सोशल

चना प्रस्तावना

चना प्रस्तावना

देवलोकासाठी बसवण्णा हेच दैवत मर्त्यलोकासाठी बसवण्णा हेच दैवत नागलोकासाठी बसवण्णा हेच दैवत मेरूगिरी, मंदारगिरी आदी पर्वतांसाठी बसवण्णा हेच दैवत चन्नमल्लिकार्जुन देवा तुमच्यासाठी, माझ्यासाठी, समस्त शरणांसाठी

बसवण्णा हेच दैवत पहा.

– अक्क महादेवी

(समग्र वचन संपुट: ५ वचन क्रमांक : २४० )

महात्मा, विश्वगुरू, जगद्ज्योती, कायक योगी, क्रांतियोगी, विश्वज्योती आणि लिंगायत धर्मपिता याशिवाय विविध विशेषणांनी बसवण्णा या नावाच्या विभूतीला ओळखले जाते. मात्र त्यांचे सर्वांत रूढ आणि आपुलकीचे नाव बसवण्णा होय. अण्णा हे आदरार्थी विशेषण. अण्णा म्हणजे थोरला बंधू. म्हणूनच तर बसवण्णांना १२ व्या शतकापासून घराघरांत अण्णा बसवण्णा या रूपाने लोकमान्यता मिळाली. साऱ्या जगाचेच थोरले बंधू म्हणून बसवण्णा जगद्ण्णा असा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांनी समस्त मानवजातीच्या उत्थानासाठी कुटुंबातील थोरल्या बंधूच्या जबाबदारीप्रमाणे कल्याणकारी समाजरचनेची उभारणी केली. म्हणूनच बसवा हे नाव मानवतेचा मंत्र बनला.

बसवण्णा करुणेचा सागर होते. त्या करुणेनेच ज्वालामुखीपेक्षाही दाहक विचारांना जन्म दिला होता. धर्माच्या नावाने सर्वसामान्य माणसां

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button