सोशल

बाबासाहेबांच्या घराण्याला साथ द्या हो बाळासाहेबांची..ही शेवटची निवडणुक आहे…* *यश भालेराव*

*बाबासाहेबांच्या घराण्याला साथ द्या हो बाळासाहेबांची..ही शेवटची निवडणुक आहे…*
*यश भालेराव*
———————————-
*राखीव जाग्यावरील मतासाठी ज्या एस.सी एस.टी समाज्याकडे हे प्रस्थापित राजकारणी नेते पाहत होते.. आणि जाता जात नाही ती जात अशी जातीची स्थिती होती.. अशा वेळेस बाळासाहेबांनी अकोला जिल्हातुन ओपन (सर्वसामान्य मतदार संघातुन निवडणुक लढवत आहे.. प्रस्थापित राजकारणी लोक आपल्याला राखीव जागेवर ही सपोर्ट करत नाही तर सर्वसामान्य जागेवर सपोर्ट कसा करणार.. अशा परिस्थितीत बाळासाहेबांनी या अकोला जिल्हात मात्र सोशल इंजिनिअरींग चा प्रयोग यशस्वी केला आणि जि.प आणि मनपा मध्ये काही वर्षे वेगवेगळ्या जाती समुहाला प्राधान्य देऊन सत्ता मिळवली …*
*आणि सत्ता मिळाल्यानंतर ती सत्ता सर्वसामान्य लोकांकरीता शिक्षण,आरोग्य,आणि शेतकरयाकरीता प्राधान्य दिले,,,*
*यासाठी 44 वर्षे राजकारणात आहे..*

*सध्या मुस्लिम समाज्याचे औसवी असु द्या ..मराठा समाजाचे जरांगे पाटील असु द्या. कि ओ.बी.सी समाज्याचे प्रकाश शेंडगे असु द्या या मातब्बर नेत्यांनी बाळासाहेबांना सपोर्ट करावा म्हणुन आवाहन केले आहे……*

*पण आपल्याच समाज्यातील काही हाताच्या बोटावर मोजता येईल इतके शिकलेले, अतिहुशार,मात्र बाळासाहेबांना विरोध करत आहे…*

*स्वाभिमानी मनाने विचार करा*
———————————-
*1) महाराष्ट्रात 2000 नंतर आंबेडकरी राजकीय पक्षाचा कोणता नेता स्वबळावर खासदार झाला का?*
*2) महाराष्ट्रात अशा कोणता आंबेडकरी विचारांचा राजकीय पक्ष आहे का ज्यांनी किमान 40 लाखापेक्षा जास्त मतृ घेतली.*
*3) ते घटना बदलतील ,ते आपल्यावर अन्याय अत्याचार करतील अशी भिती दाखवुन प्रस्थापित राजकीय पक्षाने आतापर्यत आपली मते घेतली. आपली राजकीय वेगळी ओळख निर्माणच करु दिली नाही..*
*4) राजकारणात ते तुम्हाला एखादी राज्यसभा देतील एखादी विधानपरिषद देतील .पण तुमचा राजकीय पक्ष वाढवुन देणार नाही.*
*5) जरा विचार करा आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य जागेवर किमान सदस्याकरीता किंवा सरपंच पदाकरीता उभे उभे रहा..*
*बघा त्यावेळी गावातील लोकांची मानसिकता..*
*आणि हिच मानसिकता पुर्ण बहुजनवादी आंबेडकर वादी बाळासाहेबांनी अकोल्यामध्ये केले. ईतर जाती धर्मातील नेते समाजकारणी बाळासाहेबांना सपोर्ट करतात..*
*पण ज्याला गल्लीत कोणी ओळखत नाही तो मात्र बाळासाहेबांना विरोध करतो.*.
*6) जरा विचार करा बाबासाहेबांनतर आणि दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर पुन्हा एकदा आंबेडकरी विचारांचा स्वाभिमानी नेतृत्व आणि आंबेडकरी विचारांची एक राजकीय पक्ष उभा राहतोय… यावेळी सपोर्ट करा..*

