ओबीसी पार्टीची पहिली मीटिंग मराठी पत्रकार संघ मुंबई येथे संपन्न झाली इच्छुक उमेदवारांची आणि नेत्यांची सविस्तर भाषणे झाली. ध्येय उद्देश पूर्तीसाठी पक्षाचे सचिव बावकर यांनी सविस्तर माहिती दिली शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

ओबीसी पार्टीची पहिली मीटिंग मराठी पत्रकार संघ मुंबई येथे संपन्न झाली इच्छुक उमेदवारांची आणि नेत्यांची सविस्तर भाषणे झाली. ध्येय उद्देश पूर्तीसाठी पक्षाचे सचिव बावकर यांनी सविस्तर माहिती दिली शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
ओबीसी बहुजन पार्टी १०३/१०४, व्यापार भवन, पी.डी. भेलो रोड, कर्नाक, बंदर, मुंबई-४०० ००९, मो.क्र.९८२१४२४२४२
ओबीसी बहुजन पक्ष-वंचिताच्या विकासाचे आशास्थान
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. असे अण्णाभाऊ साठे यांनी ठणकावले होते. यातील कष्टकरी व श्रमिक म्हणजे भारतीय समाजातील छोटा शेतकरी, शेतमजूर, बलुतदार, आलुतेदार, मोलमजुरी करणारा कष्टकरी हाच होय. भारतीय स्वातंत्र्यानंतर या कष्टकऱ्यांचा सामाजिक मागासलेपणा लक्षात घेऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश केला गेला. तुटपुंजी जमिन असणारा अल्पभूधारक शेतकरी, दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करणारा शेतमजू, गावगाड्यातील बलुतेदार, आलुतेदार आपल्या पारंपारिक अवजारांवर / साधनांवर गुजराण करणारा समाज म्हणजे ओबीसी होय. प्रस्थापित वर्गाच्या जोखडाखाली असणारा ओबीसी घटक प्रत्येक राज्यात बहुसंख्यांक आहे. प्रस्थापितांनी पिढ्यानपिढ्या ओबीसी व दलित यांच्यावर आपली सत्ता, संपत्ती आणि अधिकार गाजविल्यामुळे सत्तेची फळे वंचित वर्गाच्या पदरात फारशी कधी पडली नाहीत. त्याला सत्ता काय असते हे कळू दिले नाही. गुलामी मानसिकतेत जीवन जगणारा ओबीसी समाज, सत्ता आपल्यासाठी कधीच नसते असा समज करून राजकारणाकडे फारसा गांभियनि बघत नाही.
सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठीत असूनही आणि राज्य मागासवर्ग आयोगांनी आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकरीलेले असतानाही मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतो आहे. मराठ्यांचे वर्चस्व असलेले पक्षपाती सरकारही त्यांच्यासमोर झुकते आहे. त्यांच्या मागणीनुसार रात्री-बेरात्री असंविधानिक जीआर काढीत आहे. ओबीसींचा विरोध असतानाही नियम अधिनियमात न बसणारे आरक्षण संगेसोयरे आणि गणगोतातील मराठ्यांना बहाल करणारी अधिसूचना केव्हाही निघू शकेल अशी आज परिस्थिती आहे. या उच्चजातीय सत्ताधारी मराठा समाजाची आंदोलने, उपोषणे, सरकारवरील दबाव, जाळपोळ व धमक्या यामुळे सामाजिक विषमतेचा बळी ठरलेला शोषित, वंचित ओबीसी समाज धास्तावलेला आहे. भयभीत झाला आहे. ओबीसींच्या हिताचा बळी देऊन मराठ्यांचे सरकार मराठ्यांसाठी हवे तसे निर्णय घेत आहे.
ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार राजकीयदृष्ट्या जागृत नाहीत. आणि संघटीतही नाहीत. त्यामुळे आपल्याला कुणीही गांभिर्याने घेत नाही. राजकीय सत्तेशिवाय आपली सामाजिक प्रगती होणे शक्य नाही. हे आता त्यांना कळू लागले आहे. सर्वच पातळीवरील परावलंबित्व हीच आपली जीवन जगण्याची रीत आहे, अशा पराभूत मानसिकतेपर्यंत गेलेला हा समाज आपल्या राजकीय हक्कासाठी जागृत होत असताना दिसत आहे. खरे तर कोणतेही आंदोलन अथवा चळवळ न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून ७० वर्षापूर्वीच आपल्याला राजकीय अधिकार दिले होते. पण सत्ता ही समाजविकासाची गुरूकिल्ली आहे, हे कळण्यासाठी २०२४ साल उजडावे लागले. ज्यांच्या हातात पिढ्यानपिढ्या सत्ता आहे. तो आपल्यासारख्या सत्तावंचित वर्गाचे शोषण करतो. पिळवणूक करतो. सत्तेचे केंद्र आल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न करतो. हेच आपल्या अधोगतीचे कारण आहे. आपले दुःख, वेदना आणि समस्या एकसमान आहेत. पण आपण संघटीत नसल्याने आपली उच्चवर्गीय समाजाकडून सर्वांगाने पिळवणूक केली गेली. आपण बहुसंख्य असतानाही राजकीय आधिकारापासून, सत्तेपासून आपल्याला आजपर्यंत दूर ठेवण्यात आले. आपल्यावी अन्याय होत असतानाही राजकीय अधिकारापासून, सत्तेपासून आपल्याला आजपर्यंत दूर ठेवण्यात आले. आपल्यावर अन्याय होत असतानाही तो उघड्या डोळ्यांनी तो पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. या अन्यायाला वाचा फोडायला पाहिजे असे वाटत होते, पण त्यासाठी योग्य व्यासपीठ नव्हते. त्यामुळे शोषिताचा आवाज आतल्या आत घुटमळत राहिला. गेल्या काही दशकात आपल्या व्यथा मांडणारा, प्रश्न सोडविणारा एखादा राजकीय पक्ष असावा, जो या बहुजनांचा आवाज बनेल. अपल्या शेकडो जातींचे
प्रतिनिधित्व करील. आपले अस्तित्व, अस्मिता, सन्मान, स्वाभीमान वाढवेल. अशी अपेक्षा अलिकडे ओबीसींच्या एल्गार मेळाव्यातून व जनमानसातून व्यक्त करण्यात आली. त्यातून ओबीसी आता स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढण्यास तयार होत आहे, हे स्पष्ट झाले.
आजपर्यंत या वगनि कधीच आपला राजकीय हक्क मागितलेला नाही. तो मागून मिळणारही नाही, तो हस्तगत करावा लागेल. हे त्याने ओळखले आहे. राजकीयदृष्ट्या संघटीत झाल्याशिवाय आणि सत्ता हस्तगत केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. मान, सन्मान आणि स्वाभिमानाने जगता येणार नाही, याच अनिवार्यतेतून महाराष्ट्रामध्ये अलिकडेच ओबीसी बहुजन पार्टी चा उदय झाला आहे. आपलीच मते, आपलाच पक्ष, आपलेच नेते आणि आपली सत्ता प्रस्थापित व्हावी, याच हेतूने नव्या पक्षाची घोषणा झाली. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील या नव्या पक्षाचे देशभरात स्वागत झाले. ज्या पार्श्वभूमीवर याचा जन्म झाला, त्याचे महत्व विशेष अधोरेखित करावे लागेल. त्याची निर्मिती ही बहुजनांमधील असुरक्षिततेच्या भावनेतून, वर्षानुवर्षे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या परिसिमेतून झाली आहे. या वंचित लोकांच्या मनातील खदखद व असहाय्यतेमधून या पक्षाचा जन्म झालेला आहे. यातून वंचित ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार, दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक अधिक संघटित होतील. याचा विचार करता महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल व सत्तासमीकरणेही बदलतील, यात शंका नाही.
महाराष्ट्रातील शोषित, पिडीत, वंचित वर्ग आपले राजकीय अस्तित्व उभे करू पाहत आहे. हा पक्ष महाराष्ट्राच्या भविष्याची नवी पहाट असणार आहे. कारण हा पक्ष कष्टकरी, आलुतेदार, बलुतेदार, भटके, विमुक्तांचा पक्ष आहे. जमिनीशी नाळ जुळलेला आणि जमिनीवर असलेला एकमेव वर्ग म्हणजे ओबीसी होय. स्वतःच्या व देशाच्या विकासाची जाण त्याच्याएवढी कुणालाच नाही. या ओबीसी बहुजन समाजाच्या योगदानातून निःसंशयपणे एक नवा, सामाजिक सलोख्याचा, समतेचा, पुरोगामी, आधुनिक, विकसित महाराष्ट्र उभा राहिल. महाराष्ट्रातील सर्वच जातीधर्मातील शोषित, वंचित सर्वसामान्य नागरिकांपासून अभ्यासक, विचारवंत, बुद्धीवादी, उद्योजक, उच्चशिक्षित, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, संशोधक, क्रिडापटू, कलाकार यांनी या पक्षाचे स्वागत करायला हवे. आपण सर्वांनी पक्षपाती प्रस्थापित पक्ष आणि आत्मकेंद्रित प्रस्थापित नेते यांचे नेतृत्व झुगारून तुमच्या-आमच्या हक्काच्या पक्षाचे शिलेदार होऊ या. कारण ओबीसी बहुजन पार्टी ही ओबीसी-बहुजनांच्या उद्धाराचे आशास्थान आहे.
जय ओबीसी !
प्रकाशअण्णा शेंडगे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभेसाठी
महाराष्ट्रातील सर्व इच्छुक उमेदवारासह
प्रा.टी.पी.मुंडे उपाध्यक्ष
चंद्रकांत बावकर महासचिव
.जे.डी. तांडेल खजिनदार
कार्यकारी सदस्य
सर्वश्री. हरीभाऊ शेळके, अरविंद डाफळे, दिगंबर लोहार, रफिक कुरेशी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा




