आरक्षण हा संविधान व न्यायालयाच्या अंतर्गत विषय आहे मग जाती जातीत वाद का? – परमेश्वर बनकर, बीड

आरक्षण हा संविधान व न्यायालयाच्या अंतर्गत विषय आहे मग जाती जातीत वाद का?
– परमेश्वर बनकर, बीड 9503288282
आरक्षण हा संविधानिक व न्यायालयीन मुद्दा आहे. आरक्षण कोणत्या घटकाला कोणत्या तत्वावर दिलं जातं हे घटनेत नमूद असताना जाती जातीत जे वाद होताना दिसत आहेत हे वाद दिशाहीन वाद आहेत. याला कोणतंही तात्विक स्वरूप दिसत नाही.
आरक्षणाच्या घटनात्मक चौकटीत एखादा समाज बसतो की नाही हे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाने ठरवलं जातं,नंतर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय सुद्धा महत्वाचा असतो,त्या मुळे कुठल्याही आरक्षण मागणाऱ्या घटकाला वरील निकष पूर्ण करावेच लागतात. वरील निकष पूर्ण केले की त्या समाजाला कोणही आरक्षण घेण्यापासून रोकु शकत नाही. असं असताना मग दोन जातीत वाद कोण लावतंय हा प्रश्न पडतो. वाद लावण्यापेक्षा घटनात्मक तरतुदी लोकांना का सांगितल्या जात नाहीत. छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्याने किंवा त्यांना समाजात मराठा आरक्षणाचा विरोधी चेहरा दाखवल्याने आरक्षण मिळणार आहे का? भुजबळ साहेब म्हणजे संविधान किंवा न्यायालय आहेत का? भुजबळ नाही म्हणाले की आरक्षण मिळणार नाही हे मराठा समाजातील अभ्यासु लोकांना तरी कसं पटत आहे.ओबीसी आणि मराठा वाद होत असताना स्वतः ला अभ्यासक, विचारवंत, इतिहासकार म्हणून घेणारे हा वाद होताना शांत का आहेत? तीन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा पोस्ट सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा




