सोलापूर

🔥 महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे बहुजन समाजावर थेट युद्ध! – तेलंगणात मनुवादी विकृतीचा कळस 🔥

🔥 महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे बहुजन समाजावर थेट युद्ध! – तेलंगणात मनुवादी विकृतीचा कळस 🔥

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची दिवसाढवळ्या विटंबना करण्यात आली असून हा प्रकार केवळ गुन्हा नसून फुले विचारधारेवर, बहुजन समाजावर आणि मानवतावादी मूल्यांवर थेट हल्ला आहे. कायद्याची व्यवस्था सांभाळणाऱ्यांच्या उपस्थितीत आरएसएसच्या विकृत, मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी केलेली ही कृत्ये पितृसत्ताक आणि जातीवादी विचारसरणी आजही स्त्रीमुक्ती, शिक्षण, समानता आणि शूद्रोद्धाराच्या प्रतीकांपासून भयभीत असल्याचे स्पष्ट करते. १८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणारे,

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करणारे, सतीप्रथा, बालविवाह व विधवा उत्पीडनाविरोधात लढणारे, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेला पाप ठरवणारे, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जातीविरहित समाजाची पायाभरणी करणारे राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा अपमान बहुजन समाज कदापि सहन करणार नाही. काय मुलींना शिक्षित करणे गुन्हा आहे? काय जातीवादाचा विरोध करणे पाप आहे?

ठराविक विचारसरणीचे सत्ताधारी सत्तेत आल्यानंतरच अशा घटना सातत्याने घडत असल्याने मनुवादी पिलावळीला मिळणाऱ्या राजश्रयाचा हा थेट परिणाम आहे. तेलंगणा सरकारने या घटनेची जबाबदारी घ्यावी, दोषींची तात्काळ ओळख पटवून अटक करावी, कठोरात कठोर कारवाई करावी आणि विटंबना केलेल्या पुतळ्याच्या जागी तात्काळ भव्य व सन्माननीय पुतळा उभारावा, अन्यथा बहुजन समाजाचा संताप रस्त्यावर उतरेल.
— दिनबंधू शिवक्रांती देवी | संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे | 73 87 37 78 01

#महात्मा_फुले #PhuleLivesOn #बहुजन_एकजूट #मनुवाद_खपवून_घेणार_नाही #StatueDesecration #SocialJustice #SavitribaiPhule #CasteAnnihilation #EducationForAll

दिनबंधू शिवक्रांती देवी सोशल मीडिया ग्रुपमध्ये 73 87 37 78 01 हा नंबर जोडा, बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कॉमेंट करा, बेल आयकॉन दाबा विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button