महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे स्मारक पिंपरी चिंचवड महापालिका सिओंचे दुर्लक्ष ओबीसी कार्यकर्त्यांचे धरणे आंदोल सुरू

- ♦♦पालिका अधिकारी जाणून-बुजून महात्मा फुले सावित्रीबाई फुले स्मारकाकडे दुर्लक्ष करीत आहेत सहा महिन्यापूर्वी निघणारी निविदा आजपर्यंत निविदा पूर्ण होत नाही महात्मा फुलसावित्रीबाई फुले यांचे पुतळे झाकून ठेवावे लागतात हे अधिकारी दुसऱ्या कामाकडे जास्त लक्ष देत आहेत आणि सावित्रीबाई फुले महात्मा फुले या महामानवांच्या कार्यासाठी किंवा त्यांच्या स्मारकासाठी वेळ देत नाहीत दुर्लक्ष करतात टेंडर ची मुदत संपली तरी टेंडर काढत नाहीत
- त्यामुळे पिंपरी-चिंचवड भागातील ओबीसी कार्यकर्ते आता आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहेत याची दखल शासनाने घ्यावी टेंडर निविदा काढावी अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा ओबीसी योद्धा एडवोकेट मंगेश ससाने आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे
पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्माण होत असलेल्या नियोजित महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे. आणि अजूनही ते काम पूर्ण झाले नाही, आगामी 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी योग्य पद्धतीचे नियोजन प्रशासनाने करावे, हे स्मारक तातडीने पूर्ण करण्यात यावे, कामाचा जो निकृष्ट दर्जा आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, या मागण्यांसाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने महापालिका गेटवर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. मानवजी कांबळे. मा. नगरसेवक संतोष आण्णा लोंढे. श्री. मारुती भापकर. श्री. आनंदराव कुदळे. श्रीमती वंदनाताई जाधव. अॅड विद्या शिंदे. श्री. संतोष कुदळे. श्री. विशाल जाधव. श्री. शंकर लोंढे आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात महात्मा जोतिबा फुले मंडळाचे वतीने श्री. हणमंत माळी. श्री. सुर्यकांत ताम्हाणे. श्री. विश्वासराव राऊत. श्री अनिल साळुंके. श्री. प्रकाश गोरे. आदि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी बैठक घेऊन यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. 25 जुलै 2025 पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. महापालिकेच्या मुख्य शहर अभियंत्या बरोबर इतर संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या समवेत उद्या बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक निश्चित करण्यात आली आहे.
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी


