🔥 जाहीर निमंत्रण ! चलो नायगाव!!

🔥 जाहीर निमंत्रण ! चलो नायगाव!!
३ जानेवारी २०२५ | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९५ वा जन्मोत्सव
इतिहास घडणाऱ्या क्षणाचा साक्षीदार व्हा! 🔥
भारतीय समाजक्रांतीच्या तेजस्वी परंपरेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट म्हणजे अन्यायाविरुद्धचा संघर्ष, शिक्षणासाठीचे बलिदान आणि समतेचा अखंड लढा होय. स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे सामाजिक परिवर्तनासाठी अर्पण झालेले प्रेरणादायी पर्व आहे.
३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव येथे त्यांच्या १९५ व्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या चार-पाच गुंठ्यांमध्ये असलेल्या सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार करून शासनाने दहा एकर जागेमध्ये ‘सावित्रीबाई फुले सृष्टी’, सावित्रीबाई फुले अध्यापिका ट्रेनिंग स्कूल तसेच जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या महत्त्वाकांक्षी स्मारक प्रकल्पासाठी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्या खात्यामार्फत २ ४३ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून त्यास शासनाची अधिकृत मंजुरी मिळालेली आहे आणि तेवढे संपूर्ण बजेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, त्याच सुचनेवरून महाराष्ट्रातील तमाम समाजघटकांना जाहीर निमंत्रण देण्यात येत आहे.
या ऐतिहासिक प्रकल्पाचा भूमिपूजन व पायाभरणी समारंभ राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब, तसेच सातारा जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. हा सोहळा केवळ स्मारक उद्घाटनापुरता मर्यादित नसून, तो सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या आणि शिक्षणक्रांतीच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे.
महाराष्ट्रातील तमाम अखिल भारतीय माळी महासंघाचे कार्यकर्ते, नेते समाज बंधू-भगिनी तरुण-तरुणी विद्यार्थी , फुले प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी लाखोच्या संख्येने नायगाव येथे सकाळी 9 वाजता उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या या भव्य स्मारकाच्या उद्घाटनाचा क्षण प्रत्येक फुलेप्रेमीसाठी अभिमानाचा आणि भावनिक सोहळ्याचा ठरणार आहे.
चलो नायगाव!
चलो नायगाव!!
चलो नायगाव!!!
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला मानवंदना देण्यासाठी, इतिहास घडवण्यासाठी!
— दिनबंधू न्यूज
संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष – अखिल भारतीय माळी महासंघ
मोबाईल: ७३ ८७ ३७ ७८ ०१
#SavitribaiPhule
#चलो_नायगाव
#फुले_विचार
#स्त्रीशिक्षण_क्रांती
#सावित्रीबाई_फुले_स्मारक
#MaharashtraPride
#SocialJustice




