सोशल

अखिल भारतीय माळी महासंघाचा मराठवाड्यात झपाट्याने विस्तार! मा. गणेश आसाराम हरकळ यांची जालना जिल्हाध्यक्षपदी निवड; ओबीसी जनगणना व प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाभर जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

अखिल भारतीय माळी महासंघाचा मराठवाड्यात झपाट्याने विस्तार! मा. गणेश आसाराम हरकळ यांची जालना जिल्हाध्यक्षपदी निवड; ओबीसी जनगणना व प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाभर जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

अखिल भारतीय माळी महासंघाच्या संघटन विस्ताराला मराठवाड्यात वेग आला असून मा. गणेश आसाराम हरकळ (रा. राजूर गणपती, ता. भोकरदन, जि. जालना) यांची जालना जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मा. रमेश माळी (विश्वस्त तथा नांदेड जिल्हाध्यक्ष) आणि मा. कार्तिक बेहेरे (मराठवाडा विभागीय अध्यक्ष) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विश्वस्त मा. विठ्ठलजी तोडकर, विश्वस्त मा. शिवशंकर काऊलकर, मा. गोविंदराव वैराळे, मा. विठ्ठलजी सातव, मा. प्रभाकरजी सातव, शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. मनीषजी गिऱ्हे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मा. सौ. वसुधा रामकृष्ण येनकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. अभय तायडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. केशवराव सोनुने, प्रदेश संघटक (डॉ. आघाडी) मा. डॉ. गजाननजी अजगर, प्रदेश संघटक मा. जनाबापू मेहेत्रे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष (घाटावरील) मा. विजय राजाभाऊ खरात आणि बुलडाणा जिल्हाध्यक्षा महिला आघाडी मा. सौ. प्रिती विशाल खंडारे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानंतर आता जालना जिल्ह्यातही संघटन विस्तार झाल्याने मराठवाड्यात अखिल भारतीय माळी महासंघाची ताकद अधिक वाढत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नव्याने निवड झालेले जिल्हाध्यक्ष मा. गणेश हरकळ यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी बैठका घेऊन जातनिहाय जनगणना, ओबीसींच्या प्रलंबित मागण्या, अन्याय-अत्याचाराविरोधातील लढा आणि तालुकास्तरावर संघटन विस्तार यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लवकरच सर्व तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करून तहसीलदारांमार्फत ओबीसींच्या विविध मागण्यांची निवेदने सादर केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मा. गणेश हरकळ यांच्या निवडीचे जालना जिल्ह्यासह मराठवाडाभर स्वागत होत असून विविध सामाजिक, राजकीय व संघटनात्मक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🖋️ संपादकीय संदेश

मराठवाड्यात अखिल भारतीय माळी महासंघाचा वाढता विस्तार ही सामाजिक संघटन बळकट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. संघटन मजबूत होत असताना समाजातील प्रश्न लोकशाही मार्गाने मांडणे, ओबीसींच्या घटनात्मक हक्कांसाठी जनजागृती करणे आणि गावपातळीवर संघटन उभारणे ही काळाची गरज आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजहिताला प्राधान्य देत सर्व घटकांना सोबत घेऊन सकारात्मक कार्य करावे, हीच अपेक्षा.

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 संपर्क : 7387737801

👉 हा क्रमांक आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👉 बातमी लाईक, शेअर, सबस्क्राइब, फॉरवर्ड आणि कमेंट करा.
👉 बेल आयकॉन दाबा आणि दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल व ग्रुप फॉलो करायला विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button