सोलापूर

🎉 दक्षिण सोलापूरमध्ये जल्लोष! पंचप्पा धनशेट्टी यांचा दणदणीत विजय 🎉

🎉 दक्षिण सोलापूरमध्ये जल्लोष! पंचप्पा धनशेट्टी यांचा दणदणीत विजय 🎉

दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत अखिल भारतीय माळी महासंघाचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष पंचप्पा धनशेट्टी यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्या या भव्य यशाबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सोलापूर येथे त्यांचे हार्दिक स्वागत करून सत्कार केला.
या सन्मान सोहळ्यावेळी आप्पासाहेब होनमाने, निमिषा वाघमोडे, ज्योतीताई खरात, भुजंग मळगे, विष्णू गाढवे, सुरज ढाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला.
पंचप्पा धनशेट्टी गेल्या २०–२५ वर्षांपासून सातत्याने समाजकार्य करत असून बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रश्नांवर त्यांनी प्रभावी काम केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण असून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
मागील वेळी आहेरवाडी सरपंच पदासाठी त्यांनी जोरदार लढत दिली होती; मात्र थोडक्यात पराभव झाला होता. यावेळी त्यांनी प्रभावी प्रचार, व्यापक जनसंपर्क आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर पंचायत समितीची जागा शानदार पद्धतीने जिंकून दाखवली.
या विजयामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचे सहकार्य, आमदार सुभाष देशमुख यांचे मार्गदर्शन तसेच सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे पंचप्पा धनशेट्टी यांनी नमूद केले.
त्यांच्या या निवडीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

📢 सोशल मीडिया संदेश:
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा
👍 बातमी लाईक करा | 🔄 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

#पंचप्पा_धनशेट्टी #दक्षिण_सोलापूर #भव्य_विजय #अखिलभारतीयमाळीमहासंघ #OBC #DinbandhuNews #ShivkrantiTV

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button