अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था राष्ट्रीय अधिवेशन सोलापूर २०२अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था
- अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था राष्ट्रीय अधिवेशन सोलापूर २०२अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था
राष्टीय अधिवेशन सोलापूर २०२५
अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन २०२५ हे शनिवार दि. ८ व रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.३० या
वेळेमध्ये हिराचंद नेमचंद दिगंबर जैन धर्मशाळा, श्राविका आश्रम समोर सम्राट चौक सोलापूर येथे पार पडत आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन हे राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे राज्यसभेचे खासदार मा. डॉ. अजितजी गोपछडे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीपजी घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडणार आहे. याप्रसंगी मा. ललितजी गांधी (अध्यक्ष, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ) मा. विजयकुमारजी देशमुख (आमदार सोलापूर शहर उत्तर) मा. दिलीपजी सोपल (आमदार बार्शी) मा. ओमराजे निंबाळकर (खासदार धाराशिव) मा. फुलचंदजी जैन (सदस्य केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग) मा. राजेंद्रजी दर्डा साहेब (माजी मंत्री) व मा. प्रकाशजी आवाडे (माजी मंत्री) हे उपस्थित राहणार आहेत.
सदर अधिवेशनामध्ये द्वितीय सत्र हे “महिला संसद ध्येय एक दिशा अनेक नव्या पिढीतील नारीशक्ती अविष्कार” यावर महिला प्रकोष्ट च्या सौ. ईशाताई कोळेकर व त्याच्या सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तिसरे सत्र “शिष्यवृत्ती प्राप्त विद्याव्यांचे मनोगत व मा. डॉ. नरेंद्र भुसारी यांचे युवा करियर व मार्गदर्शन यावर पार पडणार आहे. चौथ्या सत्रांमध्ये सायंकाळी ‘महाआरती व जैन सैतवाळ कलावंतांचा कलाविष्कार हा शिवरंजनी प्रस्तुत संगीत रजनी’ हा मनोरंजन पर कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक: फेब्रुवारी रोजी पानव्या सत्रामध्ये सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेमध्ये प्रभात फेरी पुष्पवृष्टी, पादुका पूजन व पंचारती ओवाळणी हा कार्यक्रम होईल. तदनंतर सहाव्या सत्रामध्ये स्वदेशी एवं उद्यमिता… उद्योजकतेची मनोभूमिका” यावर राज्यभरातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळणार असून याचे उदघाट्न प्रिसिजन उद्योग समूहाचे श्री यतीन शहा हे करतील तर अध्यक्ष म्हणून एछ. संभाजी नगर मधीलू नामवंत उद्योजक श्री रवींद्र कोडेकर असतील. यावेळी राज्यभरातील यशस्वी उद्योजकांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आली आहे. सातव्या सत्रांमध्ये “प्रज्ञावंत मेळावा सद्यस्थितीतील युवकांसमोरील आव्हाने व संधी” या विषयावर कर्नाटक येथील सनदी अधिकारी श्री अजय कोरडे (आय.ए.एस) यांचे मार्गदर्शन, तरोच डॉ. वर्षा जबड़े छ. संभाजी नगर डॉ. वर्षा कस्तुरकर, प्रा. डॉ. सौ. सुनीता सांगोले व इतर प्रज्ञावंतांचा यथोचित सत्कार होईल. आठव्या सत्रामध्ये दुपारी २.०० ते ३.३० या वेळेमध्ये अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीपजी घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हाध्यक्ष कार्यकारणी सदस्य, सर्व समिती प्रमुख व उपस्थित सदस्या करिता ‘खुले अधिवेशन” पार पडणार आहे. नवव्या सत्रामध्ये ‘ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव पुरस्कार व समारोप यामध्ये समाजातील उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सोलापूरच्या बासदार मा. प्रणितीताई
शिंदे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर अधिवेशनामध्ये दोन्ही दिवस सकाळचा चहा न्याहरी दुपारचे व सायंकाळचे जेवण तसेच परगावच्या समाज बंधू भगिनींसाठी राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे.
सजव सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने आपल्या संपूर्ण परिवार व नातेवाईकासह सदर अधिवेशनामध्ये सहभाग नोंदवावा व अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन अधिवेशनाचे प्रमुख संयोजक व अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश फडकुले व स्वागतध्यक्ष श्री प्रकर्ष संगवे यांनी केले आहे. यावेळी संयोजन समिती सदस्य थी बाहुबली दुरुनकर, श्री वैभव आहेरकर, प्रा निलेश एवंदे, श्री अनंतकुमार रणदिवे, श्री अशोक
स्वागताध्यक्ष,
श्री. प्रकर्ष संगवे
(9552529235)
संयोजक,
डॉ राजेश फडकुले (9226225959)
>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात


