाईक नाहीत

सत्याग्रही विचारधारा मे २०२४ । ६२

फिरस्ता

हे सर्व जण जाणतात. तसेच पंतप्रधान व नितीशकुमार हे समवयस्क आहेत. त्यामुळे ही कृती अपेक्षित नव्हती. परंतु त्यांच्या या कृतीमुळे लोकांना आता त्यांच्या प्रकृतीबद्दल

चिंता बाटायला लागली, हे निश्चित. त्यांच्या निकटवर्तीयाच्या सांगण्यानुसार आता त्यांना अनेक

वेळेस काही गोष्टी अचानक आठवेनाशा होतात. ते इतरांची नावे विसरतात. कधी कधी संदर्भही विसरतात. अचानक उत्तेजितपणा, त्रागा, चिडचिड, संताप अशी लक्षणे त्यांच्या स्वभावात दिसून येऊ लागली आहेत.

हा निकटवर्तीय नितीशकुमारांना भेटला असता त्यांनी त्याला ओळखले आणि प्रकृतीची चौकशी केली. त्यावर त्यानेही त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केल्यावर ते काहीशा संकोचाने किंवा खजील होत ‘ठीक आहे’ असे म्हणाले.

खरे तर या प्रकृतीबद्दल त्यांच्या समर्थकांनी व विरोधकांनीही काहीशा माणुसकीने पहावे अशी अपेक्षा त्यांचे निकटवर्ती व्यक्त करीत आहेत. परंतु नितीशकुमारांचे विरोधक लालूप्रसाद आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यांनी मात्र अलीकडच्या काही सभांमध्ये त्यांच्या प्रकृतीबद्दल काही टिप्पण्या व शेरेबाजी केल्याचे सांगितले जाते.

योगायोग कसे असतात ते पहा.

ज्यांचे बोट धरून नितीशकुमार यांनी बिहारमध्ये लालूप्रसाद विरोधी राजकारण सुरू केले, त्या जॉर्ज फर्नांडिस यांनाही त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात विस्मृती किंवा स्मृतिभ्रंशाने ग्रासलेले होते. त्यावेळी नितीशकुमार यांनी फर्नांडिस यांना फारशी चांगली वागणूक दिलेली नव्हती. आता स्वतः नितीशकुमार त्याच विस्मृतीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

याला काळाचा महिमा एवढेच म्हणावे लागेल.

🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button