सोशल

20 फेब्रुवारी 2024 मा.ना. कॅबिनेट मंत्री, श्री. छगनराव भुजबळ साहेब,

20 फेब्रुवारी 2024 मा.ना. कॅबिनेट मंत्री, श्री. छगनराव भुजबळ साहेब,

यांच्या सेवेशी

मंत्री अन्न नागरी पुरवठा, मुंबई ४०० ०३२.

अर्जदार :- श्री. सुभाष जगन्नाथ राऊत
नाभिक समाज
मो. नं. ९९२१५२६९८५
रा. ब्लॉक नं. ४०७, वसंतविहार, फेज नं. ३, राजे गणपती जवळ, सोलापूर

विषय :- माझ्या घरावर बेकायदेशीर कब्जा केल्या बाबत व कोर्टात खोटी केस दाखल केल्याबाबत, पोलीस स्टेशनला खोटी केस दिली असल्याबाबत..

महोदय,

कारणे विनंती अर्ज करतो की, आमचे घर क्र. २१ देशमुख पाटोल वस्ती, लक्ष्मी पेट, सोलापूर येथे आहे. सदरचे घर मी सदाशिव कृष्णात चव्हाण यांच्याकडून व महादेवी दुधाचे यांच्या कडून सन २००६ रोजी कब्जा पावतीसह विकत घेतले आहे.

माझ्या घरा शेजारी राहणारे घर क्र. २० नामे संतोष अंबादास जाधव व सोमनाथ अंबादास जाधव, शुभम् संतोष जाधव, वैभव सोमनाथ जाधव सर्व मराठा समाजाचे गुंडगिरी दादागिरी करणारे लोक आहेत. यांनी माझ्या घरावर बेकायदेशीर रितीने कब्जा केलेला आहे. हा कब्जा काढण्यासाठी व कोर्टातील खोटी केस काढण्यासाठी व पोलीस स्टेशनला तक्रार न देण्यासाठी मला वरील सर्वजण आज रोजी रक्कम रुपये २५ लाख मागत आहेत.

मी अत्यंत गरीब माणूस आहे. मी न्हावी समाजाचा असून माझा जेन्टस् पार्लर चा व्यवसाय आहे. सदर व्यवसायावर माझा उदरनिर्वाह चालतो. एवढी रक्कम मी त्यांना देऊ शकत नाही.

पोलीसात मी तक्रार केली असता माझी तक्रार नोंदवून घेत नाहीत. व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत नाहीत. तरी या झोपडपट्टीतील गुंड दादा लोकांपासून माझे संरक्षण व्हावे. व मला माझी जागा मिळावी, माझ्या राहत्या घरामध्ये स्लॅब चे घर असून घरात कपडे भांडी चार-पाच तोळे सोन्याचा ऐवज वगैरे आहे याच ठिकाणी माझ्या मुलीचे लग्न झालेले फोटो आहेत माझ्या घरावर माझे नाव टाकलेले होते. ते त्यांनी काठून त्याचे नाव टाकले आहे. माझ्या मुलाने नवीन फ्लॅट घेतल्यामुळे व शेजारील बांधकाम चालू असल्यामुळे बांधकामाचे सर्व साहित्य पडल्यामुळे येण्या जाण्यास अडचण होत होती.

म्हणून आम्ही काही दिवस तिकडे राहण्यास गेलो होतो तेवढ्यात त्यांनी माझे कुलूप काढून त्याचे कुलूप लावले आहे. हे संपूर्ण कब्जा घेऊन माझ्या घरातील सोने नाणे वगैरे हडप केलेले आहे. तसेच माझ्या जिवितास धोका झाल्यास वरील सर्व लोकांना जबाबदार धरण्यात यावे ही नम्र विनंती. अशी तक्रार करणारा अर्ज निवेदन सुभाष राऊत यांनी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना भेटून कार्यवाही करण्यासाठी विनंती केली विनंती केली. यावेळी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे उपस्थित होते

शिवक्रांती टीव्ही

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button