ओबीसी मध्ये तीन प्रकारची लोक आहेत.

ओबीसी मध्ये तीन प्रकारची लोक आहेत.
१) अतिशय गरीब.आपापल्या रोजीरोटीत अडकलेले,पिचलेले,दबलेले.त्यांचे जगणे हीच मोठी लढाई आहे.
२) मध्यमवर्गीय.यातले बरेचजण आप्पलपोटे,संधिसाधू आणि लबाड.हे सर्वजण आपआपली ओळख दडवण्यासाठी अतोनात प्रयत्नशील असतात.बहुदा त्यांना आपण ओबीसी असल्याची लाज वाटत असावी.आपण बोललो तर,लढलो तर,फेसबुकला पोस्ट केली तर आपल्याला वाळीत टाकले जाईल अशी भीती यांना असते.
ओबीसीच्या प्रश्नावर काही लिहिले तर किंवा ओबीसी नेत्याच्या पोस्टला प्रतिक्रिया द्यायचे सोडा,त्याला लाईक करायलाही हे भेकडभावले घाबरत असतात.
३) राजकारणी,कायकर्ते,दलाल..
पंचायतराज मध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ गेल्या पंचवीस वर्षात लाखो ओबीसी राजकारण्यांना झाला.पण एखादा अपवाद वगळता बाकी सगळे आपापल्या पक्षीय मालकाचे सालगडी असल्याने मालक नाराज होऊ नयेत यासाठी लाचार बनले आहेत.ते उघडपणे बोलू शकत नसले तरी खाजगीतही ते ओबीसी लढ्याला पाठिंबा देत नाहीत.
एकटे भुजबळ साहेब बोलतायत,लढतायत ओबीसी साठी तेच शिव्या खातायत.आपल्याला त्याच काय..! आपण आपलं सुमडीत राहू.
यात तुम्ही कुटे आहात..?
– नागेश गवळी


