राजकारण

समीर भुजबळांना मंत्रिपदाची संधी? राष्ट्रवादीच्या बैठकीतील उपस्थितीमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात राज्यसभा उमेदवारी आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठ्या घडामोडी सुरू असताना समीर भुजबळ यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली असून, त्यांना मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चांना जोर आला आहे.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. त्याचवेळी, छगन भुजबळ राज्यसभेत गेल्यास समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आल्याची राजकीय चर्चा सुरू होती.

देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळही उपस्थित होते. विशेष म्हणजे अशा उच्चस्तरीय बैठकीत त्यांची उपस्थिती प्रथमच ठळकपणे दिसल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.

समीर भुजबळ हे नाशिकचे माजी खासदार असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. ते छगन भुजबळ यांचे पुतणे असून मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.

दरम्यान, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभा उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या राज्यसभा प्रवेशाची चर्चा थांबली असली, तरी समीर भुजबळ यांच्या संभाव्य मंत्रिपदाबाबतच्या चर्चा पूर्णपणे संपलेल्या नाहीत. पक्षातील आगामी राजकीय नियुक्त्या किंवा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यांचे नाव पुन्हा पुढे येऊ शकते.

सध्या मात्र समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांच्या बैठकीतील उपस्थितीमुळे आणि भुजबळ कुटुंबाच्या वाढत्या राजकीय सक्रियतेमुळे या चर्चांना उधाण आले आहे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button