सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 68

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
68

लेखक, विचारवंत सी. र. तारकुंडे, ‘दीनमित्र ‘कार मुकुंदराव पाटील, प्रथम सत्यशोधक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष गणपतराव बिरमल, नामदार भास्करराव साधव आदी सत्यशोधक दिग्गजांनी प्रसंगानुसार गोपाळे यांचा नामोल्लेख मोठ्या गौरवाने केलेला आढळून येतो. प्रस्तुत बिनीच्या सत्यशोधक दिग्गजांच्या नामोल्लेखावरून गोपाळे हे बिनीचे सत्यशोधक होते, हे निर्विवाद सत्य आहे. इ. स. १८९२ साली पुणे येथील वास्तव्यात, सत्यशोधक समाजाचे उपदेशक या नात्याने गोपाळे यांनी ‘धर्मढोग परिस्फोटण’ या शीर्षकाची सव्वीस पृष्ठांची सत्यशोधक मताची एक खळबळजनक पुस्तिका ‘दीनवत्सल छापखाना, मुंबई’ येथून मुद्रित करून प्रकाशित केली. मात्र, १८९२ सालची ही क्रांतिकारी पुस्तिका आजमितीला दुर्मिळ झाली असून, अनुपलब्ध आहे. प्रस्तुत पुस्तिकेची लेखन मांडणी करीत असताना गोपाळे यांनी ‘दीनबंधु’ कार कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्याशी अनेकदा चर्चा केली. थोडक्यात, या पुस्तिकेला भालेकरांचे वैचारिक मार्गदर्शन लाभले होते, यात शंका नाही. पुढे ‘हिंदू आणि ब्राह्मण’ ग्रंथाचे कर्ते आणि कृष्णराव भालेकरांचे जनकपुत्र मुकुंदराव पाटील यांनी या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत भालेकरांच्या परिचयपर लेखात म्हटले होते की, ‘धर्मढोंग परिस्फोटण’ हा निबंध भालेकरांनी दुसऱ्याच्या नावाने प्रसिद्ध केला होता. बहुधा मुकुंदराव पाटलांचे हे ऐकीव मत असावे. दुसरे असे की, इ. स. १८९२ साली मुकुंदराव पाटील हे अवघ्या सात-आठ वर्षांचे होते. असो.

दाजीसाहेब गोपाळे यांनी ‘धर्मढोंग परिस्फोटण’ पुस्तिकेमध्ये कुठलीही कसर न ठेवता ब्राह्मण्यावर कठोर वैचारिक हल्ला चढविला होता. या हल्ल्याने दुखावलेल्या एका सनातनी अनामिक लेखकाने सत्यशोधकी विचाराचे एकांगी खंडण करण्याहेतु ‘सत्यशोधकांचे असत्य प्रलाप अथवा धर्मढोंग परिस्फोटण’ हा ११९ पृष्ठांचा एक सनातनी मतांचा ग्रंथ फत्तेसिंह छापखाना, बडोदे येथून शुक्रवार, १ सप्टेंबर १८९३ रोजी वैदिक धर्माभिमानी अनामिक व्यक्ती या नावाने प्रकाशित केला.

सत्यशोधक समाजाचे आरंभीचे कार्यकर्ते जेमतेम शिकलेले असत. ते अंतरीच्या कर्मनि लेखन करून बहुजनांना धार्मिक गुलामगिरी अव्हेरण्याचे आवाहन करीत असत. अशा आशयसंपन्न लेखनात ते कडाडून ब्राह्मण्यावर सडेतोड टीका करीत असत. त्यामुळे अशा प्रसंगी शाब्दिक व्याकरण दोष तसेच राहून जात. आशयसंपत्रतेकडे दुर्लक्ष करून सनातनी लेखक विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा

सत्यशोधका

कित्ता गिरवून ब्राह्मण्यग्रस्त भूमिकेतून सत्यशोधकी लेखकांवरून तुटून पडत. प्रस्तुत सनातनी लेखकही गोपाळे यांच्या लेखनावर असाच तुटून पडला आहे. या बडोद्याच्या अनामिक लेखकाने गोपाळे यांच्या सत्यशोधकी मताचे खंडण करण्याएवेजी शुद्धलेखनाचा बाऊ करून सनातनी नथीतून गोपाळे यांच्या लेखनावर पदोपदी तीर मारले आहेत. इतकेच नव्हे तर सत्यशोधक समाज हा तुटपुंजा असून त्याने वैदिक धर्माचा एक केसही लवलेश होणार नाही असे म्हटले होते. गोपाळे यांचे हे लेखन म्हणजे विष कालवण्याचा प्रयत्न आहे. तसेच ‘उथळ पाण्यास खळखळ फार’ ही म्हण या समाजास शोभते. तसेच सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले हे ‘असुरीकृत्याचे प्रवर्तक’ असल्याची कुत्सित शेरेबाजी या अनामिक लेखकाने केली आहे. वेद, भूदेव, मनुस्मृतीबद्दल अतिआदर असणाऱ्या या ब्राह्मण्यग्रस्त लेखकाने उंटावरून शेळ्या हाकताना गोपाळे यांच्या मूलगामी सत्यशोधक मताची पदोपदी खिल्ली उडविली आहे. अर्थात, ही विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या सत्यशोधकी लेखनाच्या अनुषंगाने पुनरावृत्तीच होय. तसेच गोपाळे यांच्या ‘धर्मढोंग परिस्फोटण’ या पुस्तिकेखेरीज ओतूरकर भाऊ पाटील डुंबरे यांना व्याख्यानाचे निमंत्रण दिलेले एक पत्र आज उपलब्ध आहे. मौजे कुरवंडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील हे व्याख्यानाचे निमंत्रण असून, या पत्रावर गोपाळे यांनी तारखेचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या पत्राच्या अनुषंगाने कालावधी समजण्यास अडचण निर्माण होते. तसेच महात्मा फुले यांचा ११ मे १८८८ मध्ये मुंबईतील कोळीवाड्यात मुंबईकर जनतेने हृद्य सत्कार करून त्यांना ‘महात्मा’ ही विरुदावली अर्पित केली होती. अशा या सत्यशोधकी भावस्पशीं कार्यक्रमाला पुणे येथून गोपाळे आवर्जून उपस्थित होते.

पुणे येथे संपन्न झालेल्या प्रथम सत्यशोधक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष (१७- ४-१९११) गणपतराव बिरमल यांनी स्वागताध्यक्षीय भाषणात गोपाळे यांच्या सत्यशोधकी कार्याचा आवर्जुन उल्लेख केला होता. गोपाळे यांच्या नामोल्लेखाच्या बिरमल यांच्या भावस्पर्शी शैलीवरून एक बाब लक्षात येते की, बहुधा दाजीसाहेब गोपाळे यांचे निधन १७ एप्रिल १९११ पूर्वी केव्हातरी पुणे येथे झाले असावे.

संदर्भ – १. सत्यशोधक असत्यलाप किंवा धर्मडोंग परिस्फोट – लेखक – अनामिक, २. सत्यशोधक ओतूर जी. ए. उगले, ३. महात्मा फुले – ए. के. घोरपडे

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button