आरक्षणाची गरज कोणाला? भटक्या मरीआई कोळ्यांना की जमीनदार मराठ्यांना…!!!

आरक्षणाची गरज कोणाला? भटक्या मरीआई कोळ्यांना की जमीनदार मराठ्यांना…!!!
स्पेशल रिपोर्ट:-मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर,जिल्हा सोलापूर शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801
भाग-4
मंद्रूप,तालुका दक्षिण सोलापूर येथे सुमारे 70 वर्षांपूर्वी आंध्रातून येऊन मरीआई कोळी समाज गावाशेजारील गायरान जागेत उघड्यावर पालं टाकून राहत होता. आजही या ठिकाणी मंद्रूप भंडारकवठा रोडच्या जवळ थोड्याफार प्रमाणात पालं, पत्र्यांची काडाची,कुडाची,तणसाची अतिशय लहान लहान घर आहेत. त्यांच्या वस्तीवर घराकडे जाण्यासाठी एकदम लहान पाऊलवाटा आहेत. काही ठिकाणी सिमेंट रोड झाले आहेत.नळ पाणी योजना अतिशय अपुरी आहे. गटार योजना बिलकुल नाही.त्यामुळे प्रसाधनाची सुविधा नाही. एकही ग्रामपंचायत सदस्य नाही आणि आजही हा समाज 90% अशिक्षित अडाणी आहे.अशा परिस्थितीमध्ये दहा बाय दहाच्या जागेमध्ये पाच ते पंचवीस लोक राहतात.झोपडी मध्ये फक्त स्वयंपाक करतात. झोपण्यासाठी विश्रांतीसाठी बिलकुल जागा नाही. पावसाळ्यात तरी या लोकांचे हाल कुत्रे खात नाहीत.
स्वतःच्या नावावर जागा जमीन उतारा नसल्यामुळे दाखले मिळत नाहीत. शासनाच्या कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाहीत. रेशन कार्डही मिळण्यास अडचण होते.कोणाचेही मार्गदर्शन नाही,शिक्षण नाही,कुटुंब नियोजन नाही,शेती,उद्योग व्यवसाय नाही. फक्त सुगीच्या दिवसात मरीआईचा गाडा महिला डोक्यावर घेऊन पाठीवर लहान मुलांना बांधून देवीच्या नावावर पुरुष मंडळी कडकलक्ष्मीचा वेश धारण करून मोठ्या चाबकाने आवाज काढून स्वतःला बडवून घेतात. दंडामध्ये टोकदार दाभणाने टोचून रक्तबंबाळ करतात.रक्त बंद करण्यासाठी महिलांच्या तोंडामध्ये दंड देतात.
महिला कर्कश आवाजाची ढोलकी वाजवतात.दोन अडीच फूट उंचीचे देवीचे कपाट डोक्यावर ठेवून पुरुषांच्या मागे पैसे मागण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी जोरा जोरात विनंती करतात.हा खेळ गावातील चौकात चालू असतो.कोणी दानधर्म करत नसेल तर पुन्हा चाबकाने बडवून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि घरोघरी ही धन-धान्य,कपडे मागून त्यावर उदरनिर्वाह करतात. पावसाळ्यात सहा महिने बसून खावे लागते.कोणताही धंदा नसतो. जातीचा दाखला मिळत नसल्याने मुलांना आश्रम शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही.शिक्षणाच्या सोयी सवलती मिळत नाहीत,नोकरी लागत नाही.त्यामुळे अनेक वेळा उपासमारीची वेळ येते.म्हणून आत्ता समाजातील काही लोक मोलमजुरी शेतीची कामेही करू लागली आहेत.
या समाजातील एक जाणकार नागरिक म्हसाप्पा कोळी यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की,शासनाची योजना असतानाही गायरानाचे गावठाणात रूपांतर केले नाही.येथील मरीआई समाजाला घरकुल त्यामुळे मिळत नाही. काहीजणाला दिले आहेत ते कसे दिले आहेत हे समजत नाही. रस्ते, पाणी, गटार योजना नसल्यामुळे आमच्या झोपडी मध्ये अतिशय गलिच्छ वातावरणामुळे डासांचा, माशांचा प्रादुर्भाव होतो.अनेक लोक आजारी पडतात,दुर्गंधी सुटते. नरक यातना सहन करत जगावे लागते. मंद्रूप गावाच्या आसपास मध्ये असणाऱ्या हजार बाराशे जनसंख्येचा वाली कोणी नाही. राजकारणी लोक निवडणुकीच्या वेळी फक्त आश्वासने देऊन समाजात फूट पाडून विकासापासून वंचित ठेवतात, मतदान करून घेतात.
त्यांच्या मागण्या आहेत,गायरानाचे रूपांतर गावठाणात करून प्रत्येक लग्न झालेल्या कुटुंबास एक गुंठा जागा, घर,नळ,पाणी,रस्ते गटार योजना राबवावी l.सर्वांना एकाच वेळी मागासवर्गीयांचे दाखले द्यावेत. रेशन कार्डाची फोड करून प्रत्येकांना अंत्योदय कार्ड द्यावे. सवलतीच्या दरात वीज द्यावी. शिक्षणासाठी आश्रम शाळेत सर्व मुलांना प्रवेश मिळावा.सर्वांना शिक्षण,दवाखाना,घरकुल मोफत द्यावे.विशेष सवलत देऊन आमच्या मुलांना,आठवीच्या पुढे शिकलेल्या मुलांना सरकारी नोकरी द्यावी.उद्योग धंद्यांमध्ये काच,पत्रा,बाटली,रद्दी, टाकाऊ वस्तू यांचा व्यवसाय करू लागले आहेत.त्या व्यवसायातही चोरीचा आळ घेऊन गावकरी आणि पोलिस आम्हाला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभा करत आहेत. त्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे.
उद्योगधंद्यांसाठी बिनव्याजी कर्ज द्यावे.भूमीहीन असल्यामुळे आम्हाला सरकारच्या ताब्यातील जमिन कसण्यासाठी द्यावी.माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळावेत. अन्न,पाणी,निवारा,शिक्षण, घरकुल त्वरित मोफत मिळावे. लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. रेशन कार्ड वरील मोफत धान्य मिळवण्यासाठी ही कसरत करावी लागते. कधी मिळते तर कधी मिळत नाही.सर्व रेशन कार्ड ऑनलाईन न झाल्यामुळे अनेकांना धान्य मिळत नाही.
ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना सुद्धा अनेक वेळा धान्य मिळत नाही.कार्ड फोड होत नाही.कार्ड फोड करण्या साठी मोठी रक्कम मागितली जाते.ती आमच्याकडे नसते.
अशा या शोषित पीडित भटक्या मरीआई गाडीवाल्यांना आरक्षणाची गरज आहे.त्यांना आजपर्यंत दाखले मिळत नाहीत,पुरावे मागितले जातात. परंतु जमीनदार मराठ्यांना रातोरात कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घातले जाते. अति तातडीने मागासवर्ग आयोगामार्फत जमीनदार मराठ्यांची माहिती गोळा केली जाते.मागासवर्गीय नसताना मागासवर्गीय ठरविले जाते. बेकायदेशीर 10% आरक्षण दिले जाते. मग या भटक्या मरीआई कोळ्यांना (ओबीसींना) आरक्षणाची खरी गरज आहे की जमीनदार मराठ्यांना? हा प्रश्न भेडसावत आहे. याचा सरकारने त्वरित विचार करून सर्व भटक्या जमातींना आरक्षण, संरक्षण,जातीचे दाखले द्यावेत. आणि त्यांची गरीबी कायमची दूर करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा सरकारने केला पाहिजे.असे मत मंद्रूप येथील प्रत्यक्ष पाहणी करून दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केले आहे.
या समाजाची सविस्तर कहाणी भाग एक ते तीन लिंक सोबत जोडली आहे.हा लेख सर्वांनी एक वेळ वाचला पाहिजे.मानवतावादी विचार केला पाहिजे.
जागो ओबीसी जागो…
जय संविधान!!
जय मंडल!!
जय ओबीसी!!
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




