दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगेवधू-वरांना आणि त्यांच्या मातापित्यांचे हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन!

- दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगेवधू-वरांना आणि त्यांच्या मातापित्यांचे हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन!
पातुर नगरीत सत्यशोधक संस्कृतीचा मंगल सोहळा! हार्दिक शुभेच्छा — हार्दिक अभिनंदन!
दि.16/11/2025 रोजी पातुर (जि. अकोला) येथे पातुर नगरीचे मा.उपाध्यक्ष मा.सुरेंद्रजी उगले व सभापती मा.सौ.अलकाताई उगले यांच्या कन्येचा विवाह — चिखली (जि. बुलढाणा) येथील महात्मा फुले समता परिषदेचे मा.जिल्हाध्यक्ष मा.दत्ताभाऊ खरात यांच्या सुपुत्रासोबत — सत्यशोधक पद्धतीने अत्यंत शांत, साधेपणाने आणि सामाजिक संदेश देणारा असा मंगल सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी पातुर–बाळापूरचे विद्यमान आमदार मा.नितीनबापू देशमुख, माजी आमदार मा.लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार मा.बळीरामभाऊ सिरस्कार, जि.प.सभापती मा.रामसिंग जाधव, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.कल्याण काका आखाडे, गटनेते मा.अजुभाऊ ढोणे, शेतकरी जागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रशांतभाऊ गावंडे, ओबीसी महासंघाच्या विदर्भ प्रमुख मा.सौ.ज्योतीताई ढोकणे, मा.प्रकाश शेठ ढोकणे, मा.काळपांडे सर (अकोला), मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मा.दिपकभाऊ देशमाने, मा.लक्ष्मणराव इंगोले तसेच बुलढाणा–अकोला–व Washim जिल्ह्यांतील असंख्य मान्यवर उपस्थित होते.**
उपस्थित बांधवांनी “याच देही याची डोळा” पाहत सत्यशोधक पद्धतीने झालेल्या या नयनरम्य विवाह सोहळ्याचे कौतुक केले आणि वधू-वरांना हार्दिक आशीर्वाद दिले. सत्यशोधक विचारांची अमोल संस्कृती, महापुरुषांचे संदेश, मुलनिवासी परंपरा आणि सामाजिक समता यांचे दर्शन घडवणारा हा आदर्श सोहळा ठरला.
यासाठी मी मनःपूर्वक मा.दत्ताभाऊ खरात व मा.सुरेंद्रजी उगले कुटुंबीयांना धन्यवाद देतो. दोन्ही कुटुंबांनी दाखवलेला आदर्श सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे.
जर आपल्या घरातील सांस्कृतिक कार्य सत्यशोधक पद्धतीने करण्याची इच्छा असेल, समाजऋण फेडण्याची तयारी असेल तर आम्ही वैचारिक व प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर आहोत.
सत्यशोधक शंकरराव लिंगे — 73 87 37 78 01
पूजा
आकाशनिर्माणकर्ते नमः, तेजनिर्माणकर्ते नमः, वायुनिर्माणकर्ते नमः, उदकनिर्माणकर्ते नमः, पृथ्वीनिर्माणकर्ते नमः, सूर्यनिर्माणकर्ते नमः, चंद्रनिर्माणकर्ते नमः, तारांगणनिर्माणकर्ते नमः, मयूरनिर्माणकर्ते नमः, मर्कटनिर्माणकर्ते नमः, अणुरेणुनिर्माणकर्ते नमः, पर्जन्यनिर्माणकर्ते नमः, सागरनिर्माणकर्ते नमः, कच्छनिर्माणकर्ते नमः, मत्स्यनिर्माणकर्ते नमः, जलजंतुनिर्माणकर्ते नमः, वटवृक्षनिर्माणकर्ते नमः, चंदननिर्माणकर्ते नमः, तुलशीनिर्माणकर्ते