टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा समाजाला प्रबोधन करताना तुफानी भाषण शेगावच्या माळी समाज वधू वर मेळाव्यात!

  1. माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा समाजाला प्रबोधन करताना तुफानी भाषण शेगावच्या माळी समाज वधू वर मेळाव्यात!
  1. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आज माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन पार पडले. या महासंमेलनाला उपस्थित राहिलो. या महासंमेलनात माळी समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यांच्याशी संवाद साधला. माळी समाजातही अनेक पोट जाती आहे. मात्र आपण सर्वांनी माळी म्हणून एकत्र राहिले पाहिजे, एकसंध राहिले पाहिजे. ओबीसीमध्ये माळी समाज हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांवर आपण नेहमीच जागरूक राहून काम केलं पाहिजे. इतर समाज बांधवांना सोबत घेऊन आपण पुढे जायला हवे. त्यातून महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, असे मत मांडले. एक तर जातनिहाय जनगणना करा किंवा आम्ही ५४ टक्के आहोत यावर शिक्कामोर्तब करा, या मागणीचा जोरदार उच्चार यानिमित्ताने केला.गेल्या ३१ वर्षांपासून माळी सेवा मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर काम करणारं हे मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम करतंय, ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. या मंडळाने सन १९९०-९२ च्या कालावधीत मंडळाने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. इतर समाजाने देखील याचे अनुकरण करून असे विवाह सोहळे आयोजित करण्यास सुरुवात केली. ही या मंडळाच्या सामाजिक कार्याची महत्वाची पावती असल्याची भावना मांडली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या लढाईत माळी समाजाचे सैनिक सरदार देखील होते. आपला समाज हा लढवय्या आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात आपल्याला लढावेच लागेल.

    समाजातील मागासवर्गीय वंचित घटकांसाठी लढत राहणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम नेहमीच समता परिषदेने केले आहे. गेली वर्ष – दीड वर्ष आपण सर्वांनी जो लढा दिला तो जनतेसमोर आहे. पण लढाई संपलेली नाही, अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या अधिकारावर गदा आणण्याचे काम काही मंडळी करतील त्यावेळी आपल्याला लढावे लागेल, असा विचार मांडला.

    यावेळी आ. मनोज कायंदे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार कृष्णाराव इंगळे, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार बळीराम शिरसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. नाझीर काझी, माधवराव खंडारे, संतोष खांडेभराड, प्रकाश तायडे, धोंडीराम खंडारे, भास्करराव आंबेकर, अजय तायडे यांच्यासह समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

    दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा
    #malisamaj #buldhana #obc #शेगाव #people #work

 

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button