मंडलनामा क्रमशः 37.नसीम महात यांचे योगदान

मंडलनामा क्रमशः
37.नसीम महात यांचे योगदान
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशनच्या कार्यात महिलांचा
सहभाग असला पाहिजे, असे सतत वाटत होते. कारण कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर महिलांची भागीदारी महत्त्वाची असते. प्रत्येक यशस्वी चळवळीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेला दिसतो.
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कार्यात महिला सामील होत होत्या पण त्यांची संख्या अत्यंत कमी होती. त्यामुळे मी व माझे सहकारी
संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करत होते. १९९४ मध्ये मुस्लिम ओबीसींसाठीचा शासन निर्णय (जीआर) निघाल्यानंतर आम्ही राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या जिल्ह्यात मेळावे, बैठका, गाठीभेठी परिषदा होत होत्या पण त्यात महिलांचा सहभाग अत्यंत कमी होता.
त्यामुळे संघटनेच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढवण्याचे १९९५ मध्ये
ठरवले. संघटनेची महिला आघाडी सुरू करण्यासाठी एका धडाडीच्या महिला नेतृत्वाची गरज होती. १९९५ मध्ये सांगली येथील तरुण भारत स्टेडियममध्ये संघटनेकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या तयारीसाठी आम्ही ठिकठिकाणी बैठका घेत होतो. अशाच एका बैठकीत नसीम महात यांची भेट झाली. त्या सांगलीतील महिला चळवळीत कार्यरत होत्या. सुशिक्षित होत्या. त्यांची मुद्दे समजून घेण्याची व समजावून देण्याची पद्धत प्रभावशाली होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही महिला संघटनेत कार्यरत होणे गरजेचे आहे, असे सर्वांना वाटले.
मी नसीम महात यांना संघटनेच्या कार्यात पूर्णवेळ सामील व्हावे, असा
आग्रह केला. त्यांनी कुटुंबाशी संपर्क करण्यास सांगितले. मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. महात यांचे कुटुंबही अत्यंत समजूतदार व खुल्या विचाराचे होते. परंतु, जगरहाटीनुसार त्यांच्या काही मर्यादा होत्या. त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितले.
‘आधीच आपल्या धर्मात महिलांवर बंधने आहेत. नसीम या स्थानिक
पातळीवर काम करतात, त्यालाच अनेकांचा आक्षेप असतो. त्यांना जिल्ह्याबाहेर दौरे जमणार नाहीत’, कुटुंब प्रमुखाने मुख्य अडचण सांगितली.
मी म्हणालो, ‘आमची संघटना अत्यंत जबाबदार संघटना असून तिला देशातील मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे. या चळवळीत त्या सुरक्षित राहतील, आपण त्याबद्दल काळजी करू नये.’
यावरही नसीम महात यांच्या कुटुंबाचे समाधान झाले नाही. मात्र सांगलीच्या मेळाव्यात त्या सामील होतील, त्यानंतर काय तो विचार करू, असे त्यांनी सांगितले. म्हणजे महात कुटुंबाने मला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला नव्हता.
सांगली येथील मेळावा अत्यंत यशस्वी झाला. या मेळाव्यामुळे त्या भागात मुस्लिम ओबीसी चळवळ रुजण्यास मदत झाली.
मेळाव्याचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यावर दिसून आला. मेळाव्यानंतर मी पुन्हा एकदा महात यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे कुटुंबही मेळाव्याला उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांना संघटना व मुस्लिम ओबीसी चळवळीचा आवाका लक्षात आला होता. आता नसीम महात यांनी संघटनेच्या कार्यात सामील होण्यास हरकत नव्हती पण काही अडचणी होत्या. त्यांनी सामाजिक व कौटुंबिक अशा दोन्ही पातळीवरच्या अडचणी सांगितल्या.
‘मुस्लिमांमध्ये महिलांना असे थेट सामाजिक कार्यात पाठवून राज्यभर दौरे करण्यास परवानगी दिल्यास समाज आम्हाला काय म्हणेल?’, अशी विचारणा त्यांनी केली.
‘सामाजिक कार्य करताना या अडचणी प्रत्येक समाजात येतातच पण आपण प्रामाणिक असणे महत्त्वाचे असते. चांगले काम करणाऱ्यांवर टीका होतच असते. त्याला घाबरून घरी बसू नये. समाजाची टीका सहन करतच
इतर महिलांनी सामाजिक कार्य केले’, असे मी त्यांना सांगितले. नसीम महात यांच्या दोन मुली लग्नाच्या वयाच्या होत्या. ‘मुलींच्या लग्नाची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे त्या संघटनेच्या कार्यात कशा सहभागी होणार?’, कुटुंब प्रमुखाने माझ्या समोर प्रश्न टाकला. यावर एक तोडगा काढण्यात आला. मुलींची लग्ने होईपर्यंत नसीम महात सांगली जिल्ह्यातच काम करतील. जिल्ह्याबाहेरील कामाचे त्यानंतर पाहू !
आम्हाला एवढाच दिलासा पाहिजे होता. नसीम महात यांनी सांगली जिल्ह्यात संघटनेचे काम अत्यंत धडाडीने सुरू केले. त्यांच्या नेतृत्वात महिला आघाडी सक्षमपणे काम करू लागली. १९९६ च्या अखेरीस दोन्ही मुलींची लग्ने झाल्यानंतर त्या राज्यातील इतर जिल्ह्यांत सक्रियपणे सहभागी होऊ लागल्या. त्यांच्याकडे संघटनेच्या महिला आघाडीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.
नसीम महात यांनी माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संघटनेत महिला नेतृत्व निर्माण झाल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यात महिलांचा सहभाग वाढण्यास सुरुवात झाली. महात यांनी महाराष्ट्रात महिला आघाडी मजबूत केली. १९९७ मध्ये ■ वर्षा कांबळे लखनौ येथे झालेल्या परिषदेत त्यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातून एक हजार मुस्लिम महिला सामील झाल्या. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला परराज्यातील कार्यक्रमात सामील झाल्या नव्हत्या. त्यावेळी मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही जीआर काढावा,
या मागणीसाठी तेथे मोठा मोर्चा काढण्यात आला. नसीम महात व वर्षा कांबळे यांनी या मोर्चात उत्तर प्रदेशातील मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात संघटित केले. तेथून रेल्वेने परत येताना झांशी येथे संघटनेच्या कार्यकत्यांना अडवून तुरुंगात टाकण्यात आले. नसीम महात यांनी महाराष्ट्रातील काही मुस्लिम महिला कार्यकर्तीसह तुरुंगात जाणे पसंत केले. संघटनेच्या लढ्यात मुस्लिम महिलांचा हा प्रतिकात्मक सहभाग होता. चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांच्या १९९८ मध्ये औरंगाबाद व जालना येथे झालेल्या सभांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात सामील करून घेण्यात नसीम महात यांचा मोठा वाटा राहिला.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




