सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 72

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
72
घाटगे
पु. ह.
(जन्म- १५-७-१९१९)
सत्यशोधक पु. ह. घाटगे गुरुजी हे कर्वे नाका, कराड, जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत. घाटगे गुरुजी यांचा जन्म १५ जुलै १९१९ रोजी झाला. त्यांनी जयसिंगपूर येथून मॅट्रिकची परीक्षा दिली. घाटगे गुरुजी इ. स. १९४७ सालानंतर गुरुवर्य केशवराव विचारे यांच्या सहवासात आले. गुरुजीच्या सहवासात आल्यावर सत्यशोधक विद्यार्थी संघ आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यास वाहून घेतले. पु. ह. घाटगे गुरुजी यांनी मुंबई, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यांत सत्यशोधक विद्यार्थी वर्ग शिबिरे घेऊन समाजाचा प्रचार-प्रसार केला.
संदर्भ – १. सत्यशोधक समाज प्रबोधन पत्रिका संपादक जयवंत गुजर
घाडगे
रामचंद्र गोविंदराव
(मृत्यू – १९५५)
महात्मा फुले यांचा सच्चा शागीर्द, रांगडा शाहीर, कलावंत, सत्यशोधक चळवळीसाठी तन-मन-धनाने सर्वस्व अर्पण करणारे सत्यशोधक शाहीर रामचंद्र गोविंदराव घाडगे मौजे काले, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत. रामचंद्र घाडगे यांचे जेमतेम शिक्षण झालेले होते. ते सत्यशोधक चळवळीत इ. स. १९१० पासून कार्यरत असावेत.
जलसाकार रामचंद्र घाडगे हे जलशाबरोबर सत्यशोधक समाजाचे कार्यही हिरीरीने करायचे. इ. स. १९१६ साली त्यांनी ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका सत्यशोधक परिषदेचे आयोजनही केले होते. तसेच १९१७ साली सातारा जिल्हा ऐतिहासिक सत्यशोधक परिषद, मौजे कालेच्या संयोजनातही ते सहभागी झाले होते. सत्यशोधक रामचंद्र घाडगे यांचा पिंड क्रांतिकारी असल्याने सातत्याने ते धार्मिक गुलामगिरीविरुद्ध आपल्या परीने बंड करीत असत. औदुंबर येथील दत्तमूर्तीला पाणी घालणे, सज्जन गडावर प्रवेश करणे,रामकुंडावरील बंदी उठवणे, लोकमान्य टिळकांपुढे अर्जुन हात जोडून उभा असल्याचे पोस्टर फाडणे आदी गोष्टींमुळे ठिकठिकाणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले.
या सर्व संकटांशी तोंड देत असताना त्यांची जंगम मालमत्ता संपुष्टात आली. सर्व इस्टेट बरबाद झाल्यावर या रांगड्या सत्यशोधकाला सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांकडे मदतीसाठी याचना करावी लागली. काहींनी त्यांना मदतही केली. मात्र, ही मदत तुटपुंजी होती. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या काव्यावर बहुधा १९१६ मध्ये रामचंद्रराव घाटगे यांनी जलसा उभा केला असावा. २० मे १९२६ रोजी त्यांना सातारा लायसन्स अधिकाऱ्याचे जलसा परवानगीचे प्रमाणपत्र मिळाले. कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रबोधनावर काव्य आणि शिक्षण प्रसारक काव्यामुळे घाटगे यांचा जलसा लवकरच प्रसिद्धीस आला. या जलशाचा मराठवाड्यातील चौसाळा येथे प्रयोग झाला. घाटगे यांच्या जलशापासून प्रेरणा घेऊन चौसाळा येथील सत्यशोधक गणपतराव शिंदे यांनीही जलसा उभा केला. घाडगे यांच्या जलशाचे प्रयोग मराठवाड्यात दोन महिन्यांपर्यंत चालले.
ठाणे येथील आमदार सत्यशोधक शंकरराव जयराम झुंजारराव यांचे ‘ब्राह्मणेतर पक्षाची संघटना’ या विषयावर १२ ऑगस्ट १९२८ रोजी सायंकाळी पाच वाजता कराड येथील रविवार चौकात जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. पुढे
ते कोल्हापुरात स्थायिक झाल्याचे दिसते. अशा या उपेक्षित, ध्येयवेडया सत्यशोधकाच्या जीवनकार्यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध होत नाही. असे असले तरी त्यांचे १९५५ साली निधन झाले असावे.
संदर्भ – थोर सत्यशोधक रामचंद्र घाडगे यांच्या उपेक्षेचा पंचनामा डॉ. मा. गो. माळी यांचा लेख (पुरोगामी सत्यशोधक, पुणे, ए. मे. जून २०११)
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

