सप्रेम नमस्कार, मी सचिन झगडे,

सप्रेम नमस्कार,
मी सचिन झगडे,
डीएड , एमए , बीएड , डीएसएम , एमकॉम, सेट, एलएलबी, पीएचडी (ॲपि)
रयत शिक्षण संस्थेमध्ये 2002 पासून गेले 22 वर्ष सेवा करत आहे.
सध्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयात कार्यरत आहे.
गेल्या 20 वर्षापासून शिव – फुले – शाहू-आंबेडकर चळवळीमध्ये व्याख्यान, फिल्डवर्क , केडरकॅम्प्स तसेच सत्यशोधक लग्न, साखरपुडा या विधींच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करत आहे.
गेल्या वर्षी रयत बँकेच्या माध्यमातून निवडणूक लढवली नगर नाशिक विभागातून सुमारे २५०० मतदारांनी विश्वास दाखवला.
नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करण्यासाठी मी लढत आहे.
आपल्यासमोर संस्थाधिश, धनशक्तीने धनदांडगे उमेदवार असतील…
या निवडणुकीचा उपयोग पाच जिल्ह्यातील सुमारे 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन समाजाच्या लोकांमध्ये विचारधारेचा प्रचार प्रसार घडून आणण्यासाठी तसेच नवे बहुजन नेतृत्व निर्माण करण्याची अत्यंत महत्त्वाची संधी आहे. ही दवडता कामा नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
समाजामध्ये शिक्षक आमदाराने खऱ्या अर्थाने शिक्षण व्यवस्था समाजाभिमुख ठेवणे व ती मजबूत करणे ही शिक्षक आमदाराची जबाबदारी आहे.
पण आज गलेलठ्ठ श्रीमंतांनी शिक्षण प्रचंड महाग आणि गोरगरीब समाजासाठी दुर्मिळ बनवून ठेवले आहे. या विरोधात आवाज उठवणारा शिक्षक प्रतिनिधी जर तोच श्रीमंत आणि संस्थाधिश असेल तर तो या गरिबांच्या बाजूने विचार करणार कसा ….?
म्हणूनच सामान्य शिक्षकाची, समाजातल्या अत्यंत गरीब, बहुजन ,दलित, शेतकरी ,कष्टकरी, कामगार या सर्वांची शिक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ठेवून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मी लढणार याच्यासाठी :
*) शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येकाला जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.
१) केजी टू पीजी शिक्षण मोफत व सक्तीचे मिळवण्याची देण्याची जबाबदारी शासनाची असेल.
२) राष्ट्रीय स्तरावरचा ‘वन नेशन वन सिलॅबस’ राबवायला हवा.
३) शिक्षणावरचा खर्च ६% करण्यात येणार.
४) दर महिन्याला शासनाचे प्रतिनिधी अर्थात शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची मीटिंग घेऊन शिक्षकांच्या समस्या तसेच शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातील समस्यांच्या निपटारा केला पाहिजे.
५) अशैक्षणिक कामे तात्काळ बंद करण्यात आली पाहिजेत.
या वैचारिक क्रांतीसाठी आपल्या सर्वांची साथ आणि सहयोग मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.
सर्वांना विनंती आहे की माझ्या नावापुढे पसंती क्रमांक 1(एक )देऊन बहुमताने विजयी करावा ही नम्र विनंती….. ***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा
*

