टॉप न्यूजमहाराष्ट्रसोलापूर

हक्कांसाठी सर्व आघाड्यांवर लढा आवश्यक – सत्यशोधक शंकरराव लिंगे

 

न्याय हक्कांसाठी सर्व आघाड्यांवर लढा आवश्यक – सत्यशोधक शंकरराव लिंगे

 

महात्मा फुले समता परिषदेची सर्वसाधारण सभा सोलापूरमध्ये उत्साहात संपन्न

सोलापूर – समाज कल्याण सभागृह, रंगभवन चौक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सर्वसाधारण सभा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी नुकतेच जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या बापूसाहेब भंडारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिलीप पाटील मोहोळ बसवराज पुजारी अक्कलकोट इरफान शेख सोलापूर बजरंग शेंडेकर मोहोळ पंचप्पा धनशेट्टी आहेरवाडी बालाजी माळी दक्षिण सोलापूर कोमल गायकवाड शरणावती लिंबी तोटे उमा अकोलकर उत्तर श्रीपती ढोणे मंगळवेढा #### इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते 

अध्यक्षीय भाषणात शंकरराव लिंगे यांनी# सांगितले की, “माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब रस्त्यावरची, विधानसभेतील, सभागृहातील आणि न्यायालयातील सर्वच लढाया लढत आहेत.” नुकत्याच समीर भुजबळ यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27% ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिले, याबद्दल दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.

लिंगे यांनी स्वतः सुरू असलेल्या हायकोर्टातील (याचिका क्र. 3468/2024) सुनावणीविषयी माहिती देताना सांगितले की, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये निकाल अपेक्षित आहे. त्यांनी 2007 मधील छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाचा निकाल, 2018 मधील गायकवाड आयोगाचा अहवाल आणि त्यानंतर झालेल्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः 2018 मध्ये सोलापुरात निवेदन देताना झालेल्या हल्ल्याची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, या हल्ल्यात डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून चार शस्त्रक्रियेनंतर केवळ 15-20% दृष्टी शिल्लक आहे, पण “जोपर्यंत नजर आहे, तोपर्यंत समाजकार्यासाठी लढत राहीन” अशी भूमिका त्यांनी ठामपणे मांडली.

ओबीसींच्या हक्कांच्या लढाईत केवळ एकाच व्यक्तीची किंवा जातीची नव्हे तर संपूर्ण समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्रातील 346 जाती आणि देशभरातील मंडल आयोगाने शिफारस केलेल्या 3743 जाती व सव्वा लाख पोटजातींचे नेतृत्व छगनराव भुजबळ हे करत असून, त्यांना रामलीला मैदानावरील सभेत देशभरातील नेत्यांनी “ओबीसींचे राष्ट्रीय नेते” मानले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

सरकारच्या 12-13% मराठा आरक्षण निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मराठा समाज मागासवर्गीय ठरत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही 2023 मध्ये नेमलेल्या सक्रे आयोगाच्या अहवालावरून ओबीसी आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे लिंगे यांनी सांगितले. “मराठा समाजाला आधीच केंद्र सरकारकडून 10% EWS आरक्षण मिळाले आहे, ते पुरेसे आहे,” असे स्पष्ट करत जातिनिहाय जनगणनेची मागणी त्यांनी केली.

सभेत खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली –

एससी, एसटी, अल्पसंख्यांक यांसारखा चौथा कॉलम ओबीसींसाठी ठेवून जातिनिहाय जनगणना करणे

सामाजिक बांधिलकीची दिशा ठरवणे

जिल्हा व तालुका समित्यांची नवीन नेमणूक

महापुरुषांचा अवमान रोखणे

ओबीसी व अल्पसंख्यांक समाजावरील हल्ले थांबवणे

दुर्बल घटकांचे हक्क संरक्षण

बंधुभाव व जातीय सलोखा प्रस्थापित करणे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी केले.

 सभेला जिल्ह्यातून शेकडो समता सैनिक उपस्थित होते कोमल गायकवाड आणि त्यांचे सहकारी. महिलांचे हस्ते क्रांतीज्योत पेटवून उद्घाटन करण्यात आले महापुरुषांच्ygया प्रतिमेस अभिवादन करण्यात आले चहापानानंतर सभा संपन्न झाली

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button