प्रस्थापित राजकीय पक्ष धनगरांना तिकिटे देत नसतील तर धनगरांनी सुद्धा पाडापाडीचे राजकारण करणे शिकले पाहिजे…
प्रस्थापित राजकीय पक्ष धनगरांना तिकिटे देत नसतील तर धनगरांनी सुद्धा पाडापाडीचे राजकारण करणे शिकले पाहिजे…
✍✍रोख ठोक✍✍
अशोक पातोंड धनगर
अकोट जिल्हा अकोला
9881667678
🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂
धनगर समाजाचे “आरक्षण” सहित इतर प्रश्न धसास लावण्या साठी किंवा आमच्या धनगरांचा आवाज लोकसभेत पोहचण्या साठी आमचे खासदार लोकसभेत पोहोचणे गरजेचे आहे.आणि मग आमचा खासदार लोकसभेत पाठवायचा असेल तर धनगर बहुल लोकसभा मतदार संघात आमच्या धनगरांनी जास्तीत जास्त लोकसभेचे तिकिटे किंवा उमेदवारी वर दावा ठोकला पाहिजे.समाज दावाच ठोकणार नसेल तर प्रस्थापित पक्ष तिकिटे घरी आणुन देणार कसे…??प्रस्थापित पक्ष जर आमच्या धनगरांना उमेदवारी किंवा तिकिटेच देत नसतील तर त्यांचा गेम किंवा गणित बिघडविण्याचे काम सुद्धा आमच्याच धनगरांच्या हाती आहे.अर्थात आम्हाला राजकीय पक्षांनी तिकिटे दिली नाहीत तर प्रस्थापित पक्षाचा जो कोणी उमेदवार उभा असेल त्याला पाडण्याचे काम आम्ही केले पाहिजे.तरच भविष्यात आम्हाला भाव मिळणार आहेत किंवा भविष्यात आमच्या समाजाचा कुठे तरी विचार होणार आहे.
धनगर समाज बांधवांनो माढा,सोलापूर,बारामती, परभणी,सांगली,सातारा अशा कित्येक लोकसभा मतदार संघात आमच्या धनगरांची 3 लाखाच्या वर मतदार संख्या आहे.एवढी सारी निर्णायक मतदार संख्या आमच्या धनगरांची धनगर बहुल मतदार संघात असेल तर मग सर्वच प्रस्थापित पक्षांनी आमच्या समाजाला तिकिटे दिली पाहिजेत.आणि जर का देत नसतील तर मग आमच्या धनगरांनी सुद्धा याचा विचार करूनच प्रस्थापित पक्षांचे गणितं बिघडविले पाहिजे.तिकिटेच नाही तर मतदान पण नाही.या तत्वाचा वापर करून एकदाचे या सर्व पक्षांना आमचा हिसका दाखविलाच पाहिजे.तरच आमचा पुढे कुठे तरी विचार होईल.
बांधवांनो 70 वर्ष निवळ आम्ही दुसऱ्यांची पोट भरण्याचे काम केलीत.लाचारी व गुलामीची आता हद्द झाली.आता तरी सर्वानी स्वाभिमान जागृत ठेवून समाजा साठी काम केले पाहिजे.या मताचा मी आहे.1952 पासून महाराष्ट्रातून आमचा एकही धनगर लोकसभेत पोहोचला नाही.आमचा माणूस लोकसभेत नाही म्हणून आमचे प्रश्न निकाली निघत नाहीत.आमचा कोणी सभागृहात बोलणाराच नाही तर प्रश्न सुटतील कसे…??म्हणून आमच्या धनगरांनी आता एकदाचे निश्चित डोके ठिकाणा वर ठेऊन फक्त समाज म्हणून आमच्या जमातीचे गणित बिघडविणार्या सर्वच राजकीय पक्षांचे गणिते बिघडविण्याची संधी आपल्याला चालून आली आहे.त्या संधीचे सोने करणे फक्त आमच्या हातात आहे.मग त्या साठी एकच करावं लागेल तिकिटे आमच्या माणसाला द्या.अन्यथा चालते व्हा…हा निर्णय पक्का करून येणाऱ्या काही दिवसात आपली सामाजिक शक्ती सर्वच नालायक राजकीय पक्षांना दाखवून देण्याचे काम येथून पुढे केले पाहिजे.
बांधवांनो किती दिवस केवळ शिक्के मारण्याचे काम करणार..??
काही समाजाचे अस्थीत्व आहे की नाही..??निदान वरील ज्या लोकसभा मतदार संघात आमचे धनगरांचे प्राबल्य आहे किंवा मतदार संख्या अधिक आहे त्या ठिकाणी तर आमचा धनगर समाज जिवंत असल्याचे लक्षणे प्रस्थापितांना दिसले पाहिजे.म्हणून धनगर बहुल लोकसभा मतदार संघातील आमच्या धनगर नेत्यांना माझी विनंती आहे की,तिकिटे तर मागाच आणि नाही तिकिटे राजकीय पक्षांनी दिले तर पाडापाडीचे तरी राजकारण जरूर केले पाहिजे जेणे करून आमचा भविष्यात विचार होईल..??तूर्तास एवढेच धन्यवाद🪷🙏🏾🪷 शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयफोन बेल दाबा