मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
?🟠🟡🔴🟠🟡🔴🟠 कामगार बिगुल’ संपादक मंडळाने ‘मराठा – ओबीसी आरक्षण संघर्ष बेरोजगारीच्या प्रश्नावर पांघरून घालण्याचे राजकारण’ हा संपादकीयात आरक्षणाच्या मराठा सद्य परिस्थितीवर चपखल भाष्य केले आहे. त्यात त्यांनी काही महत्त्वाची निरीक्षक अतिश नोंदविली आहेत. त्यांची काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे पुढीलप्रमाणे- १) मराठा – कुणको वा मराठा ओबीसी या वादांच्या मुळाशी असलेल्या वर्गीय अंतर्विरोधांना जातीय किरण चौकटीत अडकवण्याचे हे राजकारण आहे २) गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या समस्येचे मूळ भांडवली व्यवस्थेत न बघता मर्यादित संधीच्या राजकारणात बघणाऱ्या मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर काम करण्याकरिता त्यांनी आपली दोन एकर जमीन विकली. कष्टकरी वर्गातून येणारे जरांगे भांडवलशाहीने निर्माण केलेल्या गरीब कृषक वर्गाचे उदाहरण आहेत ३) दीर्घकाळाकरिता पाहिले तर अशा सर्वप्रकाराच्या अस्मितावादांच्या राजकारणाचा भाजपच्या हिंदुत्ववादी फँसीझमला फायदाच होतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
‘ओबीसी महिला आणि राजकीय आरक्षण’ हा लेख डॉ. लता प्रतिभा मधुकर यांचा असून आरक्षणात ओबीसी स्त्रियांचा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे. याबाबतीत केंद्र सरकारवर टीका करताना त्या म्हणतात, कोटामध्ये कोटा, ओबीसी महिलांसाठी खोटा कोटा’ या देशात ओबीसी स्त्रियांच्या संदर्भात एवढा रोष आणि विरोध का? ज्या ज्या वेळी महिला आरक्षणासंदर्भात विधेयक आले तेव्हा तेव्हा एस.सी., एस.टी. प्रवर्गातील महिलांना त्यात लोकसंख्येनुसार आरक्षण कोटा देण्याचे अंतर्भूत केले गेले. परंतु ओबीसी स्त्रियांना मात्र राजकीय आरक्षण दिले गेले नाही. केंद्र सरकारच्या या बिलाबाबत त्या म्हणतात, ‘महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन बिल नावाने अतिशय वाजत गाजत आणण्यात आले आणि दोन्ही सभागृहात मंजूर झाले, असे जाहीर केले आणि हास्यास्पदरित्या त्यावर कायदा बनल्यानंतर दहा वर्षांनी ते अंमलात आणले जाईल असा युक्तिवाद करून नारीशक्ती वंदन करण्याऐवजी तिचा मानभंग आणि अपेक्षाभंगच करण्यात आला.”
डॉ. आर. डी. शिंदे यांनी आपल्या ‘आरक्षणाचे धोरण, सामाजिक न्याय आणि मराठा जातीचे राजकारण’ या लेखात आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याच्या धोरणाची त्यांनी चिरफाड केली आहे. आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाच्या व न्यायाधीशांच्या धोरणावरही मार्मिक भाष्य या लेखात केले आहे. कुणबी ह्या नोंदी फक्त मराठ्यात नाही तर इतर ओबीसी जातीमध्ये ही सापडतात, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे. मराठा ओबीसीकरणाच्या धोरणामागील राजकारणावरही त्यांनी सडेतोड भाष्य केले आहे ते म्हणतात, ‘मूलतः कुणबी व मराठा हे वेगवेगळे जात समूह आहेत. भारतात आरक्षणाची संकल्पना उदयास येईपर्यंत कुणबी आणि
🟡🟡🟡🟡🟠🟠🟠🟠🔴🔴🔴🔴
मराठा यांच्यात कुठेच आंतरसंबंध नव्हता. म्हणून जरांगेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची अतिशय मार्मिक शब्दात त्यांनी चिकित्सा केली आहे.
महाराष्ट्रातील मराठा राजकारण ते आरक्षण: एक अन्वयार्थ’ हा डॉ किरण गायकवाड यांचा लेख मराठा अस्मितेची उकल करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा सोडून ब्राह्मण, तत्सम वरिष्ठ जाती बरोबरच इतर मागासवर्गीय जातीचाही प्रभाव दिसून येत आहे. याची खदखद मराठा राजकारण्यांमध्ये आहे. याचे निर्देशन या लेखात येते. विसाव्या शतकात स्वतःला मागास मानायला तयार नसलेला मराठा आज स्वतःला मानायला तयार झालेला दिसून येतो याची कारणमीमांसाही डॉ. गायकवाड करतात.
मराठ्यांचे कुणबीकरण : ओबीसी प्रवर्गात शिरण्याचा (चलाख) मार्ग’ हा
सई ठाकूर आणि यशवंत झगडे यांचा लेख कुणबी जातीची समाजशास्त्रीय मांडणी पुढे आणतो. कुणबी ही एकाच वेळी व्यावसायिक, वर्गीय, आणि जातीय ओळख आहे. शेती हा व्यवसाय अनेक जाती करत असल्यामुळे कुणबी ही जात एक खूप छिद्रे असलेल्या चाळणीसारखी आहे. सगेसोयरे ही एक विवादास्पद संकल्पना असल्याचे निरीक्षण लेखकद्वय नोंदवितात. याचे विस्तृत स्पष्टीकरण ही त्यांच्या लेखात आढळते.
मराठ्यांचे कुणबीकरण आणि रोहिणी आयोग’ या लेखात बाबा बीडकर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात, ‘प्रबळ जातींची आंदोलने स्वतःच्या जातीला आरक्षण मागण्यासाठी आहेत की इतर मागास जातींचे आरक्षण संपवण्यासाठी? रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा परिणामही बाबा बीडकर यांनी सम्यक शब्दात व्यक्त केला आहे. ते म्हणतात ‘रोहिणी आयोगाचे कामकाज सुप्रीम कोर्टाची टिप्पणी या सर्व पार्श्वभूमीवर मराठा जातीच्या कुणबीकरणाचे परिणाम लक्षात घेतले तर सर्वात आधी कुणबी जातीला याचा फटका बसून ते आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर जाण्याची शक्यता प्रबळ होईल.’
‘ओबीसी अन्याय शोषणाधिष्ठित व्यवस्थेचा बळी’ हा लेख प्रा. अभय जायभाये यांचा जात वर्ण व्यवस्थेने केलेल्या शोषणावर व सामाजिक न्यायाच्या अमंलबजावणीवर भाष्य करणारा आहे.
लेखकांनी त्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढून लेख लिहून दिले. पुस्तकाच्या विषयवस्तूचे महत्त्व ओळखून त्यांनी आमच्या विनंतीला मान देत तत्परतेने लेख लिहून दिले. त्याबद्दल आम्ही सर्व लेखकांचे आभार व्यक्त करतो.
डॉ. राजू जाधव यांनी पुस्तकाचा आशय नेमकेपणाने व्यक्त करणारा बर्ब लिहून दिला. तसेच पुस्तक अधिक निर्दोष होण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनाही
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितां ।
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
असा जोडूनच पुढली वाटचाल करावी लागेल. ब्राह्मणी-भांडवली व्यवस्थेने बंदीचे हत्यार उपसले आहे. या शिक्षणबंदी विरोधी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाती भूमिका आपण घेऊया.’
मराठा पेचप्रसंग’ या लेखात विवेक घोटाळे यांनी शेतकरी जातींना आरवाण मागण्याची वेळ का आली ? याची चर्चा केली आहे. शेती, रोजगार, शिक्षण या पेड प्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामातून पुढे येणारी मागणी म्हणजे ‘आरक्षणाची मागणी होय’ तसेच मराठा – ओबीसी संघर्षाची बीजे कशात आहेत याचें चपखल भाष्य ते लेखात करतात. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुध्दाने दोन्ही समाजात तेढ निर्माण झाली आहे. पुढील दिशाही तणावग्रस्त असणार आहे याची जाणीव विवेक घोटाळे करून देतात.
