राजकारण

अजित पवार मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादीत खळबळ; 20 पेक्षा जास्त आमदारांची सुनेत्रा पवारांशी बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल दिसून आली आहे. अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून पक्षातील 20 हून अधिक आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत चर्चा केली असून या प्रकरणी CBI चौकशीची मागणीही पुढे आली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांशी बैठक

महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली.

या बैठकीत अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित तपास आणि DGCA च्या प्राथमिक अहवालावर आमदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे.


अजित पवार मृत्यू प्रकरणावर शंका

जानेवारी 2026 मध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एक महिन्याने DGCA चा अहवाल समोर आला. मात्र त्या अहवालातील काही बाबींवर आमदारांनी शंका व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

यामुळे या प्रकरणाची CBI मार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी काही आमदारांनी बैठकीत केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रस्ताव

बैठकीदरम्यान आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सामूहिक भेट घेण्याचा प्रस्तावही मांडला. अजित पवार यांच्या मृत्यूबाबत जनतेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

यावर सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.


रोहित पवारांची सातत्याने मागणी

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी या अपघातामागील कारणे आणि संभाव्य घातपाताबाबत तपास व्हावा अशी मागणी केली आहे.

या प्रकरणात सत्य बाहेर यावे यासाठी त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे.


पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता?

अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणावर पक्षातील काही नेत्यांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याची भावना आमदारांमध्ये असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच अनेक आमदारांनी थेट सुनेत्रा पवारांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे कोणती राजकीय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button