सांगोला 24 मे 2026 💐 जश्न-ए-शाही शादी मुबारक : सांगोल्यात इनामदार परिवाराचा भव्य स्वागत समारंभ उत्साहात संपन्न 💐

सांगोला 24 मे 2026 💐 जश्न-ए-शाही शादी मुबारक : सांगोल्यात इनामदार परिवाराचा भव्य स्वागत समारंभ उत्साहात संपन्न 💐
सांगोला शहरातील प्रतिष्ठित, सामाजिक आणि खानदानी इनामदार परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नवविवाहित जोडपे इंजि. मोईन हमीद इनामदार आणि डॉ. अफिया लियाकतअली पटेल यांच्या विवाहोत्तर शाही स्वागत समारंभाचा सोहळा अत्यंत जल्लोषात, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सांगोला-मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स, सांगोला येथे आयोजित या भव्य स्वागत समारंभाला पश्चिम महाराष्ट्रातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
वर मोईन हमीद इनामदार यांनी DCE आणि B.E. (Civil) हे शिक्षण पूर्ण केले असून वधू डॉ. अफिया पटेल यांनी D.Pharm आणि B.Pharm हे उच्च शिक्षण घेतले आहे. वधू अफिया या सांगली जिल्ह्यातील लियाकतअली बाबालाल पटेल यांच्या कन्या आहेत. उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि प्रगत विचारांच्या या नवदांपत्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
या शाही स्वागत समारंभाला ओबीसी नेते तथा दिनबंधू न्यूज व शिवक्रांती टीव्ही चे संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते ज. हमीद जफरुद्दीन इनामदार यांचा शाल आणि “शरणगाथा” हे पुस्तक भेट देऊन सन्मान केला. तसेच नवविवाहित वधू-वरांना मंगल आशीर्वाद देत त्यांच्या सुखी, समृद्ध आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
हमीद इनामदार हे सांगोला शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून ते B.A. (Hons.) आणि M.S.W. उच्चशिक्षित आहेत. पत्रकारिता, संपादकीय लेखन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अन्याय-अत्याचाराविरोधात निर्भीडपणे आवाज उठविला आहे. आपल्या सडेतोड लेखणीतून सामान्य जनतेस न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न त्यांनी केला असून एक धाडसी पत्रकार, अभ्यासू संपादक आणि समाजाभिमुख कार्यकर्ता म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.
या स्वागत समारंभासाठी सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पंचक्रोशीतील नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी शाही स्नेहभोजनाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमामध्ये भारदस्त गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. सुरेल गायन, आनंदी वातावरण, आकर्षक रोषणाई आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता. नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत उपस्थितांनी हा सोहळा अविस्मरणीय ठरविला.
इनामदार परिवाराच्या सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि प्रेमळ स्वभावामुळे या शादी मुबारक स्वागत समारंभाला जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सामाजिक ऐक्य, स्नेह आणि आनंदाचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
💐 जश्न-ए-शाही शादी मुबारक 💐
सांगोल्यात इनामदार परिवाराच्या वतीने आयोजित इंजि. मोईन हमीद इनामदार व डॉ. अफिया लियाकतअली पटेल यांच्या शाही स्वागत समारंभाला हजारोंची उपस्थिती लाभली. सामाजिक ऐक्य, प्रेम, आपुलकी आणि आनंदाचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर भारावून गेला.
🎤 दिनबंधू न्यूज व शिवक्रांती टीव्हीचे संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत ज्येष्ठ पत्रकार ज. हमीद जफरुद्दीन इनामदार यांचा शाल व “शरणगाथा” पुस्तक देऊन सन्मान केला.
📲 शिवक्रांती टीव्ही | दिनबंधू न्यूज
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
👉 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कॉमेंट करा
👉 बेल आयकॉन दाबा
👉 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल व ग्रुपला फॉलो करा
#जश्नएशाहीशादीमुबारक
#सांगोला
#इनामदारपरिवार
#मोईनइनामदार
#डॉअफियापटेल
#शिवक्रांतीटीव्ही
#दिनबंधून्यूज
#सत्यशोधकशंकररावलिंगे
#शरणगाथा
#WeddingReception
#Sangola
#Maharashtra











