सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.153

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.153

लक्ष्मणराव ठोसर या भ्रातृभाव संस्थेचे सचिव होते. मराठा भ्रातृभाव संस्थेचे

नियमित वार्षिक संमेलन होत असे. ही संमेलनं वेताळपेठेतील काळूराम मन्साराम

नाईक यांच्या वाड्यात उत्साहाने होत असत. या वार्षिक संमेलनाचा आरंभच

ज्येष्ठ सत्यशोधक भास्करराव जाधवांच्या व्याख्यानाने झाला. दरम्यान पां. चि.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठा सोशल क्लब’ची स्थापना पुण्यात करण्यात आली. या मंडळाच्या कार्यामध्ये लक्ष्मणरावांचा मोलाच सहभाग राहिला. तसेच गुरुवर्य बाबूराव जगताप यांनी स्थापन केलेले श्रीशिवाजी मराठा संस्थेचे श्रीशिवाजी हायस्कूल हे शिंदे आळीतील ‘ब्रदरहूड’च्या जागेत आरंभी भरत असे (१९१८). अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे आठवे अधिवेशन दिनांक २७, २८ व २९ डिसेंबर १९१४ रोजी देवास (धाकटी पाती) येथील श्रीमंत बाबासाहेब महाराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे भरले. प्लेगच्या साथीचा जोर असताना फर्ग्युसन महाविद्यालयात भरलेल्या या अधिवेशनाच्या स्वयंसेवकाचे संपूर्ण कार्य ‘मराठा भ्रातृभाव’ संस्थेच्या स्वयंसेवकांनी चोखपणे बजावले. या कामी लक्ष्मणराव ठोसरांचे आणि गुरुवर्य बाबूराव जगतापांचे सहकार्य मोलाचे राहिले.

लक्ष्मणराव ठोसरांनी आपल्या मुलीचा विवाह इ. स. १९१३ मध्ये सत्यशोधक समाज पद्धतीने लावला. या विवाहाचे पौरोहित्य कोल्हापूरकर सत्यशोधक हरिभाऊ चव्हाण यांनी केले. या विवाहासाठी चव्हाण मुद्दाम कोल्हापूरहून आले होते.

सत्यशोधक मेहुणे ‘दीनबंधु’ कार वासुदेवराव बिर्जे यांच्या अकाली निधनाने (१९०८) लक्ष्मणराव ठोसर आपल्या विधवा बहिणीच्या पाठीमागे (सत्यशोधक तानुबाई बिर्जे) खंबीरपणे उभे राहिले. ‘दीनबंधु’ पत्राच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या प्रासंगिक अडचणींना सामोरे गेले.

लक्ष्मणराव ठोसर नोकरी सांभाळून अधूनमधून सत्यशोधक अधिवेशनांना उपस्थित राहत. प्रसंगी लेखनही करत. ‘मराठा विद्यार्थ्यांचे पहिले संमेलन’ ही ठोसर-जगतापांची पुस्तिका १९१२मध्ये प्रसिद्ध झाली. वडील देवराव ठोसरांची एक स्मरणनोंदही प्रसिद्ध झाली आहे. फार पुढे मुंबई येथे भरलेल्या १५ व्या अधिवेशनात (९व १० नोव्हेंबर १९४०) ‘सत्यशोधक समाज इतिहास लेखन समिती’ स्थापन करण्यात आली होती. या सत्यशोधक मान्यवर समितीचे ठोसर एक सदस्य होते.

संदर्भ – १. गुरुवर्य – डॉ. अविनाश बा. जगताप, २. आम्ही पाहिलेले फुले

सत्यशोधकांचे अंतरंग / २०९

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button