अमरावतीत अखिल भारतीय माळी महासंघाच्या धावत्या भेटीत ईश्वरी गांजरेचा कमाल! — चित्रकलेतून मान्यवरांचे स्केच काढून सर्वांना थक्क केले!

📰 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
🌼 अमरावतीत अखिल भारतीय माळी महासंघाच्या धावत्या भेटीत ईश्वरी गांजरेचा कमाल! — चित्रकलेतून मान्यवरांचे स्केच काढून सर्वांना थक्क केले! 

अमरावतीतील खारकर कॉम्प्लेक्समध्ये अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश शिरोळकर, उपाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर, आणि प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर यांनी धावती भेट दिली.
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष डी. एस. पवार, गणेश मानकर, विलास गांजरे आणि त्यांच्या कन्या ईश्वरी विलास गांजरे उपस्थित होत्या. बसल्या बसल्या ईश्वरीने आपल्या चित्रकला नैपुण्य, वक्तृत्व आणि स्मरणशक्तीच्या जोरावर सत्यशोधक लिंगे, रमेश शिरोळकर आणि गौतम क्षीरसागर यांची स्केच पेंटिंग करून सर्वांचे लक्ष वेधले.
या प्रतिभावान मुलीचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार व आशीर्वाद करण्यात आला. डी. एस. पवार यांनी सर्व वरिष्ठांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संघटनेच्या नवीन पदाधिकारी निवड, तरुणांना स्थान, आणि ओबीसी आरक्षण विषयक पुढील धोरणावर सविस्तर चर्चा झाली.
📲 आपला संपर्क: 7387737801
👉 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा!
❤️ बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि कमेंट करा!
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!



