सोशल
नको फेकू त्यांच्या पुतळ्यावर शाई ! त्यांच्या मुळेच शिकत आहे आपली आई आणि ताई !!

नको फेकू त्यांच्या
पुतळ्यावर शाई !
त्यांच्या मुळेच शिकत आहे
आपली आई आणि ताई !!
नको फेकूस त्यांच्या
पुतळ्यावर शाई !
आभाळा एवढे कार्य त्यांचे
काळ्या शाईने मिटणार नाही!!
नको फेकूस त्यांच्या
पुतळ्यावर शाई !
ऊंची त्या महात्म्याची,
तुला कधीच गाठता येणार नाही!!
नको फेकूस त्यांच्या
पुतळ्यावर शाई !
त्यांच्या मुळेच घरोघरी वाहते
शिक्षणाची गंगा ही !!
नको फेकूस त्यांच्या
पुतळ्यावर शाई !
त्यांच्यामुळेच उद्धरली
बहुजनांची कुळे ही !!
जय जोती जय क्रांती.
– परमेश्वर बनकर, बीड 9503288282

[gspeech-button]