नमः, कंदमूलनिर्माणकर्ते नमः, वेलीनिर्माणकर्ते नमः, सुगंधनिर्माणकर्ते नमः, पुष्पनिर्माणकर्ते नमः, फलनिर्माणकर्ते नमः, पिपीलिकानिर्माणकर्ते नमः, गजेंद्रनिर्माणकर्ते नमः, अश्वनिर्माणकर्ते नमः, कीटकनिर्माणकर्ते नमः, बुद्धिमान प्राणीनिर्माणकर्ते नमः, स्पर्शेद्रियनिर्माणकर्ते नमः, कर्णेद्रियनिर्माणकर्ते नमः, चक्षुरिंद्रियनिर्माणकर्ते नमः, रसनेंद्रियनिर्माणकर्ते नमः, घ्राणेंद्रियनिर्माणकर्ते नमः, ज्ञानेंद्रियनिर्माणकर्ते नमः, शुद्धविचारनिर्माणकर्ते नमः, कुळस्वిమానीनिर्माणकर्ते नमः, कुळस्वामीनिर्माणकर्ते नमः, महाबळीराजानिर्माणकर्ते नमः, महाजोतीबानिर्माणकर्ते नमः, काळबहिरीनिर्माणकर्ते नमः, महारखंडेरावनिर्माणकर्ते नमः, नवखंडचा न्यायीनिर्माणकर्ते नमः, महासुभानिर्माणकर्ते नमः, सप्ताश्रयनिर्माणकर्ते नमः, ब्रह्मराक्षसनिर्दाळणकर्ते नमः
मंगलाष्टक
(वर)
देवाचे नियमा प्रमाण धरुनि चाले तुझें कूळ गे ॥ सत्यानें अवध्यांत श्रेष्ठ असशी तसेचहि त्वत्सगे ॥ अज्ञान्या समद्दष्टिनें शिकविशी, तूं ज्ञान त्या दाविशी ॥ प्रीतीनें वरितों तुला अजि तुझी ऐकून किर्ती अशी ॥ शुभमंगल सावधान ॥ १ ॥
(वधु)
मानीशीं जरी त्वां दिलें अनुदिनीं, कर्त्या समाधानसें ॥ आम्हां सर्व स्त्रियां असे बहु पिडा, हें नेणशी तू कसें ॥ स्वातंत्र्यानुभवाची ओळख आम्हां, झाली नसे मानशीं ॥ यासाठीं अधिकार देशिल स्त्रियां, घे आण त्याची अशी ॥ शुभमंगल सावधान ॥ २ ॥
(वर)
स्थापाया अधिकार मी झटतसें, या बायकांची सदा ॥ खर्चाया न मनीं मी भीं किमपिही, सर्वस्व माझें कदा ॥ मानीतों सकला स्त्रियांस बहिणी तूं एकली मत्प्रिया ॥ कर्त्याचें भय मी मनांत तुजला, ठेवीन पोसावया ॥ शुभमंगल सावधान ॥ ३ ॥
(वधु)
बंधुवत्मजला समस्त असती, त्वदिभन्न जे कीं नर ॥ आज्ञाभंग तुझा करिन न कदां, मी सत्य कर्त्यावर ॥ ठेवोनी अवघाचि भार झटूं या, लोकां कराया हिता ॥ हाताला धरुनी तुला वरितसें, सर्वांपुढें मी अतां ॥ शुभमंगल सावधान ॥ ४ ॥
सत्यपाळक स्त्री-पुरुषांचा आशीर्वाद आभारा बहु मानिजे आपुलिया, माता-पित्यांचे सदा ॥ मित्रांचे तुमच्या, तसेच असती जे इष्ट त्यांचे वदा ॥ वृद्धां पंगु सहाय द्या मुलिमुला, विद्या तया शिकवा ॥ हर्षे वृष्टि करा फुलांचि अवघे, टाळी अतां वाजवा ॥ शुभमंगल सावधान ॥ ५ ॥वर (शपथ)
आजपासून मी तुला माझी भार्या कबूल करुन, मानव पंचांसमक्ष मी अशी प्रतिज्ञा करतों कीं, आजपासून मी मनीं कोणत्याहि प्रकारचा कुतर्क न धरुन एक क्षणभरदेखील तुझ्याबाहेर जाणार नाहीं; म्हणून आपल्या सर्वांच्या उत्पन्नकर्त्यासहित आपल्या कुळस्वामीस स्मरुन प्रतिज्ञा करितों.
वधु (शपथ)
आजपासून मी तुला माझा भ्रतार कबूल करुन, मानव पंचांसमक्ष मी प्रतिज्ञा करितें, ती अशी कीं, आजपासून मी मनीं कोणत्याही प्रकारचा कुतर्क न धरुन एक क्षणभरदेखील तुझ्याबाहेर जाणार नाहीं; म्हणून आपल्या सर्वांच्या उत्पन्नकर्त्यासहित आपल्या कुळस्वामीस स्मरुन प्रतिज्ञा करितें.सत्यशोधक विवाह संपन्न
— सत्यमेव जयते








