टॉप न्यूजसोलापूरसोशल

साताऱ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सर्वसाधारण सभा – सामाजिक न्यायासाठी ठरणार

सातऱ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सर्वसाधारण सभा – सामाजिक न्यायासाठी ठरणार दिशा

सातारा, दि. १० ऑगस्ट २०२५ (रविवार)

स्थळ: संत सावता माळी महाराज मंदिर, फलटण सातारा

वेळ: सकाळी १०.३० वाजता

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सातारा जिल्हा सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सत्यशोधक शंकरराव लिंगे प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भूषविणार आहेत.

या सभेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेल्या डॉ. बी. के. यादव यांचा सत्कार पार पडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन समता, सामाजिक न्याय, आणि ओबीसी-अल्पसंख्याक समाजांच्या हितरक्षणासाठी करण्यात आले असून खालील प्रमुख विषयांवर विचार विनिमय होणार आहे:

सभेचे प्रमुख मुद्दे:

डॉ. बी. के. यादव यांचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

आगामी सामाजिक आव्हानांबाबत दिशा ठरविणे

जिल्हा आणि तालुका समित्यांची नवीन नेमणूक

महापुरुषांची अवहेलना व बदनामी रोखण्यासाठी निवेदन देणे

ओबीसी आणि अल्पसंख्य समाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना

समता परिषदेमार्फत दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण

विविध जातीसमूहांना सहभागी करून बंधुभाव, जातीय सलोखा निर्माण करणे

आयत्यावेळी अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांवर चर्चा

सदर सभा ही सामाजिक न्याय, समता व बंधुत्वाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. त्यामुळे सर्व समता सैनिकांनी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बी. के. यादव (जिल्हाध्यक्ष, सातारा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद) यांनी केले आहे.

 

संपर्क:

डॉ. बी. के. यादव – जिल्हाध्यक्ष, सातारा

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद+917588059259

 दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button