*7) अजुन किती वर्षे विजय मिळणार नाही या भितीने घाबरुन विचार दुसरयांच्या उकिरड्यावर राहणार आणि तेथेच जेवणार त्याच्या वळचणीला बसणार…*
*जरासा स्वाभिमान शिल्लक असेल तर कधीतरी विचार करा.*.
*आंबेडकरी विचारांचे आज ही एक मोठा मिडीया तर आपण उभा करु शकलो नाही.. पण हा मिळणारा सोशल मिडीयाचा उपयोग करुन बाळासाहेबांना आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांना सपोर्ट तर करु शकतो.*
*8) विचार करा खैरलांजी घडवली गेली त्याही वेळेस केलेल्या आंदोलनात प्रस्थापित राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या बाजुने कधीच आंदोलने केली नाही.. ज्या आपण आंदोलन केले म्हणुन आपल्याला नक्षलवादी बोलले त्यामुळे एका आमदारांनी राजीनामा दिला तेच चळवळीतुन पुढे आलेले आमदार सध्या भाजपला सपोर्ट करतात,. किती शिकांतिका*
*9) चळवळीतील एका नेत्याला खासदारकीच्या वेळी प्रस्थापितांनी पाडले म्हणुन याचा बदला घेण्यासाठी ते डायरेक्ट भाजपमध्ये गेले.*
*10) काँग्रेसने मुख्यमंत्री केले पण मुळातच तो नेता हिदुत्ववादी विचारांचा होता त्याच नेत्याने 2019 मध्ये बाळासाहेबांच्या विरोधात अकोल्यामधुन एक उमेदवार दिला म्हणुन बाळासाहेब पडले*,
*11) आज ही बाळासाहेबांच्या विरोधात जे आधी भाजपमध्ये होते त्याच पटोलेनी पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब हे आघाडीत नको म्हणुन खरगेंना अहवाल दिला होता.जरांगे पाटील यांचा बाळासाहेबांना सपोर्ट करतील म्हणुन जाणुनबुजुन (मराठा )पण कट्टर आर.एस.एस चा एक व्यक्ती आणि कट्टर हिदुत्ववादी नेता बाळासाहेबांच्या विरोधात आता उभा केला आहे.तरीही स्वाभिमान गहाण टाकलेले,प्रस्थापिताच्या उकीरड्यावर राहणारे काही तथाकथित स्वयंघोषित आंबेडकरी व्यक्ती बाळासाहेबांवर टिका करतात,,*

*शेवटचे एकच छत्रपती शाहु महाराजांचे कार्य म्हणुन आताचे जे शाहु घराण्यातील शाहु महाराजांना निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिकिट तर दिलेच पण त्यांच्यावर प्रस्थापितांपासुन विरोधक कोणीही टिका करत नाही..*
पण
*बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील बाबासाहेबांचे नातु प्रकाश आंबेडकर यांच्यावर मात्र आपल्यातीलच काही समाजकंटक/ आणि प्रस्थापितांचे दलाल मात्र टिका करताना दिसतात.*.

*बाबासाहेबांविषयी अभिमान असेल तर बाळासाहेबांना सपोर्ट करा …कारण बाबासाहेबांनंतर पुन्हा एकदा स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ बाळासाहेब उभे करत आहे.यासाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सपोर्ट करा..आपला विजय नक्की आहे*

*बाळासाहेबांची ही शेवटीच निवडणुक आहे..*

*आजही बाबासाहेबांचे घराणे एकत्रच आहे. बाबासाहेबांचे नातु बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहे. एकाच विचाराचे तीन ही भाऊ आहेत एकमेकांसगे त्यांचे छान जमते.. अशा वेळी बाबासाहेबांनी जर आपल्यासाठी खुप केले तर आपण बाबासाहेबांच्या घराण्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी हि सहकार्य केलेच पाहिजे…नाहीतर काही घराणे बघा.(बारामती).*
*आपलाच*
*यश भालेराव*
*9067047333*

*बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुमच्या मनात जर आदर असेल तर ही पोस्ट नक्की पुढे पाठवाच बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देण्यास काहीच हरकत नाही परंतु त्यांनी यापुढे जडणगेला साथ देऊ नये असं जाहीर करावं मग सर्व ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे आपोआप येईल आणि त्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही बेकायदेशीर मागणी करणारा जरांगे त्याच्या पाठीमागे राहू नये मराठ्यांना साथ देऊ नये ही नम्र विनंती बाकी तुमची मर्जी त्यांनी काय करावं ते आपण सांगू शकत नाही*

शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button