सोशल

सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.24

सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.24

१९५८ रोजी पाडळी (जि. सातारा) येथे पार पडलेल्या सतराव्या सत्यशोधक अधिवेशनाच्या अनुषंगाने त्यांचे एक पत्र ‘दीनमित्र’ पत्रात आढळून येते. या अनाहूत पत्रात त्यांनी १७व्या अधिवेशनाच्या आयोजन-नियोजनासंदर्भात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

संदर्भ – १. दीनमित्र सिल्व्हर ज्युबली अंक १९३८, २. डॉ. मा. गो. माळी यांचा टंकलिखित मजकूर, ३. दीनमित्र अंक २९-१०-१९४१ व ११- ३-१९२५

झगडे ग्यानू मल्हारजी

ग्यानू मल्हारजी झगडे हे फुले समकालीन सत्यशोधक असून ते फुले यांचे जवळचे नातेवाईक होते. झगडे हे पुणे शहराजवळील कवडी येथील मूळचे रहिवासी असावेत. मिस्त्री व्यवसायामुळे पुढे ते पुण्यास वास्तव्यास आले. सत्यशोधक समाज स्थापन होण्याअगोदर महात्मा फुले यांच्या मुशी विकण्याच्या दुकानी (जुनागंज, पुणे) रविवारी मोजक्या सत्यशोधक कार्यकर्त्यांची, कबिरांच्या ‘विप्रमती’ काव्यग्रंथावर आणि विद्यमान सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडत असे. या वैचारिक चर्चेला झगडे आवर्जून उपस्थित राहत. प्रसंगी चर्चेत सहभागी होत असत. पुढे भवती न भवती होऊन, विचाराअंती सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी झाली. या प्रसंगी झगडे सत्यशोधक समाजाचे सदस्य झाले होते. समाजाच्या आरंभीच्या काळात झगडे यांनी समाजाला भरपूर देणगी दिलेली आहे (१३ रु. ३ आणे आणि २ रु. ८ आणे). तसेच मिस्त्री काम करताना हाताखाली काम करणाऱ्या पन्नास एक व्यक्तींना उपदेश करून सत्यशोधक समाजाचे सदस्य करून घेतले. मात्र सनातनी मंडळींनी झगडे यांच्या विरुद्ध सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कागाळ्या केल्याने शेवटी त्यांनी समाजाच्या प्रचार-

प्रसारासाठी मिस्त्रीची नोकरी सोडली. यानंतर पुणे शहराजवळील घोरपडी येथे

त्यांनी सत्यशोधक मते एक पुनर्विवाह लावला.

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button