🌺 सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त नायगावला उसळणार लाखोंचा जनसागर ! 🌺

🔴 चलो नायगाव ! चलो नायगाव !!1
🌺 सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त नायगावला उसळणार लाखोंचा जनसागर ! 🌺
अखिल भारतीय माळी महासंघ व महात्मा फुले समता परिषद यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला
एसटी बस गाड्या बुक केल्यानंतर सोलापूर जिल्हा एसटी महामंडळाचे प्रबंधक यांनी सत्यशोधक शंकराव लिंगे सावता महाराजांचे वंशज सावता वसेकर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे माढा लोकसभा मतदारसंघाचे समता परिषद अध्यक्ष अबासाहेब खारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
सावित्रीबाई फुले यां ।च्या 195 व्या जयंतीनिमित्त नायगाव (ता. खंडाळा जिल्हा सातारा येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यास महाराष्ट्रभरातून लाखो फुले प्रेमी उपस्थित राहणार असल्याची माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष – अखिल भारतीय माळी महासंघ यांनी दिली.
यंदाचा जन्मोत्सव ऐतिहासिक ठरणार असून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी उभारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या भव्य विस्ताराचा आराखडा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे. 143 कोटी रुपयांच्या या आराखड्यात सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करणारे शिल्प, राष्ट्रीय स्मारक, शिक्षण संस्था, अध्यापन वर्ग, कॉलेज, डी.एड. महाविद्यालय व विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारली जाणार आहेत.
या ऐतिहासिक स्मारकाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री व अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून शेकडो बसेस तसेच हजारो चारचाकी, दुचाकी वाहनांद्वारे फुले प्रेमी नायगावकडे कूच करणार असून बस बुकिंग पूर्ण झाल्याची माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली.
—
✊ अपील (पोस्टरवर ठळक):
“एक दिवस सावित्री आईसाठी…
चला सावित्री आईच्या माहेरला – चला नायगावला !
आम्ही चाललो नायगावाला… तुम्हीही या !”
—
📣 सोशल मीडिया संदेश (लहान फॉन्टमध्ये):
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
बातमी लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा
—
🔖 Hashtags:
#ChaloNaigaon
#SavitribaiPhule195
#SavitribaiJayanti
#SavitraiSrushti
#PhulePremi
#MahatmaPhule
#DinbandhuNews
#ShivkrantiTV
#OBCMovement
#SocialJustice
–





