सोशल

🚨 “कवडीमोल भावात जमीन लाटण्याचा डाव? संत सावतामाळी प्रतिष्ठानचा प्रशासनावर घणाघात!” 🚨

🚨 “कवडीमोल भावात जमीन लाटण्याचा डाव? संत सावतामाळी प्रतिष्ठानचा प्रशासनावर घणाघात!” 🚨

सोलापूर : संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्रासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत प्रशासनाचा मनमानी, अन्यायकारक व संशयास्पद कारभार उघड झाल्याचा गंभीर आरोप संत सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे लिंगे यांनी केला आहे.

कुर्डूवाडी येथील भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांनी पाठवलेल्या तक्रारीवर जिल्हा समन्वयक कार्यालयाकडून आजपर्यंत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. हा प्रकार निष्काळजीपणाचा कळस असल्याची टीका करण्यात आली आहे.

दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस संबंधित अधिकारी व काही निवडक जमीनधारकांना बोलावण्यात आले, मात्र संत सावतामाळी प्रतिष्ठानला जाणीवपूर्वक वगळण्यात आले. ना नोटीस, ना सूचना—हा सरळसरळ अन्याय व पारदर्शकतेचा अभाव असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे.

भूसंपादनासाठी रोडलगतच्या जमिनीला केवळ ₹450 प्रति चौ.फुट दर देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, तर प्रत्यक्षात त्याच परिसरात सध्याचा बाजारभाव ₹3000 प्रति चौ.फुट असून त्या दरातही कोणी जमीन देण्यास तयार नाही. तरीही प्रशासनाने जुने, 12-15 वर्षांपूर्वीचे दर आधार म्हणून वापरणे हे हेतुपुरस्सर आर्थिक शोषण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शासनाच्या नियमांनुसार बाजारभावाच्या किमान पाचपट मोबदला देणे अपेक्षित असताना, जमीनमालकांना कवडीमोल किंमत देण्याचा प्रयत्न हा सरळसरळ लूटप्रकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे संबंधित जमीन ही संत सावतामाळी प्रतिष्ठान या नोंदणीकृत ट्रस्टच्या नावावर असून समाजहितासाठी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दान करण्यात आलेली आहे. दानपत्रानुसारही जमिनीची किंमत ₹28 लाखांपेक्षा अधिक आहे. जमीन दान केली असतानाही एक लाख 75 हजार रुपयाची स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आलेले आहे तरीसुद्धा या जमिनीचा कमी दर लावून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न हा अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय, प्रशासनाने जमीन अधिग्रहणाचा उद्देश स्पष्ट केलेला नाही. जर अधिग्रहण करणार असतील, तर त्या प्रकल्पाची देखभाल संत सावतामाळी प्रतिष्ठानकडे सोपवावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

तसेच प्रत्येक जमीनधारकाच्या उताऱ्यावरून एक प्रतिनिधी शासकीय समितीत कायमस्वरूपी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

➡️ सर्व संबंधित जमीनधारकांची तातडीने संयुक्त बैठक घ्यावी
➡️ सध्याच्या बाजारभावावर आधारित किमान पाचपट मोबदला द्यावा
➡️ ट्रस्टची जमीन अधिग्रहणातून वगळावी
➡️ अधिग्रहण केल्यास प्रकल्पाची देखभाल प्रतिष्ठानकडे द्यावी
➡️ प्रत्येक जमीनधारकाला समितीत प्रतिनिधित्व द्यावे

अन्यथा, होत असलेल्या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

📢 सोशल मीडिया संदेश :
जमीनमालकांची लूट चालणार नाही! अन्याय करणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. हक्कासाठी लढा उभा राहतोय—तुम्हीही आवाज उठा! ✊🔥

📢 सोशल मीडिया सूचना :
👉 अधिन बंधूंनी शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जोडा

👉 बातमी LIKE करा 👍
👉 SHARE करा 🔁
👉 SUBSCRIBE करा 🔔
👉 FORWARD करा 📲
👉 COMMENT करा 💬
👉 बेल आयकॉन दाबायला विसरू नका 🔔

#हॅशटॅग :
#सावता_महाराज #भूसंपादन_अन्याय #सोलापूर #जमीन_हक्क #शेतकरी_आंदोलन #OBCआवाज #शिवक्रांतीटीव्ही #BreakingNews #JusticeForLandOwners #महाराष्ट्र #आक्रमक_लढा ✊🔥

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button