ओबीसी नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांची अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी मुंबईत घेतली भेट!

ओबीसी नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांची अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी मुंबईत
घेतली भेट!
चालू घडामोडीच्या विषयावर 3 जानेवारी नायगाव आणि सहा जानेवारी पंढरपूर येथे होत असलेल्या जाहीर सभेच्या निमित्ताने यावेळी शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून येत असलेले मराठा समाजाचे फोन आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने भुजबळ साहेब जे बोलतात ते थांबवण्याबद्दल अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे विधाने करतात त्याच्या उपाययोजना करण्याबाबत ही चर्चा करण्यात आली या वेळेला भुजबळ साहेब म्हणाले ही लढाई आपणाला रस्त्यावर लढावी लागेल शासनामध्ये लढावे लागेल आणि कायदेशीर लढा द्यावा लागेल त्यासाठी सर्व बीसी ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक याने एकत्र येणे गरजेचे आहे कारण जरांगे हे आपले अरेरावेचे वक्तव्य करतात बेकायदेशीर बोलतात आणि असभ्य भाषा वापरून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आता नवीनच सगळ्यांना सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र देण्याची मागणी करतात त्यामुळे एससी एसटी ओबीसी या सर्वांचेच आरक्षण धोक्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे अन्यथा आपलं आरक्षण आता जवळजवळ संपलेलच आहे त्यासाठी महाराष्ट्रभर सभा संमेलन निवेदन मोर्चे धरणे आंदोलन उपोषण असे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आपल्याला करावी लागतील त्यासाठी प्रामुख्याने सर्व समाजाने प्रयत्न केले पाहिजेत अशी एकंदर चर्चा झाली आणि पंढरपूरचा मेळावा यशस्वी कसा करता येईल त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी भुजबळ साहेब यांनी तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे सहा जानेवारीला पंढरपुर येथे सकल ओबीसी एल्गार महाकाय सभा 13 जानेवारीला बीड येथे सकल ओबीसी एल्गार महाकाय सभा 17 जानेवारी 2024 ला उस्मानाबाद येथे सकल ओबीसी एल्गार महाकाय सभा होणार असल्याचे सांगितले सर्व मेळाव्याच्या तारख्या देण्याचे सभा संमेलनाचे नियोजन आयोजन करणे बद्दल निमंत्रक म्हणून शब्बीर भाई अन्सारी हे काम पाहत असल्याचे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी सांगितले यानंतर सकल ओबीसी समाजाचे मेळाव्यात कुठे आणि कधी घ्यायचे त्याबद्दल शब्बीर भाई अन्सारी यांच्याशी सर्व सकल ओबीसी समाजाने संपर्क साधा असे सांगण्यात आले झालेले एल्गार मिळावे आणि होणाऱ्या यलगार मेळाव्या विषयी आणि मराठा ओबीसी आरक्षण बाबत पुढील ध्येयधोरण अनेक विषयावर सर्वांगीण सखोल चर्चा भुजबळ साहेब आणि शंकरराव लिंगे यांच्यामध्ये प्रति दीर्घ दीड तास शांताक्रुज येथील निवासस्थानी संपन्न झाली दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा




