टॉप न्यूजमहाराष्ट्र

जोतीराव फुले यांचा लढा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, तर अंधश्रद्धेच्या विरोधात :- छगनराव भुजबळ साहेब.

जो

[gspeech-button]
तीराव फुले यांचा लढा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, तर अंधश्रद्धेच्या विरोधात :- छगनराव भुजबळ साहेब.

श्री संत सावता माळी समाज विकास मंडळ

यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीच्या निमित्ताने कळंबोली, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी संत श्री सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी छगनराव भुजबळ साहेब बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवते असून त्यांच्या विचारांची जोपासना करावी, असे आवाहन केले. महात्मा जोतीराव फुले यांचा लढा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, तर अंधश्रद्धेच्या विरोधात होता. ब्राम्हण समाजाला नाही, तर ब्राह्मण्यवादाला त्यांचा विरोध होता. प्लेगच्या साथीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलगा यशवंतच्या माध्यमातून रुग्णालय सुरू करून आपल्या प्राणांची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. कुणी जातीने नव्हे, तर कामाने श्रेष्ठ ठरतात अशी शिकवण फुले दांपत्याने समाजाला दिली, असे विचार मांडले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज, उद्धव भुजबळ, बापू भुजबळ, किरण झोडगे, रघुनाथ ढोक, नितीन जाधव, प्रा. अमर हजारे, बबन मोकादम, सुरेश जाधव, वैशाली भुजबळ, अमोल बोचरे, मोनिका महानवर, प्रकाश महानवर, प्रमिला पाटील, गणेश जांभुळकर, अमर पाटील, तेजस कांबळे, देवकी शिंदे, जयराम डोके, लहूशेठ मलकमिर, उत्तमराव शिंदे, रवी पाटील, मोनिका काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

#SavitribaiPhule #mumbai #ChhaganBhujbal
[ Shankarrao Linge: दीनबंधु न्यूज़ शिवक्रांति टी. वी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 9422068 771 वाटरशिप ग्रुप समाचार वीडियो में जोड़ें लाइक करें सब्सक्राइब करें

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button