सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः १ ० ४

दिवस त्यांचे वास्तव्य नागपूर शहरात राहिले. नागपूर येथील वास्तव्यात ‘क्रांतीचे रणशिंग’ ग्रंथातील आरंभीच्या तीन प्रकरणांचा १०४ पानांचा मजकूर लिहून पूर्ण केला. तसेच त्यांच्या संपादनाखाली एक वर्तमानपत्र काढण्याचे ठरविल्याने ‘पुण्यास जाऊन – परततो’ असा शब्द सत्यशोधक बाबूराव तात्याजी भोसले यांना देऊन जवळकर पुण्यास गेले; परंतु पुणे येथे जवळकर रक्तक्षयाने आजारी पडले. या आजारात वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी म्हणजे ३ मे १९३२ रोजी रात्री दहा वाजता पुणे मुक्कामी हा कडवा सत्यशोधक निर्मिकाचे जग सोडून गेला. जवळकरांच्या निधनाचे दुःख पचवून बाबूराव भोसले यांनी ‘क्रांतीचे रणशिंग’ हा ग्रंथ पूर्ण करून २५ डिसेंबर १९३३ रोजी प्रसिद्ध केला. या ग्रंथाला भोसले यांनी जवळकरांचे आत्मचरित्रही जोडले आहे. जवळकरांच्या मृत्यूवर वर्तमानपत्रांनी श्रद्धांजलीपर लेख लिहिले. काहींनी नेहमीच्या सनातनी लेखणीतून जवळकरांचे कर्तृत्व वर्णिले. मात्र पुण्याच्या ‘ज्ञानप्रकाश’ ने (५-५-१९३२) जवळकरांना यथोचित श्रद्धांजली अर्पण केली.

संदर्भ – १. देशाचे दुष्मन-दिनकरराव जवळकर, २. सत्यशोधक-का- ख्रिस्त सेवक ? -ग. म. नलावडे, ३. विदर्भ हीरक महोत्सव ग्रंथ संपादक – बाबूराव भोसले, ४. छत्रपती पद्यसंग्रह दिनकरराव जवळकर, ५. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य डॉ. अशोक चोपडे, ६. परिवर्तनाची क्षितिजे संपादक डॉ. एस. एस. भोसले, ७. सत्यशोधक दिनकरराव जवळकर समग्र वाङ्मय- संपादक-डॉ. सारनाथ सौंदडकर

जाधव

भास्करराव विठोजीराव

(१७ जून १८६७-२६ जून १९५०)

फुलेतर कालखंडातील एक बिनीचे सत्यशोधक, सत्यशोधक समाजाचे एक भूतपूर्व अध्यक्ष, कोल्हापूर सत्यशोधक शाखेचे एक आधारस्तंभ, सत्यशोधक अधिवेशन चळवळीचे मुख्य प्रेरक, उच्चविद्याविभूषित-विद्याव्यासंगी, मनाने नम्र- रुजू सत्यशोधक लेखक, विचारवंत नामदार भास्करराव विठोजीराव जाधव यांचा जन्म सोमवार, दिनांक १७ जून १८६७ रोजी मौजे नागाव, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे झाला. भास्करराव जाधवांचे मूळ गाव महाड हे होय.

भास्करराव जाधवांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण महाड, नागाव, बाणकोट, हराई, राजापूर, भिवंडी, अलिबाग आदी ठिकाणी झाले. सन १८८८ ते १८९२ पर्यंत जाधवांना महाविद्यालयातील शिक्षणासाठी पुणे येथील गंगारामभाऊ म्हस्के यांच्या डेक्कन संस्थेची शिष्यवृत्ती मिळत होती. भास्करराव जाधवांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. या काळात त्यांचे वास्तव्य ज्येष्ठ सत्यशोधक स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांच्याकडे होते. भास्कररावांचे वडील विठोजीराव जाधव यांचा व्यवसाय गुत्तेदारीचा असल्याने त्यांचा परिचय अय्यावारूंशी झाला होता. या परिचयातून दोघांचे संबंध स्नेहाचे झाले होते.

मुंबईस महात्मा फुले, स्वामी अय्यावारू यांच्याकडे उतरत असत. इ.स. १८८८च्या सुमारास महात्मा फुले स्वामींकडे एकदा थांबले होते. अय्यावारूंनी महात्मा फुले यांचे या प्रसंगी हार्दिक स्वागत केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले भास्करराव जाधव या स्वागत प्रसंगी उपस्थित होते. महात्मा फुले यांचे हे प्रथम आणि अंतिम दर्शन भास्कररावांना झाले होते.

भास्करराव जाधव मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून १८९२ साली बी. ए. (प्रथम श्रेणीत) झाले. १८९४ साली गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एम. ए. झाले, तर १८९७ साली एलएल. बी. झाले. तसे तर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत भास्करराव जाधवांवर पारंपरिक विचारांचा मोठा पगडा होता. भास्करराव जाधवांवरील हा सनातनी विचारांचा पगडा अय्यावारूंकडील वास्तव्यात हळूहळू कमी होत गेला. मुंबईतील पायधुणी येथे दर रविवारी गुरुवर्य कृष्णराव

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा
‍ टाका व्हिडिओ बनवा

सत्यशोधकांचे अंतरंग

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button