सोशल

🌟 प्रेरणादायी क्षण! अक्कलकोटमध्ये खासदार डॉ. ज्योतीताई सावित्री वाघमारे आणि माजी मंत्री सिद्धारामजी मेहत्रे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार 🌟

🌟 प्रेरणादायी क्षण! अक्कलकोटमध्ये खासदार डॉ. ज्योतीताई सावित्री वाघमारे आणि माजी मंत्री सिद्धारामजी मेहत्रे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार 🌟

 

अक्कलकोट शहरातील जुना आडत बाजार पटांगण येथे माजी मंत्री माननीय सिद्धा राम मेहेत्रे साहेब यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला.
या सोहळ्यात नूतन राज्यसभा खासदार डॉ. ज्योतीताई सावित्री वाघमारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेत शपथ घेत इतिहास रचला. त्यांनी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, रमाई, भिमाई यांच्या जयघोषात शपथ घेत समाजाला प्रेरणा देणारा आदर्श निर्माण केला.

या सत्कार कार्यक्रमात सत्यशोधक शंकरराव लिंगे (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ) व बापूसाहेब भंडारे (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर) यांनी माननीय सिद्धा राम मेहेत्रे साहेब व नूतन खासदार डॉ. ज्योतीताई सावित्री वाघमारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला.

या कार्यक्रमाला अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक व मैत्री प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय सिद्धा राम मेहेत्रे साहेब यांचे अभिष्टचिंतन केले तसेच डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचा उत्साहपूर्ण नागरी सत्कार केला.

या प्रसंगी प्रथमच पाटील, तानवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.

📢 सोशल मीडिया सूचना :
दिनबंधू न्यूज | शिव क्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
👉 बातमी लाईक करा 👍
👉 शेअर करा 🔁
👉 सबस्क्राईब करा ▶️
👉 फॉरवर्ड करा 📲
👉 कॉमेंट करा 💬
👉 बेल आयकॉन दाबा 🔔 विसरू नका!

#हॅशटॅग :
#ज्योतीताईवाघमारे #राज्यसभाखासदार #सिद्धाराममेहेत्रे #अक्कलकोट #नागरीसत्कार #प्रेरणादायी #शिवसैनिक #माळीमहासंघ #फुलेसमतापरिषद #जयभीम #जयशिवराय #शाहूफुलेआंबेडकर

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button