सोशल

🎭 अस्तित्व रंगसाधक पुरस्कार २०२६ जाहीर; ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई कणे यांचा गौरव, पत्रकार परिषदेत पुरस्कार सोहळ्याची माहिती

🎭 अस्तित्व रंगसाधक पुरस्कार २०२६ जाहीर; ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई कणे यांचा गौरव, पत्रकार परिषदेत पुरस्कार सोहळ्याची माहिती

सोलापूर | प्रतिनिधी

अस्तित्व मेकर्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा ‘अस्तित्व रंगसाधक पुरस्कार २०२६’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई कणे यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमी, संगीत नाटक आणि बालनाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हा पुरस्कार सोहळा दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा आणि शाल असे असून, रंगभूमीची परंपरा जपणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेस ॲड. बसवराज सलगर, सुनील गुरव, अमोल धाबळे, सचिन जगताप, अशपाक नदा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

📲 आपला नंबर 7387377801 दिनबंधू न्यूजच्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच जोडा.

👍 बातमी लाईक करा
↗️ शेअर करा
▶️ सबस्क्राईब करा
📤 फॉरवर्ड करा
💬 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा

📢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनेल आणि ग्रुप फॉलो करायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button