सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 58

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
58

गवई गणेश आक्काजी

सत्यशोधक संपादक, कवी गणेश आक्काजी गवई ऊर्फ नानासाहेब हे मूळ मौजे भूगाव, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक होते. आंबेडकर चळवळीपूर्वी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्य समाजात जागृती केली होती.

१९११ सालच्या मे महिन्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘अस्पृश्योद्धारक अधिवेशन’ भरले होते. या अधिवेशनाला महर्षी विठ्ठल रामजी शिंद, पुणे येथून आवर्जून उपस्थित होते. या अधिवेशनाला विदर्भातून अडीच हजार अस्पृश्यबंधू (महारबंधू) उपस्थित होते. तसेच गवई यांनी १९२२ सालच्या १३ व १४ फेब्रुवारीला दिल्ली येथे अखिल भारतीय तिसऱ्या अस्पृश्य परिषदेचे संयोजन केले होते.

पुढे अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे आठवे अधिवेशन दिनांक १३ व १४ एप्रिल १९१८ रोजी ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथील टाऊन हॉलमध्ये भरले होते. या अधिवेशनाला गणेश गवई आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदविला होता.

३०, ३१ में व १ जून १९२० रोजी गणेश आक्काजी गवई यांनी ‘अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषद’ राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित केली होती. या परिषदेचे स्वागताध्यक्ष या नात्याने गवई यांनी शाहू महाराजांना कोल्हापूर येथे जाऊन निमंत्रण दिले होते. या परिषदेला डॉ. आंबेडकरही

उपस्थित होते. गणेश आक्काजी गवई यांनी अमरावती येथून ‘बहिष्कृत भारत’ पाक्षिक काही वर्षे चालविले. या पाक्षिकाचा पहिला अंक जानेवारी १९१४ साली निघाला.

७ व ८ फेब्रुवारी १९२० च्या मध्यप्रांत व वन्हाड परिसरातील चिखली येथील महार परिषदेला ते उपस्थित होते. महात्मा फुले यांची जन्मशताब्दीही त्यांनी साजरी केली. या निमित्ताने गवई यांनी नागपुरातील टिळक विद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन (८ डिसेंबर १९२७) केले होते. लंडन येथे भरलेल्या १९३१ सालच्या प्रथम गोलमेज परिषदेलाही ते प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

पुढे कट्टर सत्यशोधक असलेले गवई उतारवयात मात्र हिंदुमहासभा आणि डॉ. मुंजे यांच्या विचारांकडे झुकलेले दिसतात! महाडच्या चवदार तळ्याच्या यशस्वी चळवळीनंतर गवई हळूहळू डॉ. अंबिडकरांच्या चळवळीला विरोध करू लागले. प्रस्तुत विरोधात चळवळीच्या विरोधापेक्षा वैयक्तिक विरोधाचा सूर अधिकचा दिसतो !! दुसरीकडे पुढे पुढे गवईकडे ‘भाला’, ‘काळ’ आदीसारखी सनातनी पत्रं येत असत. इतकेच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मातराच्या घोषणेलाही त्यांचा विरोध राहिला. आंबेडकर अनुयायांनी आयोजित केलेल्या अस्पृश्य परिषदांना कधी उघड, तर अधूनमधून छुपा विरोध त्यांनी केला. कट्टर सत्यशोधक गवई यांच्या आंबेडकरांच्या अनुषंगाने वैयक्तिक विरोधाचे कोडे न उलगडणारे आहे.

संदर्भ – १. सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता, २. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ – संपादक – जयसिंगराव पवार, ३. लोकपत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर – सुखराम हिवराळे, ४. ‘दीनमित्र’ अंक १९ मे १९२१, ५. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक डॉ. दिनकर हेरलेकर

गवंडी (पालकर) अनंत एकनाथ

महात्मा फुले यांचे एक स्नेही एकनाथराव गवंडी (पालकर) यांचे अनंतराव पालकर हे पुत्र असून पुण्यातील एक कर्ते सत्यशोधक होत, घर नंबर ३३५, शुक्रवार पेठेतील पालकरांचा वाडा सत्यशोधक चळवळीचे एक केंद्र होते. याच वाड्यात छायाचित्रकार एकनाथराव पालकरांनी बुधवार, दिनांक १८ एप्रिल १८८३ रोजी महात्मा फुले-यशवंतराव फुले यांचा हौसेखातर २ वाजून २० मिनिटांनी एक फोटो काढला होता. पुढे हाच फोटो महात्मा फुले यांचे अस्सल छायाचित्र ठरले.

अशा या पालकरांचा सत्यशोधक विचारांचा वारसा अनंतराव पालकरांना लाभला. त्यांनी १९११ साली ‘महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर, महात्मा ज्योतीराव फुले’ ही पुस्तिका लिहिली. या पुस्तिकेत महात्मा फुले यांचे त्रोटक अल्पचरित्र

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button