‘मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि वास्तव’ या लेखात डॉ. रेणुकादास उबाळे यांनी मराठा – ओबीसी आरक्षण युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्वेषभावना टोकाला गेल्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर उपाययोजना ही सांगितली आहे. ‘वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला नकार, समानतेची वाट चोखळणाऱ्या वारकरी व इतर अब्राह्मणी संस्कृतीशी आपण सर्वांनी वाट चोखळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. थोडक्यात धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनातून या प्रश्नाला कायमचे उत्तर दिले पाहिजे असे ते म्हणतात. ‘आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जाती अंतर्गत वर्गकलह हे कारण असल्याचे स्पष्टपणे जाणवते. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी मराठा जातीतील वर्गकलहासंबंधी वाडीवरचा मराठा, वाड्यावरचा मराठा व गढीवरचा मराठा
🟠🟠🟠🟠
🔴🔴🔴🔴
🟡🟡🟡🟡
अशी मार्मिक वर्गरचना सांगितली आहे. तसेच ‘मुळातच आरक्षण विरोधी असणाऱ्या व झुंडशाहीचे मानसशास्त्र खोलातून न जाणणाऱ्या ब्राह्मणी भांडवली शक्तीला जात वर्गीय ध्रुवीकरणातून आपले राजकीय हित साधता येणार आहे. हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने वेळीच ओळखले पाहिजे असे डॉ. उबाळे सांगतात व पुढील जनआंदोलनाची प्रारूपे कशी हवीत याचेही दिशानिर्देशन करतात.🔴🔴🔴🔴🔴🟠🟠🟠🟡
ओबीसी मराठा आंदोलन काही महत्त्वाची निरीक्षणे…!’ या लेखात डॉ. प्रल्हाद सुलेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. मराठ्यांसाठी आटापिटा करणाऱ्या सरकारला त्यांनी विचारलेला प्रश्न अनुत्तरीतच आहे ते म्हणतात ‘कधीही अंगभर वस्त्र आणि पोटभर अन न न मिळणाऱ्या ओबीसी जातींची चिंता शासनाला का वाटत नाही ? गेल्या दहा वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा कमालीच्या वाढल्या आहेत. जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसींच्या पुढील कैक पिढ्यांचा बळी घेणारे आहे. असे सूचक विधान ते करतात.
आरक्षण धोरण, वास्तव आणि अपेक्षा’ या लेखात डॉ. सुधाकर शेलार यांनी राजकीय आरक्षण नसले तर उपेक्षितांना सत्तेत येण्याची संधीच मिळणार नाही. हा निष्कर्ष काढला असून केवळ आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे. तसेच सर्व आस्थापनाचे आणि संस्थांचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी केली आहे. खाऊजा धोरण राबविणाऱ्या प्रस्थापितांना हे कसे जमेल ही शंकाच आहे.
‘बिहार जातनिहाय जनगणना ओबीसी चळवळीचे जात्यांतक क्रांतीपर्व या लेखात श्रावण देवरे यांनी ब्राह्मणी व अब्राह्मणी अशा दोन परस्पर विरोधी छावण्या कार्यरत असून जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आपली भूमिका निःसंदिग्ध शब्दात व्यक्त केली आहे. अब्राह्मणी छावणीच्या योगेंद्र यादवांच्या मांडणीचा हवाला देऊन जातनिहाय जनगणनेचा संबंध थेट जातीअंताच्च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी जोडतात. बिहार प्रमाणे महाराष्ट्र सरकार जातनिहाय जनगणना न करण्याचे कारण ही त्यांनी स्पष्ट केले आहे. पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करून ओबीसी वर्गावर अन्याय केल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण ते नोंदवितात. १९९६ साली देवेगौडा सरकारने ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून योग्य दिशेने पाऊल टाकले होते. मात्र देवेगौडा सरकार अल्पकाळ राहिले. बिहारमध्ये नितीश कुमारांनी मात्र जातनिहाय जनगणना करून नव्या जात्यांतक पर्वाला सुरुवात केल्याचे ते सांगतात. क्रमशः
भा5
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




